आंबाड्याचे रायते.
साहित्यः- ५-६ आंबाडे.
लाल तिखट.
गूळ.
मिठ.
मोहरी.
एक वाटी खवलेले खोबरे.
फोडणीसाठी तेल.
कृती :-प्रथम आंबाड्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. आच बंद करावी व थंड करत ठेवावे.थंड झाल्यावर
आंबाडे कुस्करून घ्यावे.पाव चमचा मोहरी भाजून घ्यावी.खवलेले खोबरे घेवून त्यात भाजलेली मोहरी
लाल तिखट,चवीप्रमाणे गूळ्,मिठ घालून वाटून घ्यावे.वाटण कुस्करलेल्या आंबाड्यात घालावे व परत
शिजत ठेवावे.चांगली उकळी आली की आच बंद करावी.वरून मोहरीची फोडणी द्यावी.
हे आंबाडे.
वाचने
3922
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
आंबाड्याचं रायतं छान दिसतंय,
डिश
आंबाडे एकदम कैरी सारखे