कायम touch मध्ये असूनही
संवाद कुठे तरी हरवलेला आहे...
कायम कट्ट्यावर log -in असूनही
विषयाचा नेहमीचं वानवा आहे..
कायम available असूनही
जवळ कोणीच नाही...
सारखे profile visit करूनही
सारे अनभिज्ञच आहे...
टेक-क्रांती होऊनही
मानवी उत्क्रांती अजूनही अनुत्तरीतच आहे...