✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 09/02/2011 - 15:34  ·  लेख
लेख
तुमच्या मते गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ? बरेच मिपाकर वेळेअभावी अधून मधून काही काळ मिपावर येऊ शकत नाहीत, या मधल्या काळातील चांगले दुवे खाली गेल्याने सहजगत्या मिळत नाहीत. अनेक धागे तात्कालीन महत्वाचे असले, तरी कालांतरने तसे वाटत नाहीत... त्यामुळे मिपाकरांच्या पसंतीस उतरलेले, कायम महत्वाचे धागे कोणते ? हे कळल्यास/ उपलब्ध झाल्यास फार सोयीचे होईल, असे वाटते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48448 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

असे बरेच लेख आहेत

रघुनाथ.केरकर
Sat, 05/09/2020 - 20:36 नवीन
काहि प्रतिसाद तर मुळ लेखापेक्शा सरस आहेत.
  • Log in or register to post comments

असले प्रश्न आणि याचे धागे

पाषाणभेद
Sat, 05/09/2020 - 22:30 नवीन
असले प्रश्न आणि याचे धागे निघावे हेच मोठे वैषम्य आहे. असले धागे वर्ष दोन वर्षांनी नेहमी निघतात. त्यात त्या त्या वेळच्या महानुभावांच्या मगदुरानुसार यादीही बनते. पण असल्या संग्रहणीय धाग्यांची यादी बनवण्याची रित किंवा पातळी काय? जास्त प्रतीसाद किंवा गाजलेला लेखक. संग्रहणीय, सर्वोत्कूष्ट याचे निकष कोण ठरवणार? आणि एखादा धागा, लेखन एखाद्या कमी प्रतिष्ठेच्या लेखकाने लिहीलेले असेल आणि ते माझ्या मते सर्वोत्कृष्ट असेल तर? दुसरे असे की अशी यादी बनवावीच का लागावी? ते ही काही पिरिअडनुसार? दोन एक वर्षात? जो येथे नवीन येतो त्याला अशी तयार यादी देण्याचे काय कारण? त्याला गरज असेल, वाचनाची आवड असेल, खोदकाम करावे वाटले तर त्याने ते लेख वाचावे. अशी यादी करण्यामुळे इतरांवर अन्याय होतो असे वाटत नाही काय?
  • Log in or register to post comments

>>अशी यादी करण्यामुळे इतरांवर

मोदक
Sat, 05/09/2020 - 22:43 नवीन
>>अशी यादी करण्यामुळे इतरांवर अन्याय होतो असे वाटत नाही काय? नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सर्वोत्कृष्ट चा निकष काय?

पाषाणभेद
Sat, 05/09/2020 - 22:51 नवीन
सर्वोत्कृष्ट चा निकष काय? असे निकष असणार्यांचे निकष काय? तुम्हाला सर्वोत्कृष्ट वाटणारे धागे या यादीत नसतील तर काय? (असली यादी म्हणजे पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासक्रमात आपला लेख धड्याच्या रुपाने प्रकाशित झाल्यासारखे वाटते. अभ्यासक्रम तयार करणारे सर्व प्रकारातील असतात. यात प्रादेशिकता, जातीभेद आदी सगळे प्रकार पडद्याआड असतात. आताच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांतील धड्यांमध्ये सर्रास चुकीचे वाकप्रचार, हिंदी वाक्य, हिंदाळलेली मराठी वाक्य, शब्द समाविष्ट असणारे पाठ आहेत. अनेक लॉजीक नसलेले पाठ उच्च इयत्तांना लावलेले आहेत ज्यातील विद्यार्थ्यांच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात.) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विषयवार अनुक्रमणिका आहेत.

कंजूस
Sun, 05/10/2020 - 06:57 नवीन
विषयवार अनुक्रमणिका आहेत. आपल्याला आवडणारी उघडून मागे मागे शोधत जातो / जात होतो. मी फक्त भटकंती उघडून ( मिपा आणि मायबोली ) सर्व वाचले. अर्थात हे सर्व मी इकडे आलो २०१३ मध्ये तेव्हा त्या अगोदरचे शोधावे लागले. शिवाय त्या वेळी इंटरनेट आणि कंम्पुटर नव्हता ( अजूनही नाही।)२०१६ नंतर मोबाईलचे इंटरनेट चाळीसपट स्वस्त झाले आणि युट्युब विडिओ पाहणे परवडू लागले. सर्वच प्रश्न झटकन सुटले. त्यात आणखी उत्तम मोबाइलची भर पडली. कविता,कादंबरी,राजकीय लेख, माझा प्रांत नाही. ज्या आइडींना आपले लेखन इतरांनी वाचावे असे वाटत असेल त्यांनी आपल्या लेखात माझे लेखन इथे पाहा ही लिंक स्वत:च टाकावी. कारण वाचनमात्र आणि सभासद नसणाऱ्यांना याचा उपयोग होईल. विषयवार लेख पाहताना एखाद्याचे आणखी लेखन पाहण्याची सोय होईल. या लिंकमध्ये 'युजर नंबर' असतो तो धोरणानुसार उघड करणे बाद आहे. पण लेखक स्वत: आपला देऊ शकतो.
  • Log in or register to post comments

ज्या आइडींना आपले लेखन

जव्हेरगंज
Sun, 05/10/2020 - 18:49 नवीन
ज्या आइडींना आपले लेखन इतरांनी वाचावे असे वाटत असेल त्यांनी आपल्या लेखात माझे लेखन इथे पाहा ही लिंक स्वत:च टाकावी. कारण वाचनमात्र आणि सभासद नसणाऱ्यांना याचा उपयोग होईल. एक्झ्याक्टली!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

रातराणी : कळते रे!

मराठी कथालेखक
Mon, 05/11/2020 - 16:07 नवीन
रातराणी : कळते रे!
  • Log in or register to post comments

हस्तर परीक्षण वार बुधवारी

हस्तर
Mon, 05/11/2020 - 19:04 नवीन
हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला http://www.misalpav.com/node/45482
  • Log in or register to post comments

मला जयंत कुलकर्णी ह्यांचे

आदित्य कोरडे
गुरुवार, 05/14/2020 - 09:33 नवीन
मला जयंत कुलकर्णी ह्यांचे सगळे लेखन त्यातूनही पिसुक हे काफ्काच्या मेतामोर्फोसीस चे भाषांतर, आणि अजिंठा वरची लेखमाला हे फार आवडले
  • Log in or register to post comments

तसे मिपावरचे बहुतांशी सर्वच

मेघनाद
Sun, 05/17/2020 - 02:41 नवीन
तसे मिपावरचे बहुतांशी सर्वच लेख छानच असतात. तरी पण काही लेख मनात जागा निर्माण करतात, माझ्या मनात जागा कोरलेले काही लेख. तसे अजून बरेच आहेत पण सध्या आठवतील तेवढे प्रतिसादात टाकलेत. १ मिपावरील हरवलेला लेखक - स्पार्टाकस यांचे खालील लेख (जवळ जवळ सगळेच लेख आवडलें मला ) छावणी आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - थोडे अद्भुत थोडे गूढ ९० डिग्री साऊथ के-२ : द सॅव्हेज माऊंटन १९९६ माऊंट एव्हरेस्ट - हा मिपावर वाचलेला पहिला लेख ज्यामुळे मिपाशी नातं जुळलं. २ विसोबा खेचर यांची रोशनी ३ डॉ सुहास म्हात्रे यांची सगळीच प्रवासवर्णने ४ टर्मीनेटर यांचे ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. ५ विजुभाऊ यांची अप्रतिम लेख मालिका दोसतार ६ स्वॅप यांच्या भयकथा मिपासंपादक मंडळासाठी विनंती: शक्य असल्यास ह्या धाग्यावर आलेल्या सर्व लेखांचे दुवे खास पानांवर दिले तर फार बरं होईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा