अनुभव : मिसळ आणि जीवनातले
आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट पाहीला असेल.
त्यात अगदी सुरुवातीच्या प्रसंगात रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कुणी चोर सुनील दत्तचे पाकीट मारतो.
बघणारे असंख्य लोक लगेच पुढे येतात, म्हणतात "याला आमच्याकडे सोपवा, आम्ही याला ठीक करू"
यावर सुनील दत्त म्हणतो," ये है मेरे देश की जनता, यहां हर आदमी किसी ना किसी चीज से परेशान है,
सरकार के भ्रष्टाचार से लेकर इंडियन क्रिकेट टीम की हार तक सब चीजों से ये लोग परेशान है ,
लेकीन ये सब चूप है, किसी की मूंह से आवाज नही आयेगी, कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा"
आणि सुनील दत्त पुढे त्या चोराला म्हणतो, " कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा, अपना सारा गुस्सा ये लोग तुम्हारे उपर निकालेंगे"
यालाच आपण म्हणतो वड्याचं तेल वांग्यावर
तुम्ही एखाद्या लाईनीत उभे असता काही क्षुल्लक कारण घडतं, तुम्ही रांगेतल्या एखाद्या माणसाशी भांडाभांडी सुरु करता
वास्ताविक तो माणूस तुम्हाला प्रथमच भेटलेला असतो पण दुसरीकडचा कुठलातरी राग तुम्ही त्याच्यावर काढत असता
बॅंकेत आपण जातो तेव्हा असं दिसतं प्रत्येक कर्मचारी मान खाली घालून काम करीत असतो
पण आपल्या एखाद्या कामाला जरा ५ मिनिट जास्त लागली तर
"या लोकांना काही कामं करायला नकोत, कष्टमरची काही पर्वा नाही या लोकांना"
असे आपले उद्गार असतात
असा आपला राग, वैताग कुठेही निघतो. अगदी बसमधे कंडक्टरवर सुद्धा आपण खेकसतो.
मग विषय भले साधा सुट्या पैशाचा असेल.
बारकाइने पहा
अनेकदा मिपा वर किंवा इतर कुठल्या साइटवर सुद्धा पहा प्रतिक्रिया देताना मुख्य मुद्दा सोडून आपण प्रतिक्रिया देतो.
विषय काढणार्याला दुखावणार्या काही तिरकस टोचक प्रतिक्रिया देतो.
विषय काढणार्याला आपण ओळखत नसतो, वैयक्तिक भाण्डणही असत नाही.
हा कुठलातरी दुसरीकडचा राग आपण त्याच्यावर काढत असतो
एकूण आपला काय अनुभव आहे
माणसं अशी बाकी जीवनात कुठेतरी वैतागलेली असतात.
तिकडे काही चालत नाही मग इकडे राग काढा,
लोक असा कुठलातरी राग कुठेतरी काढत असतात का ? वड्याचं तेल वांग्यावर या म्हणीचा प्रत्यय आपल्याला येतो का ?
प्रतिक्रिया
कुंग फू पांडा मधला डायलॉग
पांडापंखे देखील दिसता.
वेल दॅट इस नॉट अॅन
थ्राइस
(No subject)
..
धाग्याची तिथ करताय की काय ?
जुने धागे
उद्धार
Pagination