ऑन फायरींग अ सेल्स्मन - कविता
"ऑन फायरींग अ सेल्स्मन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे.
रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो.
त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते. एकंदर आयुष्याच्या संध्याकाळी सगळं खूप अवघड होऊन बसलं आहे.
त्यातच भर म्हणून त्याची नोकरी जाते. त्याला काढून टाकले जाते. कारण? त्याचे वय!!! तो वयस्क आहे, त्याचे प्रॉडक्ट खपत नाही. अणि आपल्या कामामधे जीवाचा आटापीटा करणार्या अशा या विक्रेत्याचा जणू आपण खून करतोय, त्याला नोकरीवरून काढून टाकून त्याचं आयुष्य जगायची कारणंच आपण उध्वस्त करतोय हेही कोणाच्या खिजगणतीत येत नाही.
अशी विक्रेत्याची व्यथा मांडणारी जेम्स ऑट्री यांची ही" चित्रमय करूण कविता आहे.
___________
ही कविता वाचून २ दिवस तरी मी अस्वस्थ होते. कोणीतरी मला पूर्वी म्हणालं होतं - आपल्याला आहोत तिथे राहण्याकरता देखील सतत धावावं लागतं कारण जग धावतं आहे.
नोकरीत अनुभव आणि तरुण रक्त हा संघर्ष नवा नाही. आणि तो अपरिहार्य आहे. वरील कविता किती जणांना अपील होईल माहीत नाही. मला खूप आवडली..... पेक्षा चटका बसला.
याद्या
2319
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
जीवन जगण्यासाठीचा संघर्ष
कविता आणि तुमचे त्यावरचे
शुचिताइंनी करून दिलेला या र्हदयस्पर्शी कवितेचा परिचय
मस्त!
In reply to शुचिताइंनी करून दिलेला या र्हदयस्पर्शी कवितेचा परिचय by चित्रगुप्त
*यला, या अमेरीकन ड्रीमचा
छान
अपील..
सर्व प्रतिक्रियाकर्त्यांचे
कवीता मागेही ऐकली होती.. विषय
"A salesman is got to dream, boy. It comes with the territory”
छान लिहिलेत.भावना