हॅलो.....हॅलो.....
"हॅलो..आबा , अव किती येळ लावलाय फोन उचलायला"
"अरॅ दादा होय , अर बार लावला व्ह्ता. तू आमच लेका सगळच बंद करुन टाकलस. मंग असं गुमान खाव लाग्तया"
"आवो पन कुठ अहात तुम्ही ? "
"काय लेका एका माग एक लचांड माग लाव्ता तुमी..पार डोक्याची मंडई झाली . म्हून येऊन बसलोय हिकड म्हाबळेश्वरला आपल्या फार्म हाउस वर"
"काय आबा तुमी बी..एव्हढ मनाला लाउन घेताय. अशी प्रकरण व्हनारच.तेच तर आपल भांडवल अस्तया"
"हॅ..हॅ..तुमच बाकि बर आस्त..बॉम्बस्फोट झाला,दरोडा झाला,....आता मधेच तुमची पाइपलाईन फुटली....आर पार डोक्याचा भूगा झालाय"
"तुमी बाकी आता चांगलेच तयार झाला की ....गोळीबारात मधेच ईंडिका घुसवली...हॅ..हॅ.."
"तुमच्यासाठी काय काय कराव लाग्तया बगा की..."
"पन तुमच ते नवीन बेन लैच माजल होत्.काय ते पिक्चर 'सिंघम' ची हवा शिरली होती डोक्यात....आल ठिकाण्यावर.."
"ते आल लक्षात आमच्या....एका दगडात दोन पक्षी...."
"काय करनार कराव्या लाग्त्तात आशा शिकारी"
"पन ते आता पुढच संभाळा......."
"छॅ..छॅ...तुमी बिन्धास रहा.काही होत नाही"
"हा आता तर तुमी पुन्याचे शहेन्शा झाला की राव्....त्या सुर्याला ला पार येड लावलं की....."
"काय आबा ते बकरं कापायचंच व्हत आपल्याला......"
"त्यात आता आपला नंबर वरचा हाय"
"छॅ हो ..आपन काही करायंच नस्तं..हे सगळं ही येडझवी लोकं च करत्यात .....आपन फक्त बसल्या जागेवर छू म्हनायच की पळ्त्यात हिकडन तिकड येड्यावानी.......ते मागं काय झाल....सायबाच्या नावानी बोंबाबोंब सुरु झाली....मग आपन काय केल फक्त हिकडचा पुतळा तिकड टाकला....एका रात्रीत झालं काम फत्ते....काय दोन तीन दिवस झाला कालवा....मंग काय मुकाट बसली ...हे बी इसरली अन ते बी ..."
"हॅ..हॅ..हे बाकी झ्याक हा...फक्त चार पाच दिवस बोंबाबोंब...नंतर सगळ पुन्हा जैसे थे....."
"पन काही बी म्हना त्या अण्णानी मात्र रान तापवलय्.....त्य शिंग्याची पर चड्डी पातळ करुन सोडली..."
"हितं बी त्योच फार्मुला दादा.....चार पाच दिवस बोंबाबोंब....बस...."
"ते एक डोक्याला तापच हाय राव .....आमी मात्र ती खोर्यातली सगळी पिलावळ या पाइपलाइनीत पय्लेच बूक करुन टाकलीय की राव......"
"पूना हिकडही खोर लावलंच की.....हॅ..हॅ....तुमी बाकी खोर सोडायला तयार नाही बगा...."
"चालाय्चच आबा.......हॅलो..... हॅलो..........." कट
"....."
"आइला.....तेच पुना सुरु झाल बग्...."आबा आस्वस्थ.....
"काय आबा.... काय्...झाल..."
"काय व्हनार ....फुटला की बाँब परत्....फुकणीचे जरा निवांत बसू देत नाही...."
"जाऊद्या आबा ...शांतीन घ्या....आताशी एक फुटलाय्....अजून लड लागूद्या....जा आरामात......."
याद्या
1361
प्रतिक्रिया
0
मिसळपाव