Skip to main content

सही -

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शनिवार, 27/08/2011 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
तु काढलेल्या माझ्या चित्रांवर सही नको करु... मला त्या कॅनव्हास ला जखमी केल्यासारखे वाटते... तुला सही करण्याची गरज नाही... जर सही हि एकमेव असते तर, तु चित्र काढताना्च त्या चित्रावर तुझी सही झालेली असते... जर फारच वाटत असेल तर, रंगात बुडवलेला तुझा अंगठा लाव त्या चित्रावर... मी जपुन ठेवेन ते चित्र... आणि जेंव्हा केंव्हा तुझी आठवण येईल, तेंव्हा अलगद ठेवुन देईल माझा अंगठा, तुझ्या अंगठ्यावर...
लेखनविषय:

वाचने 1286
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आंगठ्याच्या ठशावर आंगठा ठेवण्याची कल्पना छान आहे.

अवांतर : ही कविता चुकून तुमच्या अंगरक्षकाने लिहिल्याचे वाटले.... ;) -सूर्यपुत्र.