सोलकढी

जागु's picture
जागु in पाककृती
3 Aug 2011 - 2:48 pm

साहित्य
१ ओला नारळ खरवडून.
१५-२० कोकमे (आमसुल)
४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल)
१ चमचा जिर
तुप
कढीपत्ता
साखर
मिठ
मिरची पुड पाव ते अर्धा चमचा

पाककृती
कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा.

खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते.

जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या.

कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला.

आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट.
(कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे)

अधिक टिपा:
सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते.
ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये.
हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2011 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

बहुतांश हाटेलात.

भारी दिसते आहे ग. आमची आवडती सोलकढी म्हणजे एस.पी.'ज ची.

वसईचे किल्लेदार's picture

3 Aug 2011 - 3:00 pm | वसईचे किल्लेदार

मस्तच!
कोकमा ऐवजी आगूळ पण छान लागते. फोडणीची सोलकढि भातावर छान लागते ...

(आमचा अनुभव)

चिंतामणी's picture

3 Aug 2011 - 11:56 pm | चिंतामणी

आणि मिरची ऐवजी मिरपुड जास्त छान चव आणते.(फोडणी शिवाय).

पियुशा's picture

3 Aug 2011 - 3:03 pm | पियुशा

झक्कास ! :)

सोलकढीची चव अजूनही तोंडात रेंगाळत आहे.

तिसरा फोटो स्ट्रोबेरी पावडर टाकलेल्या दुधासारखा दिसतोय.

गणपा's picture

3 Aug 2011 - 3:42 pm | गणपा

आम्ही यात लाल तिखटाच्या फोडणी ऐवजी, नारळ वाटताना लसणासोबत एक हिरवी मिरची टाकतो.
फोडणी फक्त जिर्‍याची अस्स्ल साजुक तुपातली आणि वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर. :)
करावी म्हणतो आजच. :)

सुमो's picture

3 Aug 2011 - 4:06 pm | सुमो

लाल तिखटाच्या फोडणी ऐवजी, नारळ वाटताना लसणासोबत एक हिरवी मिरची टाकतो.
फोडणी फक्त जिर्‍याची अस्स्ल साजुक तुपातली आणि वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर.

अगदी अशीच सोलकढी, मासे आणि गरमागरम भात असला की....
ब्रम्हानंदी टाळी लागतेच माझी....

आम्ही यात लाल तिखटाच्या फोडणी ऐवजी, नारळ वाटताना लसणासोबत एक हिरवी मिरची टाकतो

आम्ही पण!

करावी म्हणतो आजच. Smile

करावीच लागणार!

मेघवेडा's picture

3 Aug 2011 - 4:17 pm | मेघवेडा

हिरवी मिर्ची, आलं आणि हिंगं मष्टं हो! लाल तिखटाचा रंग सोलकढीला बरा दिसत नाही कारण मुळात सोलांचा/आगळाचा गुलाबी रंग लपतो त्यामुळे.. जागुतै, सोलकढी तशी सात्त्विक रूपाची असावी असं माझं नेहमीप्रमाणे ठाम मत आहे. ती शेवटच्या फोटोत (लाल तिखटामुळे) तशी दिसत नसल्याने शेवटचा फोटो आवडला नाही. शेवटून दुसरा ब्येष्ट आहे.

सोलकढीत चमचाभर दही किंवा थोडं ताक घातलं की खल्लास! गणपाभौ, फोटू टाक रे केलीस की. त्यातही प्रेझेंटेशन मध्ये काहीतरी कारागिरी करशीलच! :)

पांथस्थ's picture

3 Aug 2011 - 6:53 pm | पांथस्थ

लाल तिखटाचा रंग सोलकढीला बरा दिसत नाही कारण मुळात सोलांचा/आगळाचा गुलाबी रंग लपतो त्यामुळे.. जागुतै,

एकदम सहमत!

सोलकढी तशी सात्त्विक रूपाची असावी असं माझं नेहमीप्रमाणे ठाम मत आहे.

गुलाबी रंग आणी सात्विक! ये बात कुछ हजम नहि हुइ ;)

स्पा's picture

4 Aug 2011 - 2:34 pm | स्पा

हिरवी मिर्ची, आलं आणि हिंगं मष्टं हो! लाल तिखटाचा रंग सोलकढीला बरा दिसत नाही कारण मुळात सोलांचा/आगळाचा गुलाबी रंग लपतो त्यामुळे.. जागुतै, सोलकढी तशी सात्त्विक रूपाची असावी असं माझं नेहमीप्रमाणे ठाम मत आहे. ती शेवटच्या फोटोत (लाल तिखटामुळे) तशी दिसत नसल्याने शेवटचा फोटो आवडला नाही. शेवटून दुसरा ब्येष्ट आहे.

हेच म्हणतो

चित्रा's picture

3 Aug 2011 - 8:10 pm | चित्रा

असेच.

बाकी जागुताईंमुळे आज आता सोलकढी करावीच लागणार.

हो मी सुद्धा लाला तिखट नाही घालत. हिरवी मिरची, आलं, लसूण घालते. आणि साजूक तूपाची फक्त जिर्‍याची फोडणी. आणि वरून हिरवी कोथिंबीर.
:)

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2011 - 11:42 am | स्वाती दिनेश

फोडणी फक्त जिर्‍याची अस्स्ल साजुक तुपातली आणि वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर.
अगदी असेच..
हिरवी मिरचीच घालते मी सुध्दा, आणि लसूण नाही घालत,
स्वाती

विशाखा राऊत's picture

3 Aug 2011 - 3:55 pm | विशाखा राऊत

आई नेहमी एक हिरवी मिर्ची घालते..
मस्त चिकन, आंबोळ्या, वाफाळता भात आणि सोलकढी..
आहाहाहा.. :)

यात आलेही घालतात ना????

आम्ही आलं आणि हिर्वी मिर्चीही घालतो.
नो फोडणी.
प्रत्येकाची वेगळी पद्धत असते.;)

सानिकास्वप्निल's picture

3 Aug 2011 - 5:25 pm | सानिकास्वप्निल

मस्तच दिसतेय.....आम्हीपण सोलकढीत हिरवी मिरची वाटून घालतो :)

श्रावण मोडक's picture

3 Aug 2011 - 5:35 pm | श्रावण मोडक

छळवादी आहेस अगदी. ;)

छान.. आगळ म्हणजे कोकम लिक्विड का? कोकमचे लिक्विड वापरुन सोल्कधी होते का?

हो. पण यात साखर नसते.

कोकमचे लिक्विड वापरुन सोल्कधी होते का?

उत्तम होते. नव्हे जास्त चांगली होते.

योगप्रभू's picture

3 Aug 2011 - 7:01 pm | योगप्रभू

आम्ही भाजलेले जिरे, लसूण पाकळ्या आणि मिरची हे खोबर्‍याबरोबरच मिक्सरमधून वाटून घेतो आणि मग त्याचे दूध काढतो. त्यामुळे या पदार्थांचा अर्क व स्वाद सोलकढीत पुरेपूर उतरतो.

बाकी कट्टर लसूणप्रेमी असल्याने सोलकढी झाल्यानंतरही कच्च्या दोन लसूण पाकळ्या अगदी बारीक तुकडे करुन टाकतो. लसूण आणि ऑप्शनल? कब्बी नै बाब्बा :)

मस्त कलंदर's picture

3 Aug 2011 - 7:04 pm | मस्त कलंदर

आगळ वापरून नक्की कशी करायची ब्वॉ ही सोलकढी ???

रेशिपी आवडली पण कोकमाशी आमची अंमळ वाकडीक असल्याने कोकम सरबत, सोलकढी यांना दूरुनच रामराम असतो.

धमाल मुलगा's picture

3 Aug 2011 - 7:38 pm | धमाल मुलगा

जगातलं एक बहारदार पेय! केवळ अप्रतिम!!

जागुताई झिंदाबाद! :)

बाकी, आमचे मनिषरावही सोलकढी छानच करतात हों! त्याच्याहातची सोलकढी म्हणजे काय म्हाराजा.... मी तर पानं वाढून होईतो एखाद-दुसरी वाटी फस्त करुन मोकळा! मग आमच्या कारभारणीला अग्गदीच लाजल्यागत वगैरे होतं.."कुठ्ठं न्यायच्या लायकीचं नाही! लाज..लाज आणतो अग्गदी!" वगैरे डायलॉग कानात गुणगुणतातच. पण सोलकढी पिण्याच्या आनंदापुढं ते सगळं फिक्कं!

बा मनिषा,
कधी येऊ रे पुन्हा जेवायला? :)

तुम्हाला हेही पेय आवडतं धामालभौ?
भाग्य उजळलं म्हणायचं.........या पेयाचं!;)

धमाल मुलगा's picture

3 Aug 2011 - 9:15 pm | धमाल मुलगा

अवघडच झालं म्हणायचं आता.

'धम्या बदनाम हुआ, दारु तेरे प्यार में' असंच गात फिरावं काय? ;)

चिंतामणी's picture

4 Aug 2011 - 12:11 am | चिंतामणी

From Cartoons I like" alt="" />

उगाच बदनाम करता बिचा-याला. :)

५० फक्त's picture

4 Aug 2011 - 6:56 am | ५० फक्त

काका, ते फोटुच्या खाली ''Cartoons I like'' हे चुकुन आलंय का मनिच्या गुजगोष्टी आहेत,

आणि धमुशेट या पांढ-या कॉकटेल विषयी बोलला होता सांदणला जाताना, फार चांगल लागत नाही म्हणुन बराच वेळ लागला त्याला सपवायला, बरोबर आहे व्हिस्की आणि रम मध्ये व्हिपड क्रिम घातल्यावर फार चांगल लागणार नाही असा माझा अंदाज आहे, हो ना रे धमु, तेच ना हे कॉकटेल.

धमाल मुलगा's picture

4 Aug 2011 - 2:10 pm | धमाल मुलगा

काय राव चिंका, अपुनके इमेजकु धक्का बसता है ना राव ऐशे फोटो दिखते तो. ;)

>बरोबर आहे व्हिस्की आणि रम मध्ये व्हिपड क्रिम घातल्यावर फार चांगल लागणार नाही असा माझा अंदाज आहे
बराबर है. क्रिमची मातब्बरी ब्रॅन्डी आणि ब्लॅक कॉफीसोबत. चुकीच्या मिक्सिंगने चांगल्या पेयाचा चुथडा होतो राव.

>>हो ना रे धमु, तेच ना हे कॉकटेल.
ह्या:! कैतरी काय ? साला आपल्याला काय चॉईस टेस्ट है का ना?
तो दिवस होता मिष्टर एम.के.गांधी ह्यांच्या वर्षश्राध्दाचा. त्यामुळं सर्कारी आदेशामुळं सगळीकडं कोरडं वातावरण. मग आम्हीही श्रध्दांजली वाहून चित्तशुध्दीकरिता ग्लासभर दूध अन फळं घेतली. तेव्हाचा तो फोटो आहे.

आता मी तुमच्या पद्धतीने करुन बघेन. नक्कीच छान होईल. धन्यवाद सगळ्यांचेच प्रतिसादाबद्दल.

पिंगू's picture

4 Aug 2011 - 11:40 am | पिंगू

आज सोलकढीचा बेत पक्का..

- पिंगू

झकास.. चटकदार. पाकृबद्दल धन्यवाद. मी जमेल तशी मनाने सोलकढी बनवायचो. पण आता अचूक कृती कळली.

मस्त..

कोकणात एक ताकतव किंवा ताकतई म्हणून असते. (शब्द/उच्चार याची खात्री नाही. पण ताकतई किंवा तत्सम नाव असावे. चूभूद्याघ्या.) तो बहुधा साधाच पदार्थ असावा, पण माहीत असल्यास त्याचीही माहिती दिल्यास आनंद होईल.

ताकतई म्हणजे बेसिकली ताकाची कढी. सगळं वरच्या सारखंच फक्त सोलाच्या पाण्याऐवजी ताक घ्यायचं! आणि थोऽडीशी साखर घालायची, मस्त चव येते.

कढीच होय. मला काहीतरी वेगळं असेल असं वाटलं होतं.

थँक्स..

परिकथेतील राजकुमार's picture

4 Aug 2011 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार

सोलकढी अंडे घालुन कसे करतात ह्याची पाकॄ कोणी देईल काय ?

मी एकदा केली होती पण असा गुलाबी रंग आला नव्हता.

(स्त्री सदस्यांच्या धाग्यावर पुरुष सदस्यांनी अक्कल पाजळायची आजकाल फ्याशन आहे म्हणून बळच हा प्रश्न विचारला गेल्या आहे)

पराचारी (निट वाचावे. दुराचारी असे वाचून स्वतःचे हसे करुन घेऊ नये)

ह. आता मिरचीच घालणार मी म्हणजे रंग चांगला दिसेल कढीचा. मला पण थोड खटकत होतच मिरचीपुड बद्दल.

विजुभाऊ's picture

4 Aug 2011 - 4:54 pm | विजुभाऊ

मदत हवी आहे
Submitted by परिकथेतील राजकुमार on Thu, 04/08/2011 - 16:06.

सोलकढी अंडे घालुन कसे करतात ह्याची पाकॄ कोणी देईल काय ?

मी एकदा केली होती पण असा गुलाबी रंग आला नव्हता.
कमाल आहे हो . अंडे घालून सोलकढी फक्त पक्षी/पाली/झुरळे इत्यादी अंडे घालणार्‍या जमातीनाच जमू शकेल.
अवांतरः परा............ कोल्हापुरला आलास तर लोक तुला काय डोक्यावर पडलासका असे विचारतील.
उद्या तू श्रीखंडात किंवा बासुंदीत अंडे कच्चेच टाकावे की फेटून टाकावे असे ही विचारशील

पंगा's picture

4 Aug 2011 - 7:59 pm | पंगा

अंडे घालून सोलकढी फक्त पक्षी/पाली/झुरळे इत्यादी अंडे घालणार्‍या जमातीनाच जमू शकेल.

अंडे घालून सोलकढी फक्त पक्षी/पाली/झुरळे इत्यादी अंडे घालणार्‍या जमातीतील माद्यांनाच (पक्षी: स्त्रियांनाच) जमू शकेल.

कच्ची कैरी's picture

4 Aug 2011 - 7:53 pm | कच्ची कैरी

जागु ताई सोलकढीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद !उद्या नक्कीच करेल.

Blackcat's picture

10 Feb 2019 - 1:13 pm | Blackcat (not verified)

छान