Skip to main content

आता केजरीवाल आणि सिसोदिया लक्ष्य?

लेखक अनंत छंदी यांनी शुक्रवार, 19/08/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
आता केजरीवाल आणि सिसोदिया यांना सरकारने लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. म्हणे अण्णा आणि इतर सहकारी सामोपचाराची भूमिका घेत असताना हे दोघे अडवणुकीची भूमिका घेतात त्यामुळे सरकारने त्यांच्या प्रकरणांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांच्या काही आर्थिक प्रकरणांची माहिती सरकारला मिळाली आहे. या स्वरुपाचा आशय असलेली
कळते समजते
छाप बातमी आज दैनिक सकाळने प्रसिद्ध केली आहे. हा सरकारचा फोडा आणि झोडा असा प्रयत्न आहे असे मला वाटते. सकाळसारख्या वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद्ध झाल्याने आश्चर्य वाटले. तुम्हाला काय वाटते?

वाचने 3062
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

सिसोदिया म्हणजे नक्कीच शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या नातलगांपैकी असणार. सकाळने महाराजांच्या नातलगांच्या विरोधातल्या क्याम्पेनला खतपाणी घालावे हे फारच अशोभनीय !!!!! :)

In reply to by नितिन थत्ते

चाचा फार सैरभैर झालेले दिसतात. जिजाऊसाहेबांची... आपलं थोरल्या महाराणीसाहेबांची खुशाली कळत नाहीये म्हणून का काँग्रेसविरुद्ध मोहोळ उठले आहे म्हणून?

In reply to by हुप्प्या

चाचा फार सैरभैर झालेले दिसतात. जिजाऊसाहेबांची... आपलं थोरल्या महाराणीसाहेबांची खुशाली कळत नाहीये म्हणून का काँग्रेसविरुद्ध मोहोळ उठले आहे म्हणून?
धाकट्या कोण म्हणे ?

In reply to by हुप्प्या

विनोद म्हणून ठिकच आहे, समजू शकतो. पण जिजाऊसाहेबांची तुलना कुणाशी केली गेली असे वाटले. असो.

सकाळ अण्णांबद्द्ल बातम्या देतय ते नाइलाजानेच. जनलोकपाल बिल आल तर राज्यातला पहिला बळि शरद पवार असेल.

अन्ना के भ्रष्टाचार आन्दोलन से जुड़े हुवे उनके पूर्व साथी उनके बारे में क्या कहते है ..देखिये ये विडिओ -by face book http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8&feature=player_embedded Anna Hazare - The Real Story www.youtube.com See the real story of Anna Hazare , checkout what his ex-colleagues have to say about him. You will be shocked to hear the real truth hidden from all of us.

In reply to by अजातशत्रु

हे सगळे तथाकथीत "पूर्व साथी" कोण आहेत हे सर्वजण जाणतातच. हे सगळे आहेत समाजवादी. यांच्या बद्दल काय बोलायचे. एकमेकांत लाथाळ्या करून हे संपले आहेत हे सगळे सुज्ञलोक जाणतातच. असो. त्यात न्या.सामतांचा उल्लेख आलेल आहे. न्या. प.बा. सावंत काय म्हणतात हे पहा आणि ऐका. हे तीन दिवसापुर्वीचे त्यांचे निवेदन आहे. http://indiatoday.intoday.in/site/video/congress-highlighted-anna-issue…

आता असे करणारच. मुळावर घाव घालायला गेले तर कु-हाड पायावरच बसली. त्यामुळे आता फांद्या तोडुन बघणार असे दिसते.

In reply to by मराठी_माणूस

बिचारे ममो , मॅडम च्या गैरहजेरीत काय करायचे तेच समजत नाही बिचारे ममो , मॅडमच्या मम्मीच्या गैरहजेरीत काय करायचे तेच समजत नाही

कोण केजरीवाल आणि सिसोदिया ? धन्यवाद.

कोण अण्णा ? हे राहिलेच.

In reply to by अजातशत्रु

ते काय लिहितात त्यांचे त्यांनाच माहित्. १९९६/९७ साली बबन घोलप्,शशिकांत सुतार्,महादेव शिवणकर ह्यांची 'वाईट' अवस्था केल्याबद्दल सेनेचा पूर्वीपासून अण्णांवर राग आहे. चांगले लिहायचो आणि चूकुन सत्तेवर आलो तर फुकट मरायची पाळी असा विचार असावा. त्यापेक्षा अण्णा,केजरीवाल ह्यांना 'तुम्ही आधी संसदेत निवडून या आणि मग बोला." असे विचारणे सोपे आहे.

मला अभिमान आहे आपल्या सरकारचा. पहिले त्यांनी बाबा रामदेवांना त्यांची जागा दाखवली. आता ते अण्णांना "ठंडा करके" खातील. हे राजकीय कौशल्य जनसामान्यांच्या हितासाठी वापरलं असतं तर फक्त अभिमान नाहि तर उपकृत झाल्यासारखं वाटलं असतं. बाकी काहि हो न हो, राजकारण्यांना एक सॉल्लीड ठोसा नक्की मिळालाय. हे हि नसे थोडके. (सरकारी) अर्धवटराव

हा सरकारचा फोडा आणि झोडा असा प्रयत्न आहे असे मला वाटते. सहमत. पण त्यात काही आश्चर्य नाही. मात्र केजरीवाल - सिसोदीया यांचे जर काही आर्थिक गैरव्यवहार असतील आणि ते बाहेर आले म्हणून काय बिघडले? अर्थात त्या दोघांचे बिघडेल. पण भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले नेतृत्व नाही पण नेतृत्वाचे शिलेदार जरी भ्रष्ट असतील तर ते का चालावे आणि त्यांचे असे व्यवहार झाकून ठेवायची आपण तरी का अपेक्षा करावी? तसे केले तर हे आंदोलन केवळ सध्याच्या सत्ताधार्‍यांविरोधात (मुलतः काँग्रेसच्या विरोधात) होते. भ्रष्टाचारात काँग्रेसचा एकाच काय दहा सिंहांचा वाटा आहे असे वाटण्यासारखे वातावरण आहे. पण बाकीचे कोणी भोळे सांब नाहीत. थोडक्यात हे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आहे. ते तसेच रहावे...