✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ए.एम.सी.

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 08/23/2011 - 15:25  ·  लेख
लेख
"ए.एम.सी. म्हणजे काय हो"? अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. "दुसरा काही अर्थ"? कुठे ऐकलास हा शब्द? "सहाव्या माळ्यावर गेले होते. तीने कालीकत इडलीचा घाणा टाकला होता. पिठाची आमटी झाली होती. त्या साठी मदत करायला गेले होते. तीच्या मैत्रीणिच्या तोंडातुन शब्द कळला. बहुतेक आपल्या नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती" अस्स का? विचार करायला लागेल. मग पिठ घट्ट झाले का? "केले कसे तरी. साधी इडली करायला येत नाही चालली कालीकत इडली करायला". म्हणजे ११वी १२वी चा बेसिक अभ्यास न करता सी.ई.टी. परिक्षेत १८० मार्क मिळ्ण्याची अपेक्षा. " जे काही थोडा वेळ होते त्यात एक कळाले अनेक बेसिक मधे खुपच प्रॉब्लेम्स आहेत. हॅहॅहॅ. "ते राहु दे. ए.एम.सी म्हणजे काय? नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती म्हणजे...... हां आल लक्षात. ए मेल चुवानिस्ट किंवा शुवानिस्ट. "हा काय प्रकार असतो? चुवानिस्ट काय करतो? त्याची लक्षणे काय"? फार मोठा विषय आहे.म्हटले तर बिरुदावली. म्हटले तर शिवी. म्हटले तर जेनेटीक डीझाईन. "थोडा फार सांगा. हा चुवानिस्ट कसा काय ओळखावा"? हे काय तुझ्यासमोर बसलाय. "काय सांगताय? तुम्ही"? मघाशी ह्हॅहॅ केले ते एक लक्षण. "हो क्का? आणखी काही सांगा बघु. आपण आपल्या बद्दल बोलु या. बघ आपल्याकडे गोकुळाष्टमी झाली. एवढे पाहुणे आले. जवळजवळ सगळे काही तुच केलेस.पाहुणे गेल्यावर घराची साफसफाई करण्यामधे सुद्धा माझा सहभाग काहीही नव्हता. भांडी साफ करायला मदत करु का? कचरा काढु का? असे विचारल्यावर तु नाही म्हटलस. "शी. ते काही तुमच काम होते का"? अस तुला वाटते? पण मी हे करत नाही म्हणुन घरातल्या तरूण स्त्री वर्गाच्या नजरेत मी मेल चुवानिस्ट पिग. "डुक्कर"? हो तर. तु सर्व आटोपत असताना मी डुकरा सारख लोळत होतो की. तुझ्या बहीणीचा नवरा मशिन लावुन कपडे धुतो. मला ते तु करु देत नाहीस. म्हणजे तुझ्या बहीणीच्या नजरेत मी एम सी पी. सर्व नजरेचा कारभार. "पण अशी काही कामे तुला सांगायची नाहीत असे मला लग्नाच्या आधीच मोठ्या जावेने सांगितले होते". त्याला पण एक कारण आहे. मी घरातला राजकुमार होतो. स्पेशल वन. आणि ते तुला सांगितले नसते तर तु मला करायला दिले नसते हा तुझ्या संस्काराचा भाग. आणखी एक कारण असे की तुला डीश वॉशर वर विश्वास नाही. तर माझ्यावर कसा असणार? " असु दे हां. मला तु आहेस तसाच बरा आहे. बहीणीला तु आणखी काय काय करु शकतोस हे सांगितले तर ती बेशुद्ध पडेल." खीखीखी. "आणखी काही"? हे अगदी वर वर झाले. ह्या एम्सीपी ची व्याप्ती फार मोठी आहे. कारणे पण असतात. आणि कारण दाखवुन जस्टीफिकेशन पण असते. "म्हणजे"? मी एम्सीपी आहे हे जाहीर पणे कबुल करणे सुद्धा एम्सीपी चे लक्षण आहे. सर्वात मोठे कारण असे की स्त्री जिच्यावर जन्मापासुन अवलंबुन असतो तीचे काही क्षणापुरता सुद्धा वर्चस्व सहन न झाल्यामुळे जे वैफल्य पुरुषामधे येते त्यातुन ह्या डुकराचा जन्म होतो. "अय्या, म्हणजे फक्त बायको नाही" सर्व जण येतात त्यात. आई, बहीण्,मैत्रीण कोणिही सुटत नाही. स्त्री चा वागण्यात बोलण्यात सतत अनादर हा डुक्कर करत असतो. "पण तु तसा करत नाहीस" पातळी वेगवेगळी. ती कमी असेल तर फारसा काही ही प्रॉब्लेम नसतो. आजही मी तुला कधी कधी मंगळसुत्र न घालता, कुंकु न लावलेल्या अवस्थेत बघतो तेंव्हा थोडा अस्वस्थ होतोच की. "अय्या, हे मला माहीतच नव्हते.. "वरच्या पातळीची उदाहरणे" नको. "सांगा हो". नेटवर उप्स मोमेंट नावाचा प्रकार असतो. बादली भर लाळ गाळुन बघतो. पण त्याच्या शतांश प्रकार आपल्या घरात झाला की तुफानी हल्ला बोल होते. कांदीवलीच्या सिग्नल वर एका डुकराने बाईक वर बसलेल्या लो कट जिन्स मुलीच्या पँटीत मागुन जळती सिगारेट टाकली. पोलीसानी पकडल्यावर वरुन "अपनी शरम संभालनेको नाही आता क्या" असा प्रश्न. अर्थात ही विकृती कडे जाणारी पायरी. व्याख्या अनंत आहे. चौकटी प्रमाणे बदलणारी, जस्टीफिकेशन नुसार वाकणारी..... पण असे का? आता नको पुन्हा कधी. जाता जाता: माझ्या लो लेवल चा तुला त्रास झाला तर एक उत्तम उपाय सांगतो. त्या दिवशी तु मला अहो अशी हाक न मारता 'अ‍ॅहो' किंवा 'आहो अशी हाक मारायची. म्हणजे मला लगेच मेसेज मिळेल. "हीहीही"
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11636 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

हम्म्म्म्म्...

पंगा
गुरुवार, 08/25/2011 - 03:19 नवीन
... पैसे खाणारी डुकरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 03:43 नवीन
बँकावाली, ही असली डुकरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

ते ३० मिनिटांचे काहीसे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 08/25/2011 - 19:09 नवीन
ते ३० मिनिटांचे काहीसे म्हणतात, ते का हो कारण ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

=)) =)) =))

धमाल मुलगा
गुरुवार, 08/25/2011 - 19:23 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

देख मनिमोहन अन्ना आया भाग

आशु जोग
Wed, 08/24/2011 - 22:24 नवीन
देख मनिमोहन अन्ना आया भाग मनिमोहन भाग
  • Log in or register to post comments

डुक्कर हा अंतिमतः एक पशू

विजुभाऊ
गुरुवार, 08/25/2011 - 16:13 नवीन
डुक्कर हा अंतिमतः एक पशू आहे, मला तर तो परमेश्वराचा तिसरा अवतार म्हणून माहीत होता.
  • Log in or register to post comments

तस्मात्...

पंगा
गुरुवार, 08/25/2011 - 18:27 नवीन
...परमेश्वर हा एक पशू आहे. QED. (Quite Easily Done.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हॅ हॅ हॅ..पंगाशेट दरवेळी(अ

गणपा
गुरुवार, 08/25/2011 - 19:20 नवीन
हॅ हॅ हॅ.. पंगाशेट दरवेळी (अ = ब आणि ब = क म्हणुन ) अ = क नसतय हो..:) आता उदा. बघा... तुमच्या प्रेयसीच तुमच्यावर प्रेम आहे. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. तस्मात तुमच्या प्रेयसीच आणि आमच एकमेकांवर प्रेम आहे. (?) पळ्ळा तेज्यायला आता पंगाशेट काय सोडत नाय.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हॅ हॅ हॅ

पंगा
Sat, 08/27/2011 - 05:50 नवीन
आता उदा. बघा... तुमच्या प्रेयसीच तुमच्यावर प्रेम आहे. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. तस्मात तुमच्या प्रेयसीच आणि आमच एकमेकांवर प्रेम आहे. (?)
हॅ हॅ हॅ... गणपाशेठ, उदाहरण किंचित गंडलेय. प्रेमात सिमेट्री लागू नसते. अ चे ब वर प्रेम आहे म्हणजे ब चे अ वर प्रेम असलेच पाहिजे, असे काही नाही. (५०% प्रेमाबद्दल ऐकलेय की नाही कधी?) तेव्हा, प्रेमाला ट्रान्झिटिविटी लागू करायचीच म्हटली, तरी (१) माझ्या प्रेयसीचे माझ्यावर, आणि (२) तुमचेही माझ्यावरच प्रेम असून उपयोग नाही. क्रम बदलला पाहिजे. म्हणजे, एक तर (१) माझ्या प्रेयसीवर माझे, आणि माझ्यावर तुमचे, किंवा, (२) नाहीतर मग तुमच्यावर माझे, आणि माझ्यावर माझ्या प्रेयसीचे प्रेम पाहिजे. ते होत नाही, तोपर्यंत फायदा नाही. (म्हणजे, तुमच्या दृष्टीने. मला काहीच फरक पडत नाही.) ठीक आहे. तुमच्या सोयीसाठी क्रम थोडा बदलून बघू. शक्यता १: (१) माझे माझ्या प्रेयसीवर प्रेम आहे, आणि, (२) तुमचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजेच, ट्रान्झिटिविटीने, तुमचे माझ्या प्रेयसीवर प्रेम आहे. ठीक आहे, सो व्हॉट? म्हणजे तिचेही तुमच्यावर प्रेम आहे असा अर्थ (प्रेमात सिमेट्री लागू नसल्याने) होत नाही. मला काय फरक पडतो? बसा एकतरफी प्रेम करत. शक्यता २: (१) माझ्या प्रेयसीचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे, ट्रान्झिटिविटीने, तिचे तुमच्यावर प्रेम असण्याकरिता (२) माझे तुमच्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. (तुमचे माझ्यावर प्रेम असून काहीही उपयोग नाही. प्रेमात सिमेट्री लागू नाही.) ठीक आहे, नाही करत जा मी तुमच्यावर प्रेम. काय करताय बोला. शक्यता ३: तुमचे माझ्या प्रेयसीवर (मला मध्ये न आणता) डायरेक्ट प्रेम आहे. (यात ट्रान्झिटिविटीचा संबंध येत नाही.) हरकत नाही. प्रेमात सिमेट्री लागू नसते हे सांगितलेलेच आहे. पुन्हा, तुमच्या एकतरफी प्रेमाने मला काय फरक पडतो? शक्यता ४: माझ्या प्रेयसीचे तुमच्यावर (मला मध्ये न आणता) डायरेक्ट प्रेम आहे. (यातही ट्रान्झिटिविटीचा संबंध येत नाही.) ठीक आहे. वेळ येईल तेव्हा बघून घेऊ. तोपर्यंत बसा स्वप्ने बघत. असो. तर ट्रान्झिटिविटीची मला अडचण नाही. पण मीही तुमच्यावर प्रेम करू शकतो, एवढेच लक्षात ठेवा, म्हणजे झाले, कसें? नाही म्हणजे, तुमचेही कोणावर तरी प्रेम असेलच (मांजरीबिंजरीवर नव्हे. ते उदाहरण फाऊल आहे.), आणि नसले तर करालच कधीतरी, तेव्हा करू बरोबर हिशेब चुकता. काय म्हणता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

देर आये दुरूस्त आये।

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 08/27/2011 - 06:27 नवीन
वाटच पहात होते याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

सेट

विनायक प्रभू
Sat, 08/27/2011 - 09:42 नवीन
सेट थिअरी मधील पंगाचे आधिपत्य हे एक 'वैश्विक सत्य' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

प्रकाटाआ

पंगा
Sat, 08/27/2011 - 05:40 नवीन
प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवला आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा