Skip to main content

ओळखा पाहू

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 10/08/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखा पाहू ही नयनरम्य टेकडी कुठे आहे? ओळखणार्‍या माझ्याकडून ह्या परिसराची मोफत सहल. हिंट - हे ठिकाण मुंबईत / मुंबई जवळ आहे. नम्र सूचना - जे इथे येऊन गेले आहेत त्यांनी कॄपया उत्तर फोडू नये. नव्या लोकांना वाव द्यावा.
लेखनविषय:

वाचने 3569
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

नक्कि नाहि,पण कदाचीत पवइ तलाव असावा.

In reply to by आचारी

मुंबीत नदी? आणि ती ही इतकी स्वच्छ? अ‍ॅड्या इसविसन किती मद्ये काढलायस रे हा फोटू? ;) बहुतेक आमच्या बोरिवली जवळचा असवा. :)

In reply to by आचारी

माझ्या माहितीत मुंबईत ज्या ४ नद्या आहेत त्या या.... मीठी नदी. दहिसरची नदी. पोईसरची नदी. ओशिवारा येथील नदी. वर अ‍ॅडीने दिलेली स्वच्छ नदी मी तरी आजवर पाहिली नाही.

मला वाटतं ही खारघरची (नवी मुंबई) टेकडी आहे.

घारपुरी बेट आहे का हे ? अवांतर : कदाचीत नसेन पण पुढच्या महिन्यात ट्रिप फिक्स झाल्या कारणाने म्हंटले चुकुन दगड लागला तर तेव्हडेच फ्री जाता येइल

हे आहे पूर्वाश्रमीचे गोराई डंपिंग ग्राउंड. फोटो गोराई खाडीतल्या बोटीमधून घेतला आहे. ही कचर्‍याची टेकडी जवळ जवळ ८ मजली इमारती इतकी उंच आहे आणि १७ एकर जागेवर पसरली आहे. आता अत्याधुनीक तंत्रज्ञान वापरून हिच्यावर हिरवळ निर्माण करण्यात आली आहे. कचर्‍याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन करून, वर माती टाकून तिथे इको गार्डन बनवण्यात येत आहे. येत्या काही वर्षातच ह्या जागेचा पूर्ण कायापालट झाला असेल. कचर्‍यातून निर्माण होणार्‍या मिथेन गॅसचा उपयोग वीज निर्मीती साठी करण्यात येणार आहे. हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. लवकरच आजूबाजूच्या इमारतींचे भाव (अजूनच) गगनाला भिडतील. सी-फेसींग अशी जाहिरात असणार्‍या नव्या इमारतीही उभा राहतील. ह्या फोटोचे चपखल वर्णन करणारी म्हण म्हणजे 'दुरून डोंगर साजरे' :) मुंबईतील एकूण ८० हेक्टर जागेवर डंपिंग ग्राउंड्स पसरली आहेत. त्या सगळ्यांचीच वाटचाल ह्या दिशेने होणार आहे.

नन्दादीप, वडापाव आणि प्रभो ह्यांना कबूल केल्याप्रमाणे बगिचा जनतेसाठी खुला होताच ह्या ठिकाणाची सहल घडवण्यात येईल.