मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोलकढी

जागु · · पाककृती
साहित्य १ ओला नारळ खरवडून. १५-२० कोकमे (आमसुल) ४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल) १ चमचा जिर तुप कढीपत्ता साखर मिठ मिरची पुड पाव ते अर्धा चमचा पाककृती कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा. खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते. जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या. कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला. आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट. (कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे) अधिक टिपा: सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते. ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये. हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

वाचने 30303 वाचनखूण प्रतिक्रिया 41

गणपा Wed, 08/03/2011 - 15:42
आम्ही यात लाल तिखटाच्या फोडणी ऐवजी, नारळ वाटताना लसणासोबत एक हिरवी मिरची टाकतो. फोडणी फक्त जिर्‍याची अस्स्ल साजुक तुपातली आणि वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर. :) करावी म्हणतो आजच. :)

In reply to by गणपा

सुमो Wed, 08/03/2011 - 16:06
लाल तिखटाच्या फोडणी ऐवजी, नारळ वाटताना लसणासोबत एक हिरवी मिरची टाकतो. फोडणी फक्त जिर्‍याची अस्स्ल साजुक तुपातली आणि वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर. अगदी अशीच सोलकढी, मासे आणि गरमागरम भात असला की.... ब्रम्हानंदी टाळी लागतेच माझी....

In reply to by गणपा

पांथस्थ Wed, 08/03/2011 - 16:10
आम्ही यात लाल तिखटाच्या फोडणी ऐवजी, नारळ वाटताना लसणासोबत एक हिरवी मिरची टाकतो
आम्ही पण!
करावी म्हणतो आजच. Smile
करावीच लागणार!

In reply to by गणपा

मेघवेडा Wed, 08/03/2011 - 16:17
हिरवी मिर्ची, आलं आणि हिंगं मष्टं हो! लाल तिखटाचा रंग सोलकढीला बरा दिसत नाही कारण मुळात सोलांचा/आगळाचा गुलाबी रंग लपतो त्यामुळे.. जागुतै, सोलकढी तशी सात्त्विक रूपाची असावी असं माझं नेहमीप्रमाणे ठाम मत आहे. ती शेवटच्या फोटोत (लाल तिखटामुळे) तशी दिसत नसल्याने शेवटचा फोटो आवडला नाही. शेवटून दुसरा ब्येष्ट आहे. सोलकढीत चमचाभर दही किंवा थोडं ताक घातलं की खल्लास! गणपाभौ, फोटू टाक रे केलीस की. त्यातही प्रेझेंटेशन मध्ये काहीतरी कारागिरी करशीलच! :)

In reply to by मेघवेडा

पांथस्थ Wed, 08/03/2011 - 18:53
लाल तिखटाचा रंग सोलकढीला बरा दिसत नाही कारण मुळात सोलांचा/आगळाचा गुलाबी रंग लपतो त्यामुळे.. जागुतै,
एकदम सहमत!
सोलकढी तशी सात्त्विक रूपाची असावी असं माझं नेहमीप्रमाणे ठाम मत आहे.
गुलाबी रंग आणी सात्विक! ये बात कुछ हजम नहि हुइ ;)

In reply to by मेघवेडा

स्पा गुरुवार, 08/04/2011 - 14:34
हिरवी मिर्ची, आलं आणि हिंगं मष्टं हो! लाल तिखटाचा रंग सोलकढीला बरा दिसत नाही कारण मुळात सोलांचा/आगळाचा गुलाबी रंग लपतो त्यामुळे.. जागुतै, सोलकढी तशी सात्त्विक रूपाची असावी असं माझं नेहमीप्रमाणे ठाम मत आहे. ती शेवटच्या फोटोत (लाल तिखटामुळे) तशी दिसत नसल्याने शेवटचा फोटो आवडला नाही. शेवटून दुसरा ब्येष्ट आहे. हेच म्हणतो

In reply to by गणपा

चित्रा Wed, 08/03/2011 - 20:10
असेच. बाकी जागुताईंमुळे आज आता सोलकढी करावीच लागणार.

In reply to by गणपा

प्राजु Wed, 08/03/2011 - 21:00
हो मी सुद्धा लाला तिखट नाही घालत. हिरवी मिरची, आलं, लसूण घालते. आणि साजूक तूपाची फक्त जिर्‍याची फोडणी. आणि वरून हिरवी कोथिंबीर. :)

In reply to by गणपा

स्वाती दिनेश गुरुवार, 08/04/2011 - 11:42
फोडणी फक्त जिर्‍याची अस्स्ल साजुक तुपातली आणि वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर. अगदी असेच.. हिरवी मिरचीच घालते मी सुध्दा, आणि लसूण नाही घालत, स्वाती

विशाखा राऊत Wed, 08/03/2011 - 15:55
आई नेहमी एक हिरवी मिर्ची घालते.. मस्त चिकन, आंबोळ्या, वाफाळता भात आणि सोलकढी.. आहाहाहा.. :)

In reply to by निवेदिता-ताई

रेवती Wed, 08/03/2011 - 19:08
आम्ही आलं आणि हिर्वी मिर्चीही घालतो. नो फोडणी. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते.;)

In reply to by JAGOMOHANPYARE

चिंतामणी गुरुवार, 08/04/2011 - 00:05
हो. पण यात साखर नसते. कोकमचे लिक्विड वापरुन सोल्कधी होते का? उत्तम होते. नव्हे जास्त चांगली होते.

योगप्रभू Wed, 08/03/2011 - 19:01
आम्ही भाजलेले जिरे, लसूण पाकळ्या आणि मिरची हे खोबर्‍याबरोबरच मिक्सरमधून वाटून घेतो आणि मग त्याचे दूध काढतो. त्यामुळे या पदार्थांचा अर्क व स्वाद सोलकढीत पुरेपूर उतरतो. बाकी कट्टर लसूणप्रेमी असल्याने सोलकढी झाल्यानंतरही कच्च्या दोन लसूण पाकळ्या अगदी बारीक तुकडे करुन टाकतो. लसूण आणि ऑप्शनल? कब्बी नै बाब्बा :)

धमाल मुलगा Wed, 08/03/2011 - 19:38
जगातलं एक बहारदार पेय! केवळ अप्रतिम!! जागुताई झिंदाबाद! :) बाकी, आमचे मनिषरावही सोलकढी छानच करतात हों! त्याच्याहातची सोलकढी म्हणजे काय म्हाराजा.... मी तर पानं वाढून होईतो एखाद-दुसरी वाटी फस्त करुन मोकळा! मग आमच्या कारभारणीला अग्गदीच लाजल्यागत वगैरे होतं.."कुठ्ठं न्यायच्या लायकीचं नाही! लाज..लाज आणतो अग्गदी!" वगैरे डायलॉग कानात गुणगुणतातच. पण सोलकढी पिण्याच्या आनंदापुढं ते सगळं फिक्कं! बा मनिषा, कधी येऊ रे पुन्हा जेवायला? :)

In reply to by चिंतामणी

५० फक्त गुरुवार, 08/04/2011 - 06:56
काका, ते फोटुच्या खाली ''Cartoons I like'' हे चुकुन आलंय का मनिच्या गुजगोष्टी आहेत, आणि धमुशेट या पांढ-या कॉकटेल विषयी बोलला होता सांदणला जाताना, फार चांगल लागत नाही म्हणुन बराच वेळ लागला त्याला सपवायला, बरोबर आहे व्हिस्की आणि रम मध्ये व्हिपड क्रिम घातल्यावर फार चांगल लागणार नाही असा माझा अंदाज आहे, हो ना रे धमु, तेच ना हे कॉकटेल.

In reply to by ५० फक्त

धमाल मुलगा गुरुवार, 08/04/2011 - 14:10
काय राव चिंका, अपुनके इमेजकु धक्का बसता है ना राव ऐशे फोटो दिखते तो. ;) >बरोबर आहे व्हिस्की आणि रम मध्ये व्हिपड क्रिम घातल्यावर फार चांगल लागणार नाही असा माझा अंदाज आहे बराबर है. क्रिमची मातब्बरी ब्रॅन्डी आणि ब्लॅक कॉफीसोबत. चुकीच्या मिक्सिंगने चांगल्या पेयाचा चुथडा होतो राव. >>हो ना रे धमु, तेच ना हे कॉकटेल. ह्या:! कैतरी काय ? साला आपल्याला काय चॉईस टेस्ट है का ना? तो दिवस होता मिष्टर एम.के.गांधी ह्यांच्या वर्षश्राध्दाचा. त्यामुळं सर्कारी आदेशामुळं सगळीकडं कोरडं वातावरण. मग आम्हीही श्रध्दांजली वाहून चित्तशुध्दीकरिता ग्लासभर दूध अन फळं घेतली. तेव्हाचा तो फोटो आहे.

गवि गुरुवार, 08/04/2011 - 14:28
झकास.. चटकदार. पाकृबद्दल धन्यवाद. मी जमेल तशी मनाने सोलकढी बनवायचो. पण आता अचूक कृती कळली. मस्त.. कोकणात एक ताकतव किंवा ताकतई म्हणून असते. (शब्द/उच्चार याची खात्री नाही. पण ताकतई किंवा तत्सम नाव असावे. चूभूद्याघ्या.) तो बहुधा साधाच पदार्थ असावा, पण माहीत असल्यास त्याचीही माहिती दिल्यास आनंद होईल.

In reply to by गवि

मेघवेडा गुरुवार, 08/04/2011 - 14:58
ताकतई म्हणजे बेसिकली ताकाची कढी. सगळं वरच्या सारखंच फक्त सोलाच्या पाण्याऐवजी ताक घ्यायचं! आणि थोऽडीशी साखर घालायची, मस्त चव येते.

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/04/2011 - 16:06
सोलकढी अंडे घालुन कसे करतात ह्याची पाकॄ कोणी देईल काय ? मी एकदा केली होती पण असा गुलाबी रंग आला नव्हता. (स्त्री सदस्यांच्या धाग्यावर पुरुष सदस्यांनी अक्कल पाजळायची आजकाल फ्याशन आहे म्हणून बळच हा प्रश्न विचारला गेल्या आहे) पराचारी (निट वाचावे. दुराचारी असे वाचून स्वतःचे हसे करुन घेऊ नये)

विजुभाऊ गुरुवार, 08/04/2011 - 16:54
मदत हवी आहे Submitted by परिकथेतील राजकुमार on Thu, 04/08/2011 - 16:06. सोलकढी अंडे घालुन कसे करतात ह्याची पाकॄ कोणी देईल काय ? मी एकदा केली होती पण असा गुलाबी रंग आला नव्हता. कमाल आहे हो . अंडे घालून सोलकढी फक्त पक्षी/पाली/झुरळे इत्यादी अंडे घालणार्‍या जमातीनाच जमू शकेल. अवांतरः परा............ कोल्हापुरला आलास तर लोक तुला काय डोक्यावर पडलासका असे विचारतील. उद्या तू श्रीखंडात किंवा बासुंदीत अंडे कच्चेच टाकावे की फेटून टाकावे असे ही विचारशील

In reply to by विजुभाऊ

पंगा गुरुवार, 08/04/2011 - 19:59
अंडे घालून सोलकढी फक्त पक्षी/पाली/झुरळे इत्यादी अंडे घालणार्‍या जमातीनाच जमू शकेल.
अंडे घालून सोलकढी फक्त पक्षी/पाली/झुरळे इत्यादी अंडे घालणार्‍या जमातीतील माद्यांनाच (पक्षी: स्त्रियांनाच) जमू शकेल.

कच्ची कैरी गुरुवार, 08/04/2011 - 19:53
जागु ताई सोलकढीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद !उद्या नक्कीच करेल.