पालक गोश्त
साहित्यः
२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला.
५०० ग्रॅम. मटण.
२ चमचे दही + १ मोठा चमचा आल-लसुण वाटण + १ लहान चमचा हळद + १ चमचा मसाला एकत्र करुन मटणाला लावुन १-२ तास मुरत ठेवाव.
खडा मसाला : २-३ वेलच्या , ३-४ लवंगा, १०-१२ काळीमीरी, १ इंच दालचीनी, तमाल पत्र.
१ चमचा आल-लसुण वाटण.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२ मोठे चमचे लिंबाचा रस.
तेल, मीठ चवी नुसार.
कृती :
एका कढईत थोडं तेल तापवुन त्यात खडा मसाला परतुन घ्यावा. मग त्यात कांदा टाकुन तो पारदर्शक होई पर्यंत परतुन घ्यावा. त्यात आल-लसणाच वाटण टाकुन कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.
नंतर त्यात मुरवलेल मटण टाकुन मोठ्या आचेवर ५-१० मिनिटं झाकण न ठेवता परताव.
मग त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकुन मटण चांगल एकत्र कराव. ५ मिनीटांनी त्यात टॉमेटोची पेस्ट टाकावी.
त्यात चिरलेला पालक टाकुन, एकत्र करुन घ्याव. लिंबाचा रस टाकावा. १/२ कप पाणी टाकुन वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजत ठेवाव. अधुन मधुन ढवळावं. पाणी आटल्यास थोडं थोडं गरम पाणी टाकत जाव.
मटण शिजले की चवी नुसार मीठ टाकुन, झाकण काढुन मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजवावे.
नान, तुंदुरी रोटी, भाकरी, वा वाफाळत्या भाता सोबत हाणावे.
वाचने
15403
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
छान पाककृती.. पण हे पचायला
In reply to छान पाककृती.. पण हे पचायला by इंटरनेटस्नेही
+१
In reply to +१ by सोत्रि
हम्म्म्...
घरात दोन उपवास पाठोपाठ
अहाहा ! झक्कासच
तुझे प्रेझेंटेशन पाहीले की
भन्नाट रेसिपी..
सुंदर छायाचित्रं. फारच सुरेख.
उपोषण करा उपोषण!!
In reply to उपोषण करा उपोषण!! by Nile
तर काय !
मस्तच हो.... बघुन लगेच खावस
निव्वळ तुम्ही केलीय म्हणुन
सुंदर
मांसाहारी नसल्याने छान सुंदर
पा.क्रु. छानच !!
अरे काय जबरा आहे हा पदार्थ..
वाह ..
उत्तम पाककृती
मस्तच गणपा भाउ!!! (मी पुन्हा
अरे रे उद्दाम कॉग्रेस सरकारसारखे
अप्रतिम !!
वॉव
क्या बात है.
In reply to क्या बात है. by प्रचेतस
वल्ली पनीर ऐवजी सोयाबीन
In reply to वल्ली पनीर ऐवजी सोयाबीन by गणपा
कसे वापरावेत
In reply to कसे वापरावेत by प्रचेतस
.
In reply to . by गणपा
खरड पाठवली आहे.
आयला याचे ९९ भरले की नाही रे
In reply to आयला याचे ९९ भरले की नाही रे by बिपिन कार्यकर्ते
तुम्हीच ठेवा
ह्म्म... पुन्हा नानहेज
तोंपासु पाकृ
In reply to तोंपासु पाकृ by सोत्रि
धम्यावर एक घरगुती कट्टा उधार
In reply to धम्यावर एक घरगुती कट्टा उधार by गवि
"वाम"कट्टा
In reply to "वाम"कट्टा by सोत्रि
हा हन्त हन्त!
In reply to तोंपासु पाकृ by सोत्रि
आहे
अरे व्वा!
In reply to अरे व्वा! by संदीप चित्रे
मांसाहारी कंपूने मासांहाराचा
In reply to मांसाहारी कंपूने मासांहाराचा by रेवती
अग्ग्ग्ग्गगं...मधमाशीच्या
आजची रविवार दुपार
मस्त...