प्रेमाचा पंचनामा - १
लेखनविषय (Tags)
प्रेरणा - प्यार का पंचनामा ( फुलाभोवती रुंजी घालणार्या प्रत्येक भुंग्याने पहावा असा हिंदी चित्रपट)
विकेंड अगदी झकास गेला होता. आहेच आमचं शेखाडी गाव तसं. नितांत सुंदर. वरच्या अंगाला छोटासा डोंगर जो आम्हाला खुप मोठा डोंगर वाटतो. खालच्या अंगाला किनार्यावरील खडकरांगांशी टकरा घेणारा पांढराशुभ्र समुद्र. आणि या दोहोंच्या मधून जाणारा धड कच्चाही नाही आणि धड डांबरीही नाही असा रस्ता. काही ठीकाणी तर समुद्राच्या लाटा केवळ चार पाच फुट उंचीवर असलेल्या रस्त्याला टकरा मारतात. सारं काही इतकं सुंदर अगदी कॅलिफोर्नियाच्या स्टेट रुट १ वरील हाफ मुन किंवा बिग सर बीचची आठवण यावी. आणि आमचं गावही तसं दोन प्रसिद्ध ठीकाणांच्या रस्त्यावर आहे. दिवेआगरवरुन हरीहरेश्वरला जाताना तुम्ही श्रीवर्धनकडे जाण्यासाठी मुंबईच्या पुण्याच्या परतीच्या वाटेला न लागता, शेखाडीवरुन समुद्रकिनार्याला चिकटून जाणारा श्रीवर्धनला जाणारा शॉर्टकट पकडायचा की झालं.
आज सकाळी लवकर उठलो. तसा दोन दिवस हव्यातशा उनाडक्या केल्यावर सोमवारी सकाळी लवकर उठायला जीवावर येतं. पण काय करणार. पापी पेट का सवाल असलयामुळे करावं मागतं सारं. छोटया भावाने दिन्याने बाईकवर श्रीवर्धनला सोडलं. श्रीवर्धन - पुणे लाल डब्ब्यानं दहाला डेक्कनला. तिथून मायमाऊली पीएमटीने पंधरा वीस मिनिटांत सार्या दुनियाभराचे अनुभव घेत शिवाजीनगरला.
ऑफीसला आल्यावर क्लायंटच्या मेलबॉक्समधील सगळ्या मेली चेक केल्या. लाल टीळा लावलेल्या अर्जंट मेलींना उत्तरे दिली. आता नंबर आमच्या ऑफीसच्या मेलींचा. ही एक नसती पनवती असते तिज्यायला. आमचं आख्खं युनिट क्लायंटच्या नेटवर्कवर आहे. आणि मशिनही क्लायंटच्याच आहेत. पण दोन दिवसाआड का होईना पण ऑफिसच्या मशीनवर बसून त्या मेली चेक कराव्या लागतात. आणि साला सहाशे लोकांच्या फ्लोअरवर मोजून चार मशिनी ऑफिसच्या. आणि चारमधल्या एकातरी मशिनला रोज काही ना काही झालेलं असतं. आज काय तर मशिन डोमेनवर नाही उदया काय तर तुमचा प्रोफाईल करप्ट झाला आहे. रोज नवीन दुखणं. पण ईलाज नाही. पूर्वी मी पंधरा पंधरा दिवस ऑफिसच्या मेली पाहत नसे. हल्ली करावं लागतं. साला आमच्या फ्लोअरवरचं स्वाईप मशिन गंडलं आहे. दोन दोन वेळा कार्ड घासूनही लेकाचं एंट्री करत नाही. आणि मग ऑफिसच्या मेलबॉक्समध्ये मेल येते पंचिंग मिस्ड म्हणून. मग अटेंडन्स रेगुलराईज करावी लागते. च्यायला काम बीम गेलं भोकात. हजेरी महत्त्वाची.
आणि म्हणून ही दोन दोन मेलबॉक्स चेक करण्याची भेंचोतगिरी रोज करावी लागते.
झालं एकदांचं. काम काही विशेष नव्हतं. आणि असलं तरी ते फाटयावर कसं मारायचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे.
चकाटया पिटायच्या म्हणून अमरींदरच्या डेस्कवर गेलो. अमरींदर आमच्या टीममधला एक च्युत्या सरदार पोरगा. दिसायलाही असातसाच पण साला बोलायचा असा की जसं काय आतापर्यंत शंभर पोरींवर हात साफ करुन झालाय. नाही म्हणायला भोसडीचा कुठल्याही पोरीशी ओळख काढून लगेच तिला पकवायला सुरुवात करतो. पण ते तर आम्हालाही जमेल की. आता आम्ही तसला फालतूपणा करत नाही ही गोष्ट वेगळी. पण साल्याशी ईकडच्या तिकडच्या गोष्टी करताना मस्त टाईमपास होतो. कधी कधी जाम भारी आयटम देतो. म्हणून मग त्याला हरभर्याच्या झाडावर चढवून आम्ही दोन तीन मराठी पोरं मस्त मजा घेत बसतो.
"क्या किया बे भोसडीके दो दिन? बोल रहा था चल पिकनिकको. आया नही साले" साहेबांनी स्वतःहून सुरुवात केली.
विकेंडला आमच्या युनिटची पिकनिक होती. दरवर्षी असते. आख्ख्या बाराशे जणांच्या युनिटचा एकच क्लायंट आहे. टीम मुंबई, पुणे आणि चेन्नई, सॅन फ्रान्सिस्को अशा चार ऑफीसमधून काम करते. यातल्या मुंबई आणि पुण्याच्या टीम मेंबर्सची दरवर्षी पिकनिक होते. क्लायंट स्पॉन्सर्ड. मुंबई आणि पुणे अश्या दोन्ही सब टीमना सोयीचं पडेल असं जुन्या मुंबई पुणे रोडवर एखादं रीसॉर्ट बुक केलं जातं. मग काय साला सगळा तमाशा. खायचं प्यायचं आणि रात्रभर धुडगुस घालायचा. पोरंही या संधीचा बेकार फायदा उठवून जास्त झाल्याचा आव आणून पीएम, एसपीएमची आयमाय काढतात. इथे पोरं या शब्दाचा अर्थ "पोरं - पोरी" असा घ्यायचा. पोरीही काही कमी नाही करत. एकवेळ जास्त झालेल्या पोराला आवरता येतं पण पोरीला चढली की त्या रणरागिणीला आवरताना नाकी नऊ येतात. आपल्याला नाही आवडत सालं हे सगळं. मागची दोन वर्षे गेलो होतो. यावर्षी नाही गेलो.
"मेरा तो विकेंड मस्त था. तू बता. पिकनिक कैसा रहा?"
"अबे एकदम ढासू. रुक तुझे कुछ दिखाता हूं"
त्याने तुझे कुछ दिखाता हूं म्हटल्यावर मी कान टवकारले. मागेही त्याने एकदा असेच "रुक तुझे कुछ दिखाता हूं" म्हणून निकिता मिश्राचे फोटो दाखवले होते. निकिता आमच्या टेस्टींग टीमची बंदी. आमच्याच क्युबिकलच्या आसपास तिचं क्युबिकल होते. पोरगी तशी चालूच. मागच्या दोन वर्षांत आमच्या नजरेसमोर तिने तिघांना फीरवलं होतं. जे फोटो त्याने दाखवले होते ते फोटो म्हणजे नुसती आग होती आग. तिच्या टीचभर शॉर्टमधून शरीरसौष्ठव अगदी खडकवासला धरणाचं पाणी सोडल्यावर मुळा नदी जशी दुथडी भरुन वाहते तसं वाहत होतं. डोळे निवले वगैरे म्हणतात तसं झालं होतं आमचं पोरांचं.
"साले तेरे पास कहासे आयें ये फोटो" म्हटल्यावर त्याने दात विचकत "ओरकूट" असं सांगितलं.
"अबे लडकी कितनी भी चालू हो. ऐसे फोटो ओरकुटपें नही डालेगी. हमको च्युत्या मत बना."
"अबे तुम साले झंडू लोग हों. उसने ये फोटो ओरकुटपेंही डाले थे. सिर्फ सिलेक्टेड दोस्तोंके साथ शेयर किये थे. उसके ऐसेही एक दोस्त के साथ अपना चलता हैं. उसने निकालके दिये. तूम साला जो दिखा रहा हूं वोह देखो ना. कहासे आये, किसने दिये ये बेकार की बातें क्यूं कर रहे हों सालों".
आम्हीही मग फारशा चांभारचौकशा न करता त्या शॉर्टवाल्या फोटोंचा लुफ्त लुटला होता.
क्रमशः
प्रतिक्रिया
झकास
शिव्या टाळल्या तर उत्तम
नोंद केली आहे...
दमदार सुरूवात!
छान लिहित आहात.. फक्त काही
गणेशा
नाय हो
क.ड.क सुरूवात , पटकन पुढचा
लिहा ....
लवकर्र लिहायचं हं
पुणे बेलीज!
वा वा छान
छान
वाचते आहे
वाचतिये. बाकी अपशब्दांचं
+
प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा