पालक गोश्त

गणपा's picture
गणपा in पाककृती
21 Aug 2011 - 10:27 pm

साहित्यः

२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला.

५०० ग्रॅम. मटण.
२ चमचे दही + १ मोठा चमचा आल-लसुण वाटण + १ लहान चमचा हळद + १ चमचा मसाला एकत्र करुन मटणाला लावुन १-२ तास मुरत ठेवाव.

खडा मसाला : २-३ वेलच्या , ३-४ लवंगा, १०-१२ काळीमीरी, १ इंच दालचीनी, तमाल पत्र.
१ चमचा आल-लसुण वाटण.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२ मोठे चमचे लिंबाचा रस.
तेल, मीठ चवी नुसार.

कृती :

एका कढईत थोडं तेल तापवुन त्यात खडा मसाला परतुन घ्यावा. मग त्यात कांदा टाकुन तो पारदर्शक होई पर्यंत परतुन घ्यावा. त्यात आल-लसणाच वाटण टाकुन कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.

नंतर त्यात मुरवलेल मटण टाकुन मोठ्या आचेवर ५-१० मिनिटं झाकण न ठेवता परताव.

मग त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकुन मटण चांगल एकत्र कराव. ५ मिनीटांनी त्यात टॉमेटोची पेस्ट टाकावी.

त्यात चिरलेला पालक टाकुन, एकत्र करुन घ्याव. लिंबाचा रस टाकावा. १/२ कप पाणी टाकुन वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजत ठेवाव. अधुन मधुन ढवळावं. पाणी आटल्यास थोडं थोडं गरम पाणी टाकत जाव.

मटण शिजले की चवी नुसार मीठ टाकुन, झाकण काढुन मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजवावे.

नान, तुंदुरी रोटी, भाकरी, वा वाफाळत्या भाता सोबत हाणावे.

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

21 Aug 2011 - 10:36 pm | इंटरनेटस्नेही

छान पाककृती.. पण हे पचायला कंपल्सरी बिअर पाहिजेच!

सोत्रि's picture

22 Aug 2011 - 9:51 pm | सोत्रि

अनुमोदन

- (ड्राफ्ट बीयर प्रेमी ) सोकाजी

पंगा's picture

22 Aug 2011 - 9:59 pm | पंगा

पालक घातलेले काहीही 'पचण्या'करिता बाह्य पाचकाची आवश्यकता असते, हे पटू शकत नाही.

('बहाना चाहिए' हेच खरे. ;))

(ड्राफ्ट बीयर प्रेमी )

असे सरळसरळ बोला ना! उगाच नसती स्पष्टीकरणे कशापायी? ;)

(अवांतर: तयार पदार्थाची चित्रे क्षुधावर्धक.)

इरसाल's picture

21 Aug 2011 - 10:44 pm | इरसाल

घरात दोन उपवास पाठोपाठ आलेत.
का त्रास देतोयेस मित्रा.एक आठवडा थांबला असतास.

सानिकास्वप्निल's picture

22 Aug 2011 - 12:06 am | सानिकास्वप्निल

खरंच रोटीसोबत आत्ताच हाणावसं वाटतय :)
गणपाभाऊ नेहेमीप्रमाणे पाकृ झक्कास :)

चिंतामणी's picture

22 Aug 2011 - 12:42 am | चिंतामणी

क़ातिल तुम्हे पुकारूँ असे वाटते.

भन्नाट.

कौशी's picture

22 Aug 2011 - 12:57 am | कौशी

गणपा,

पण श्रावण आहे ना?

श्रावण नन्तर जरूर बनविणार...

सुंदर छायाचित्रं. फारच सुरेख.
_____________

पण आज गोकुळाष्टमी आहे ना? मग ह्यो काय भलतच ;)

Nile's picture

22 Aug 2011 - 1:42 am | Nile

उपोषण वगैरे करा जरा.. अण्णांना पाठिंबा द्या! ;-)

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 12:59 pm | पल्लवी

एक तर श्रावणात नळ्या फोडून धर्म तर बुडवतच आहात आणि आता तर साक्षात देशद्रोह !
जमत नसेल तर आपण चक्री उपोषण करू.
आता मटण खाल्लेत, पुढच्या आठवड्यात उपास करा तुम्ही, मी मटण खाईन.
कसे ? ;) :P

मस्तच हो.... बघुन लगेच खावस वाटतय.. मस्त पाकृ...

स्पंदना's picture

22 Aug 2011 - 5:00 am | स्पंदना

निव्वळ तुम्ही केलीय म्हणुन ट्राय करेन, अदर्वाइज आपण मटण अन मासे भाज्यात नाही मिसळत. परवा आचारी केल होत. अजुन जमिनीवर यायच आहे, इतक सुंदर झाल होत.

सन्जोप राव's picture

22 Aug 2011 - 6:17 am | सन्जोप राव

सुंदर पाककृती आणि प्रेझेंटेशन. 'देव कुणाच्या बोटात काय ठेवतो बघा' - चितळे मास्तर.
कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.
हे वाचून न शिजलेले, निबर मटण चावल्यासारखे वाटले. 'गळणे' हे मराठीतले क्रियापद आहे आणि त्याला एक वेगळा अर्थ आहे. 'शिजेपर्यंत' असे साधे लिहिणे तुम्हाला का सुचले नसावे, गणपाभाऊ?
अवांतरः ही प्रतिक्रिया सुपूर्त करताना प्रतिक्रियेचे 'पुर्वदृष्य' हे पाहिले आणि मग तुम्हाला असे का लिहावेसे वाटले असावे हे कळाल्यासारखे वाटले.

मांसाहारी नसल्याने छान सुंदर असा प्रतिसाद देणे शक्य नाहि,

पण विषय आवडत नसला तरि सर / बाई आवडतात तसं क्लासला हजेरी लावतात कालेजात म्हणुन हा प्रतिसाद. बाकि प्रेझेंटेशन आणि कढईतली वाफ लेन्सवर येउ न देता फोटो काढण्याचे कसब उपयुक्त आत्मसात केले पाहिजे.

खादाड's picture

22 Aug 2011 - 10:05 am | खादाड

गणपाभाऊ नेहेमीप्रमाणे पाकृ झक्कास ! मालक पालक ब्लान्च का काय म्हणतात ते केल
तर डिश अजुन हिरवी दिसेल शिवाय लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्या घेतल्या तर ?

अरे काय जबरा आहे हा पदार्थ.. मस्त रे.. आणि मांडणीही खासच..

स्पा's picture

22 Aug 2011 - 10:45 am | स्पा

वाह ..
क्या बात....

गणपा सेठ...
क्लास्सेस कधी सुरु करताय

जाई.'s picture

22 Aug 2011 - 10:47 am | जाई.

उत्तम पाककृती

उदय के'सागर's picture

22 Aug 2011 - 11:33 am | उदय के'सागर

मस्तच गणपा भाउ!!!

(मी पुन्हा शाकाहारी का झालो? ह्या गोष्टिची खुप दिवसांनि पुन्हा एकदा चिड्चीड झालि :( )

(अश्याच लज्जतदार शाकाहारि पाककृती येउ द्यात. वाट पहातोय!)

छ्ळतोस आहेस तु आम्हाला.श्रावणामुळे ला़ळ गाळण्या व्यतिरिक्त काही करु शकत नाहीरे आम्ही.

शाहिर's picture

22 Aug 2011 - 1:37 pm | शाहिर

श्रावण संपल्या वर बनविला जाइल ..

डिश बघुनच चव येते तोंडाला !!

सहज's picture

22 Aug 2011 - 4:11 pm | सहज

डोळ्याचे पारणे फिटल्या गेल्या आहे!

प्रचेतस's picture

22 Aug 2011 - 5:21 pm | प्रचेतस

क्या बात है गणपाभौ. ...मस्तच.

तरी शाकाहारी असल्याने मटनच्या ऐवजी पनीर घालून पाहीन म्हणतो. :)

त्या नानची पाकृ आहे का मिपावर? असल्यास लिंक द्या ना त्याची.

वल्ली पनीर ऐवजी सोयाबीन वापरुन पहा. :)

स्वातीताईची नानची पाककृती इथे पहाता येईल.

प्रचेतस's picture

22 Aug 2011 - 6:38 pm | प्रचेतस

सोयाबीन कसे वापरावेत? म्हणजे आतापर्यंत सोयाबीनचे पदार्थ घरी आणून कधीही केले नाहीत. म्हणजे विकत मिळतात तसेच वापरून मुरवावेत का भाजणे, तळणे, वाफवणे वगैरे काही संस्कार करावेत.

बाकी नानच्या दुव्याबद्दल धन्यवाद. :)

गणपा's picture

22 Aug 2011 - 6:56 pm | गणपा

खरड पाठवली आहे.

चिंतामणी's picture

23 Aug 2011 - 2:21 am | चिंतामणी

लाजतो कशाला????? जाहीर लिही की.

सगळ्यांना समजले तर काय बिघडणार आहे का??????

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Aug 2011 - 5:26 pm | बिपिन कार्यकर्ते

आयला याचे ९९ भरले की नाही रे अजून? हिशेब कोण ठेवतो आहे?

प्रभो's picture

22 Aug 2011 - 6:58 pm | प्रभो

तुम्हीच ठेवा.. ;)

गणप्या, भारी रे पाकृ.

रेवती's picture

22 Aug 2011 - 7:01 pm | रेवती

ह्म्म...
पुन्हा नानहेज पाकृ.......तीही श्रावणात?
धाग्या बघितल्या गेला आहे याची णोंद घ्यावी.

सोत्रि's picture

22 Aug 2011 - 9:59 pm | सोत्रि

श्रावण संपल्या-संपल्या पहिली केली जाणारी नॉन वेज डिश ही असेल :)

- (घरात सक्तीचा श्रावण पाळणारा) सोकाजी

अवांतर:
भारतवारी कधी? पुण्यास येणॆ होणार आहे का? धम्यावर एक घरगुती कट्टा उधार आहे ;)

धम्यावर एक घरगुती कट्टा उधार आहे

तो "वाम"वाला कट्टा का?

सोत्रि's picture

23 Aug 2011 - 6:22 pm | सोत्रि

हो हो, अगदी तोच!

- ('वाम'कुक्षी घेणारा) सोकाजी

धमाल मुलगा's picture

23 Aug 2011 - 6:46 pm | धमाल मुलगा

नुसतेच गप्पा करा तुम्ही लोक. समाजवादी कुठले!
तो गणपा बसलाय आफ्रिकेच्या झाडांवर झोके घेत..गवि तिकडं मुंबईत बसून कोल्लापूरच्या कर्दळीच्या बागेसाठी गाणी लिहिणार...
लेको, सगळे जमणार कधी? चला, ठरवा लवकर लवकर. त्या गणप्यालाही बोलवूया...अनायसे पालक-गोष्त ही होऊन जाईल. ;)

श्रावण मोडक's picture

23 Aug 2011 - 7:12 pm | श्रावण मोडक

आहे. मी आहे अजूनही. पुढच्या महिन्यातही असेनच. तेव्हा... ;)

संदीप चित्रे's picture

23 Aug 2011 - 9:26 am | संदीप चित्रे

भर श्रावणात पालक-गोश्त!
एकूण मित्रवर्य गणपा आमच्याच रांगेतले दिसतायत ;)

मांसाहारी कंपूने मासांहाराचा प्रचार करण्यासाठी दिलेला प्रतिसाद वाचून डोळे पाणावले.

अग्ग्ग्ग्गगं...
मधमाशीच्या पोळ्यावर दगड भिरकावू नये.
आवंतर : मी रेवतीताईला कसलीही सुपारी दिलेली नाही. :)

संदीप चित्रे's picture

29 Aug 2011 - 5:26 am | संदीप चित्रे

माझ्या बायकोने ही रेसिपी वापरून केलेले 'पालक-गोश्त' खात साजरी केली रे मित्रा!
रेसिपीप्रमाणे पदार्थ बेष्टच झाला होता हे वे सां न ल!

प्रभाकर पेठकर's picture

31 Aug 2011 - 7:40 pm | प्रभाकर पेठकर

पालक गोश्त हा प्रकार खूप आवडीचा पण कधी करुन पाहिला नाही. आता ही पाककृती नक्कीच प्रयत्नुन बघेन.

'कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.'

श्री सन्जोपरावांशी सहमत. मलाही ही शब्दयोजना रुचली नाही. असो.