Skip to main content

नेहमीच धडकी भरते...!

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 22/05/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींच्या प्राणाची तुळस बहरलेली पाहून आम्हांला मात्र धडकी भरली :) भरदार तुझ्या दिसण्याने नेहमीच धडकी भरते... ! झाडु घेउनी उभा ज़री बिन् दिक्कत ही अवतरते... ! तो तुझाच - खोलीमधला कुरतडला गाउन, सदरा... ! अन् तुझ्याच हाय कृपेने भार्येचा चढतो पारा... ! या मंत्रभारल्या वेळी मी इथे एकटा नाही... ! ते तुझेच - उंदिर,झुरळे मावश्या नि बोके काही... ! ही शांत, सुभगशी संध्या पण किंचित उदासवाणी... ! ओट्यावर, ज़मिनीवर ना सांडले दूध वा पाणी... ? झटक्यात उगवशी केव्हा मी वडे,भजी तळताना... ! मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना... ! तू नसूनसुद्धा असशी अडगळीत, माळ्यावरती... ! खुडबूड सततची चाले फडताळी, अवतीभवती... !
लेखनविषय:

वाचने 3203
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया