Skip to main content

वेळ लावू नका

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 20/09/2011 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ लावू नका
रात नवेली आली चालून विडा ठेवला चुना लावून तुमच्या येण्याचा नाही भरवसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा वाट तरी पहावी कितीक बाई दिस गेला हि रात सरत जाई ऐन मोक्याला धोका कसला? जीव झाला येडापीसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा लाडीगोडीचं तुमचं बोलनं गोडगुलाबी कोडं घालनं आधारासाठी हात उशाला पांघराया अंग द्या न विसरता वेळ लावू नका बेगीनं या राजसा शिनगाराचा असल्या येळी आठव तुमची डोळा आली दोन्ही पापण्या न्हाती पाणी विरह सहन होईना जरासा वेळ लावू नका बेगीनं या राजसा - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०९/२०११
काव्यरस

वाचने 1295
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पाषाण भेदा - रात नवेली आली चालून विडा ठेवला चुना लावून तुमच्या येण्याचा नाही भरवसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा निव्वळ; झकास ...!!

झकास लावणी. आवडली. लाडीगोडीचं तुमचं बोलणं गोडगुलाबी कोडं घालणं यात सर्व णं च्या ठिकाणी नं असे असल्यास अजून बरे...

अहो, "विडा ठेवला चुना लावून" हे "विडा ठेचला चुना लावून" असे वाचले हो... बाकी चालुद्या ... अरे हो ... राहिलेच ... लावणी छानच आहे!

वाहव्व पा.भे..नेहमी प्रमाणे फक्कड लावणी केलीत हो :-) अवांतर---तुझ सगुण म्हनु की निर्गुण रे.. याची चाल परफेक्ट बसतीये तुमच्या लावनीला,,, बराबर हाय पेरनी जोमदार त लावनी भरदार,,,निसर्ग नियमच हय त्यो...