Skip to main content

आंबाड्याचे रायते.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- ५-६ आंबाडे. लाल तिखट. गूळ. मिठ. मोहरी. एक वाटी खवलेले खोबरे. फोडणीसाठी तेल. कृती :-प्रथम आंबाड्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. आच बंद करावी व थंड करत ठेवावे.थंड झाल्यावर आंबाडे कुस्करून घ्यावे.पाव चमचा मोहरी भाजून घ्यावी.खवलेले खोबरे घेवून त्यात भाजलेली मोहरी लाल तिखट,चवीप्रमाणे गूळ्,मिठ घालून वाटून घ्यावे.वाटण कुस्करलेल्या आंबाड्यात घालावे व परत शिजत ठेवावे.चांगली उकळी आली की आच बंद करावी.वरून मोहरीची फोडणी द्यावी. हे आंबाडे.

वाचने 3931
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आंबाड्याचं रायतं छान दिसतंय, तसं खाण्यासाठीही छान लागत असावं. मी असं रायतं कधी खाल्ल्याचं आठवत नाही. :( -दिलीप बिरुटे

खल्लास डिश आहे प्रा.डॉ. अस्सल कोकणी. रायत्याचे एक डेरीवेटीव. आंबाड्याची आमटी(आंबट). गरम भाताबरोबर. ही आमटी ओरपताना कोकणी बरोबर ओळखता येउ शकतो.