ओळखा पाहू ही नयनरम्य टेकडी कुठे आहे? ओळखणार्या माझ्याकडून ह्या परिसराची मोफत सहल.
हिंट - हे ठिकाण मुंबईत / मुंबई जवळ आहे.
नम्र सूचना - जे इथे येऊन गेले आहेत त्यांनी कॄपया उत्तर फोडू नये. नव्या लोकांना वाव द्यावा.
माझ्या माहितीत मुंबईत ज्या ४ नद्या आहेत त्या या....
मीठी नदी.
दहिसरची नदी.
पोईसरची नदी.
ओशिवारा येथील नदी.
वर अॅडीने दिलेली स्वच्छ नदी मी तरी आजवर पाहिली नाही.
हे आहे पूर्वाश्रमीचे गोराई डंपिंग ग्राउंड. फोटो गोराई खाडीतल्या बोटीमधून घेतला आहे.
ही कचर्याची टेकडी जवळ जवळ ८ मजली इमारती इतकी उंच आहे आणि १७ एकर जागेवर पसरली आहे. आता अत्याधुनीक तंत्रज्ञान वापरून हिच्यावर हिरवळ निर्माण करण्यात आली आहे. कचर्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन करून, वर माती टाकून तिथे इको गार्डन बनवण्यात येत आहे. येत्या काही वर्षातच ह्या जागेचा पूर्ण कायापालट झाला असेल. कचर्यातून निर्माण होणार्या मिथेन गॅसचा उपयोग वीज निर्मीती साठी करण्यात येणार आहे. हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
लवकरच आजूबाजूच्या इमारतींचे भाव (अजूनच) गगनाला भिडतील. सी-फेसींग अशी जाहिरात असणार्या नव्या इमारतीही उभा राहतील.
ह्या फोटोचे चपखल वर्णन करणारी म्हण म्हणजे 'दुरून डोंगर साजरे' :)
मुंबईतील एकूण ८० हेक्टर जागेवर डंपिंग ग्राउंड्स पसरली आहेत. त्या सगळ्यांचीच वाटचाल ह्या दिशेने होणार आहे.
पवइ तलाव
गोराई... डम्पिंग ग्राऊंड...
In reply to गोराई... डम्पिंग ग्राऊंड... by नन्दादीप
असेच म्हंतो....
In reply to असेच म्हंतो.... by वपाडाव
मी पण हेच म्हणतो.
एखाद्या नदि तीरावर असावी
In reply to एखाद्या नदि तीरावर असावी by आचारी
मुंबीत नदी? आणि ती ही इतकी
गणपा !! फोटो मधे मागे उन्च
In reply to गणपा !! फोटो मधे मागे उन्च by आचारी
माझ्या माहितीत मुंबईत ज्या
वाइल्ड गेस
माझा गेस
हनुमान टेकडी.
घारपुरी बेट आहे का हे ?
निकाल कधी?
निकाल
नन्दादीप, वडापाव आणि प्रभो