मेदुवडा

गणपा's picture
गणपा in पाककृती
20 Jul 2011 - 1:54 am

हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग.)
आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं.
लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली. बाकी कस काय ते पुढे .....

साहित्य :

२ वाट्या उडदाची डाळ.

१ वाटी बारीक चिरलेला कोबी.
१ मध्यम कांदा (बारीक चिरलेला).
२-३ मिरच्या (बारीक चिरलेल्या).
१ इंच आलं (लहान तुकडे करुन).
थोडीशी कोथिंबीर.
२ कडिपत्त्याची पाने.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.

कृती :
२-४ तास भिजत ठेवलेली उडदाची डाळ पाणी काढुन टाकुन थोडी भरड वाटुन घेतली.

वाटलेल्या पिठात कांदा, कोबी, आलं, मिरची, कडिपत्ता, कोथिंबीर आणि मीठ टाकुन एकत्र करुन घेतले.

एकीकडे कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवल.
एका स्वछ झिपलॉक /प्लॅस्टिकच्या पिशवीवर पीठाचा गोळा घेउन, हलक्या हाताने दाब देत वडा थापला. मधोमध एक छोटस भोक पाडल.
वडा अलगद हाताने उचलुन तेलात सोडला. (हे सगळं लिहायला/वाचायला कित्ती सोप्पय नाही? ;) )

पण शेवटी पोपट झालाच. पिशवी वरुन उचलत वडा तेलात सोडतानाच त्याने असा काही आकार घेतला की ज्याच नाव ते. मित्राला आणि मलाही भुक सपाटुन लागली होती. शेवटी मेदुवड्याच्या आकाराचा नाद सोडुन सरळ गोळाभजीच्या आकाराचे वडे केले.

चार पाच भज्या सदृश्य वडे पोटातल्या कावळ्यांना अर्पण केले. ते शांत झाल्यावर माझ्यातला 'कलाकार'(?) हट्ट सोडायला तयार होईना.
म्हणुन यावेळी हातावरच मेदुवड्याचा आकार देउन वडे सरळ तेलात सोडले.
वेडे वाकडे का होईनात पण या वेळेस मेदुवड्या सदृश्य लुक आला खरा. :)

नारळाच्या चटणी सोबत कुरकुरीत मेदुवडे.

प्रतिक्रिया

मस्त. मेदुवड्यात कोबीची पानं घालतात हे माहीत नव्हतं. चवीत कितपत फरक पडतो?

एरवी कोबीची पानं मी ही घालत नाही. पण यावेळी मी थोडा बदल म्हणुन घातली.
त्यामुळे चवीत फार काही फरक पडला नाही.

हो बरेच जण मात्र नारळाचे छोटे छोटे काप करुन घालतात.

कोबीमुळे वड्याचं पीठ सैल झालं का?
बाकी फोटू छानच!
आयते वडे मिळाले तर अजून कौतुक करीन.;)
बाकी मी मेदूवड्यांच्या आकाराबाबत फारशी हट्टी नाही.

निवेदिता-ताई's picture

20 Jul 2011 - 9:58 am | निवेदिता-ताई

कोबीमुळेच वड्याचे पिठ सैल झाले...त्यात थोडे बेसन पिठ टाकावे म्हणजे वडे सदॄश्य आकार धारण करतात...

व्वा व्वा व्वा !
छान छान छान !
मस्त मस्त मस्त !
लय भारी !
ग्रेट !
तुस्सी छा गये !
लाजवाब !
क्या बात है !

(हुश्श............)
:)

बहुगुणी's picture

20 Jul 2011 - 2:56 am | बहुगुणी

नेहेमीप्रमाणेच खुसखुषीत पाककृती!
(चला, चक्क बल्लवाचार्य गणपा महाराजांचाही कधी कधी पोपट होतो तर! सुप्त आनंद झाला!)

नारळाच्या चटणीत काय काय घातलंत तेही द्या की महाराज!
बाकी नेहेमीप्रमाणेच एकदम किलर फोटो :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2011 - 2:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाशवी आनंद झाला. ;-)

चतुरंग's picture

20 Jul 2011 - 3:25 am | चतुरंग

चिरलेला कोबी एकदम वेगळीच आयडिया.

पहिले भजीवडे पोटात गेल्यावर - भोकाचा मेदूवडा जमता कैसा नै?! अरे वा रे, इसको बोलते बल्लवाचार्य!
साला तुझं प्रेझेंटेशन असलं खतरा असतं ना की बास, चव बीव हे सगळं नंतरचं! (मी सध्या तरी तिकडे येत नाहीये त्यामुळे स्तुती केली असली तरी घाबरु नकोस! तिकडे आलो की स्तुती न करताही तुला सोडणार नाहीये!! ;) )

-रंगा

मेघवेडा's picture

20 Jul 2011 - 3:52 am | मेघवेडा

साला तुझं प्रेझेंटेशन असलं खतरा असतं ना की बास, चव बीव हे सगळं नंतरचं!

तर काय! केळीचं झाड आहे का रे आणि परसदारी?

फोटू नेहमीप्रमाणे क्लास! झकास पाकृ. करून बघणेको हरकत नाय..

सूड's picture

20 Jul 2011 - 3:06 pm | सूड

केळीचं पान फटुशापित असल्यासारखं वाटलं उगा !!

आता कमर्शियल व्हायला लागेल, या डिझायनरला यश मिळालं तर....

अभिज्ञ's picture

20 Jul 2011 - 4:14 am | अभिज्ञ

मस्त रे. फोटो अन पाकृ उच्चच.

अभिज्ञ.

सहज's picture

20 Jul 2011 - 6:51 am | सहज

अरे वा! कोबी घालून केला पाहीजे आता.

बहुगुणी म्हणतात तसे एकदम किलर!!!

मेदुवडे ते पण केळीच्या पानावर आणि त्याचे नुसते फोटो.

गुरुवर्य तुमचा नंबर द्या हो मी पण एकदा येतो फोन करुन, बाकी आता स्तुती करण्यासारखं फार काही राहिलेलं नाही, किती वेळा तेच ते तेच ते तेच ते लिहिणार आम्ही.

तुमचा ब्लॉग पाहिल्यापासुन ५० किलो भाज्या चिरल्यात तुमच्यासारखं यावं म्हणुन, पण काय जमलं नाही.

वा वा गणपा सेठ
एकदम कुरकुरीत , खमंग आणि चविष्ट वडे

सांबार मिसिंग आहे पण यात ;)

केळीच्या पानावरचे फोटो तर कातील :)

और आनेदो

प्रचेतस's picture

20 Jul 2011 - 9:17 am | प्रचेतस

गणपा रॉक्स...

सूड's picture

20 Jul 2011 - 9:25 am | सूड

आणि आकाराचं म्हणाल तर मी सरळ साचा वापरतो अंजलीचा. (हे कंपनीचं नावै, कृपया गैरसमज नको.)
तुम्ही हाताने केलेत वडे म्हणजे कौतुकच आहे.

ऋषिकेश's picture

20 Jul 2011 - 9:49 am | ऋषिकेश

दरवेळी ठरवतो की गणपाची स्तुती करायची नाहि. (कारण शब्द केव्हाच संपले आहेत)
तरीही, वर अनेकांनी नवा शब्द सुचवल्याने स्तुती केल्या जात आहे:
कीलर!

शाहिर's picture

20 Jul 2011 - 10:11 am | शाहिर


मेंदु चा वडा झाला

श्रावण मोडक's picture

20 Jul 2011 - 10:11 am | श्रावण मोडक

*$#%&^(#$@**(

मृत्युन्जय's picture

20 Jul 2011 - 10:15 am | मृत्युन्जय

+ १ :)

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2011 - 10:23 am | स्वाती दिनेश

वडे मस्तच रे...
कोबी घालून पाहिला पाहिजे... (पण त्यामुळेच पातळ झाले असेल पीठ, वर निवेदिताने चणाडाळीचे पीठ घालायला सांगितले आहे, पण त्याऐवजी उडीदडाळीचे पीठ घालायचे पातळ वाटले तर अशी आमच्या एका द.भारतीय मैत्रिणीची सूचना आहे.)
उडीदडाळीचे तयार पीठ भारतीय दुकानात मिळते.. मिपाकरांनी मेदुवड्यांकरता २,३ चमचे पीठ घेतल्यावर उरलेल्या पीठाचे काय करायचे? असा (खवट) प्रश्न विचारु नये. पिशवी पिनने घट्ट बंद करुन पुढच्या "मेदुवडा पोग्राम" साठी ठेवून द्यावी.
ता.क.-
१)घावने/धिरडी करताना उडीदडाळीचे २,३ चमचे पीठ घालता येते.
२)ह्या पिठाची बोंडाभजी पण मस्त होतात.
स्वाती

कच्चा पापड पक्का पापड's picture

20 Jul 2011 - 11:12 am | कच्चा पापड पक्क...

मस्तच !!!!!

हे काय आहे?

ती गन पावडर उर्फ मेलगा पडी (Milaga podi) आहे.
- बाय वाह रे वाह शेफ.

मुलूखावेगळी's picture

20 Jul 2011 - 11:14 am | मुलूखावेगळी

वाव !!!!!!
फेव डिश मस्तच

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jul 2011 - 11:30 am | बिपिन कार्यकर्ते

काही प्रतिक्रियांवरून कळलं की तुझा पोपट झाला. बरं वाटलं. नेहमी आमचाच का म्हणून? ;)

बाकी नेहमीप्रमाणे लेख / फोटो वगैरे काही मी वाचलंच नाही. ;)

कोबीला पण कांद्या सारखे पाणी सुटते ही माहिती माझ्यासाठी नवीच.
समस्त अन्नपुर्णा ग्रुपच माहिती आणि सुचवणीसाठी मंडळ आभारी आहे. :)

तर काय?
कोबीलाही कांद्यासारखे पाणी सुटते.
इतकेच नाही तर माझी सौधींडीयन मयत्रीण कांदा आणी मीठही वडे करण्याआधी काही सेकंद मिसळते.
वाटलेल्या पिठाचा थोडा भाग एका पातेलीत घेऊन त्यात ऐनवेळी कांदा आणि मीठ घालून चार चार वडे तळल्याने पाणी सुटायला कमी वेळ मिळतो.
इतके दिवस बायकोने केलेले पदार्थ मिपावर आपलेच म्हणून देत होतास याचा पुरावा आहे हा!;)
हा पदार्थ काही बिघडलेला नाही तरीही थोडसं इकडं तिकडं झालं तर सगळ्यांना आसूरी/पाशवी असे आनंद झालेत.
यावरून बिघडलेल्या पदार्थालाही किती प्रसिद्धी मिळू शकेल याचा अंदाज येतोय.;)

श्रावण मोडक's picture

20 Jul 2011 - 8:19 pm | श्रावण मोडक

यावरून बिघडलेल्या पदार्थालाही किती प्रसिद्धी मिळू शकेल याचा अंदाज येतोय.

म्हणजे आता पाकृंची मालिकाच सुरू करणार दिसतंय. ;)
जाणीवपूर्वक मालिका कोण सुरू करणार ते लिहिलेलं नाहीये.

जाणीवपूर्वक मालिका कोण सुरू करणार ते लिहिलेलं नाहीये
हाणा आम्हाला!
तुम्ही सोडताय काय.......
(तरी बरं आजकाल पाकृ आणि लेख लिहिणे बंद करून सगळ्यांवर कृपा केलेली आहे....)

ऋषिकेश's picture

21 Jul 2011 - 1:42 pm | ऋषिकेश

कोबीलाही कांद्यासारखे पाणी सुटते.

कोबी कांदाच कशाला असे पदार्थ होणार असले तर, मीठ वगैरे न लावता आमच्या तोंडालाही पाणी सुटते :)

सविता००१'s picture

20 Jul 2011 - 11:57 am | सविता००१

मस्त..मस्त........................खूप छान

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2011 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे गणपोपट ! पाकृ एकदम झकास !

अवांतर :- आता इकडे केळ्याची पाने आणि उडदाची डाळ कुठे मिळते ते शोधणे आले.

आता इकडे केळ्याची पाने आणि उडदाची डाळ कुठे मिळते ते शोधणे आले
होय तर......
जसं काही दिसेल तो पदार्थ करून बघण्याची आवडच आहे मुलाला!
आणि तू राहतोस तो प्रदेश तरी किती दुर्गम आहे रे!
तिथे कुठली आलीये डाळ अन् केळीची पानं!

विशाखा राऊत's picture

20 Jul 2011 - 6:47 pm | विशाखा राऊत

ही ही ही.. अगदी खरे

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2011 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

होय तर......
जसं काही दिसेल तो पदार्थ करून बघण्याची आवडच आहे मुलाला!
आणि तू राहतोस तो प्रदेश तरी किती दुर्गम आहे रे!
तिथे कुठली आलीये डाळ अन् केळीची पानं!

मी दिली आहे तशी प्रतिक्रिया आल्यावरच पाकृचा धागा यशस्वी झाला आहे आणि जगाच्या कानाकोपर्‍यात पोचला आहे हे सिद्ध होते.

मुख्य म्हणजे नविन मिपाकरांना 'च्यायला हा परा देशाबाहेरचा दिसतोय' अशी उगाच एक असूया वाटते ;)

धमाल मुलगा's picture

20 Jul 2011 - 6:54 pm | धमाल मुलगा

तुमच्या इथे असलेल्या इंडिया हाउस मध्ये मिळेल. आमच्याइकडच्या इंडिया हाउसमध्ये तर मिळतं. मी नेहमी तिकडूनच आणतो. ;)

अवांतरः गणप्या..हाय हाय!

सूड's picture

20 Jul 2011 - 7:08 pm | सूड

केळीची पानं की उडदाची डाळ ?? इकडे आताशा केळीची पानं मिळत नाहीत म्हणून म्हटलं. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2011 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या इथे असलेल्या इंडिया हाउस मध्ये मिळेल. आमच्याइकडच्या इंडिया हाउसमध्ये तर मिळतं. मी नेहमी तिकडूनच आणतो.

ओह्ह खरच भाग्यवान आहात तुम्ही.

इथ केळीची पाने बघायला देखील मिळत नाहीत आणि मिळालीच तर ती एकतर फाटकी तरी असतात किंवा खराब झालेली. बे एरियात कुठेशीक मिळतात असे कळाले आहे, एक चक्कर मारीन आता विकांताला.

पंगा's picture

21 Jul 2011 - 12:27 pm | पंगा

परा पेटलाय! :D

धमाल मुलगा's picture

22 Jul 2011 - 3:02 pm | धमाल मुलगा

>>इथ केळीची पाने बघायला देखील मिळत नाहीत आणि मिळालीच तर ती एकतर फाटकी तरी असतात किंवा खराब झालेली
साउथच्या लोकांकडून नका घेऊ, पठाणी-अफगाणी दुकानात चांगली मिळतात असं ऐकलंय.

>>बे एरियात कुठेशीक मिळतात असे कळाले आहे, एक चक्कर मारीन आता विकांताला.
बाब्बौ! तिकडं फक्त 'गन पावडर' चांगली मिळते असं ऐकुन आहोत. ;)

@सुधांशु:
>>केळीची पानं की उडदाची डाळ ?? इकडे आताशा केळीची पानं मिळत नाहीत म्हणून म्हटलं
अहो, सिझनल नसतात ही पानं. आणि आपल्याकडच्यासारखी नसतात. कंबोडिया आणि फिलीपाईन्सची थोडी वेगळी दिसतात. त्यांचा पोत निराळा असतो जरा. पहिल्या पाहण्यात ओळखू येत नाहीत.
तुम्ही कोणत्या एरियात असता? आमच्याइथेच जवळपास असाल कुठे तर या एकदा, सोबत जाऊ, दुकान दाखवून ठेवेन.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2011 - 3:24 pm | परिकथेतील राजकुमार

साउथच्या लोकांकडून नका घेऊ, पठाणी-अफगाणी दुकानात चांगली मिळतात असं ऐकलंय.

पठाणी-अफगाणी दुकानात पुरुषांनी शक्यतो एकटे जाउ नका असा इथे उतरल्या उतरल्या सल्ला मिळाला होता. चार वर्षांनी देखील आता परिस्थीतीत फारसा फरक पडला नसेल असे वाटते.

गच्चीत केळ्याची पाने कशी लावता येतील ह्याची कृती कोणी सांगेल काय ?

बाब्बौ! तिकडं फक्त 'गन पावडर' चांगली मिळते असं ऐकुन आहोत.

हो कानावर आले आहे खरे पण जायचा योग कधी आलाच नाही. आता नेक्स्ट ग्रुप डिस्कशन तिकडेच आसपास आहे तेंव्हा मारीन म्हणतो चक्कर.

गन पावडरवरुन भारतातल्या नळ्याच्या दारुची आठवण झाली. पुढच्या भारतेभेटीत तिचा आस्वाद घेणारच.

धमाल मुलगा's picture

22 Jul 2011 - 4:29 pm | धमाल मुलगा

पठाणी-अफगाणी दुकानात पुरुषांनी शक्यतो एकटे जाउ नका असा इथे उतरल्या उतरल्या सल्ला मिळाला होता. चार वर्षांनी देखील आता परिस्थीतीत फारसा फरक पडला नसेल असे वाटते.

कही नाही हो, गैरसमज आहेत सगळे. आपल्याकडं इंडियात हे द्वेषाचं बीज इतकं खोलवर पेरुन ठेवलेलं असतं ना, त्यामुळं असं काहीतरी गैरसमज करुन घेतले जातात. जा बिन्धास्त.

>>गच्चीत केळ्याची पाने कशी लावता येतील ह्याची कृती कोणी सांगेल काय ?
अं.मला वाटतं, रेवतीकाकू किंवा प्रभो ह्याबाबत मदत करु शकतील. गेल्यावेळी विकेंडला लाँग ड्राईव्ह करुन त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी केळीच्या पानावरच वाढलं होतं. मी म्हणालोही, 'एव्हढं आतिथ्य? कशाला उगाच" तर रेवतीकाकू म्हणाल्या, त्यात काय, आमच्या घरच्याच केळीची पानं आहेत. आणि प्रभ्यानंपण त्यांच्याकडूनच केळीच्या पानांची रेशिपी लिहून घेतली होती.

हो कानावर आले आहे खरे पण जायचा योग कधी आलाच नाही. आता नेक्स्ट ग्रुप डिस्कशन तिकडेच आसपास आहे तेंव्हा मारीन म्हणतो चक्कर.

जपून! ठसका बसला तर वरचा श्वास वर, खालचा खाली अशी गत होईल.

>>गन पावडरवरुन भारतातल्या नळ्याच्या दारुची आठवण झाली. पुढच्या भारतेभेटीत तिचा आस्वाद घेणारच.
वा वा! क्या बात है. कधी जाताय? आमच्यासाठी देसाईबंधूंकडच्या आंबापोळ्या घेऊन या हो. आणि पेरुगेटासमोर मामाच्या लक्ष्मीमध्ये पांचट चहाही पिऊन या. च्छे! क्षणभरात किती नॉस्टॅल्जिक व्हायला झालं हो.

श्रावण मोडक's picture

22 Jul 2011 - 4:55 pm | श्रावण मोडक

=))

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2011 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार

कही नाही हो, गैरसमज आहेत सगळे. आपल्याकडं इंडियात हे द्वेषाचं बीज इतकं खोलवर पेरुन ठेवलेलं असतं ना, त्यामुळं असं काहीतरी गैरसमज करुन घेतले जातात. जा बिन्धास्त.

नाईलाजाने तुमच्याशी सहमत व्हावे लागत आहे.

पुण्यात आजोळी आमच्याकडे डोंबारी खेळ करणारी माणसे यायची तेंव्हा त्यांची अशीच भिती आजोबा वगैरे दाखवायचे त्याची आठवण झाली. पण पुढे सखु डोंबारणीशी ओळख झाली आणि मग भिती बंद होऊन धाडस वाढले.

अर्थात भारतात अजुनही बागुलबुवा वगैरे लहान मुलांना घाबरवणारे डिसगस्टिंग प्रकार चालु असतात असे लास्ट इयर इथे शिफ्ट झालेले यळकुंटवार सांगत होते.

अं.मला वाटतं, रेवतीकाकू किंवा प्रभो ह्याबाबत मदत करु शकतील. गेल्यावेळी विकेंडला लाँग ड्राईव्ह करुन त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी केळीच्या पानावरच वाढलं होतं. मी म्हणालोही, 'एव्हढं आतिथ्य? कशाला उगाच" तर रेवतीकाकू म्हणाल्या, त्यात काय, आमच्या घरच्याच केळीची पानं आहेत. आणि प्रभ्यानंपण त्यांच्याकडूनच केळीच्या पानांची रेशिपी लिहून घेतली होती.

ओह्ह ! ते इकडेच असतात हे माहिती होते पण त्यांचे ठिकाण तसे लांब पडत असल्याने रेग्युलर गाठी-भेटी होत नाहीत. त्यात मध्ये प्रभोनी काही पाने गुंडाळुन आणली होती भारतातुन पण ती आळूची पाने निघाल्याने वांदे झाले.

असो..

आता एक ज्युनिअर येणार आहे तिकडून त्यालाच सांगीन आणायला. नाहीतर मग तुमच्याकडे एक चक्कर टाकावी लागेलच. तुमच्या घरुन मागच्यावेळी आलेला लाडवांचा डबा पण साखर घालुन परत द्यायचाच आहे.

जपून! ठसका बसला तर वरचा श्वास वर, खालचा खाली अशी गत होईल.

नाही काळजी घेईन मी. आणि तसेपण इथली एयर भारतासारखी प्रदुषीत नसल्याने काळजीचे कारण नाही.

वा वा! क्या बात है. कधी जाताय? आमच्यासाठी देसाईबंधूंकडच्या आंबापोळ्या घेऊन या हो. आणि पेरुगेटासमोर मामाच्या लक्ष्मीमध्ये पांचट चहाही पिऊन या. च्छे! क्षणभरात किती नॉस्टॅल्जिक व्हायला झालं हो.

नक्की नक्की. बघू आता कधी योग येतोय ते. लक्ष्मी हॉटेल आहे का हो अजुन ? खरच काय दिवस होते नै ते ? लक्ष्मी हाटेलात एकात तिन करून चहा प्यायचा आणि रेणूका स्वरुपवर हिंडायला जायचे.

स्मिता.'s picture

22 Jul 2011 - 5:30 pm | स्मिता.

त्यात मध्ये प्रभोनी काही पाने गुंडाळुन आणली होती भारतातुन पण ती आळूची पाने निघाल्याने वांदे झाले.
वेड्यासारखी हसतेय!

पण वांदे कशाला होवू देतोस? अळूच्या वड्या बनवून इथे फोटुसकट पाकृ टाकायची होती.

रेवती's picture

22 Jul 2011 - 7:04 pm | रेवती

रेवतीकाकू किंवा प्रभो ह्याबाबत मदत करु शकतील. गेल्यावेळी विकेंडला लाँग ड्राईव्ह करुन त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी केळीच्या पानावरच वाढलं होतं. मी म्हणालोही, 'एव्हढं आतिथ्य? कशाला उगाच" तर रेवतीकाकू म्हणाल्या, त्यात काय, आमच्या घरच्याच केळीची पानं आहेत. आणि प्रभ्यानंपण त्यांच्याकडूनच केळीच्या पानांची रेशिपी लिहून घेतली होती.

अरे काय हे? काय हे? आँ?
केळीच्या पानाची रेशिपी काय?
फिस्सकन हसू आले.
नशीब, हातात कॉफी नव्हती......कांपूटरवर सांडून कळफलक खराब झाला नसता का?;)
(यावेळी लाडू दिले नाहीत तर वैतागला होता प्रभो!)

पंगा's picture

22 Jul 2011 - 10:23 pm | पंगा

गन पावडरवरुन भारतातल्या नळ्याच्या दारुची आठवण झाली. पुढच्या भारतेभेटीत तिचा आस्वाद घेणारच.

'नळ्याची', की नळाची? ;)

('ऑन टॅप'???)

आम्ही कुठे असतो ते तुमच्या खवत कळवतो, उगाच "अच्छा तुम्ही तिथे असता होय ? बर्र !!" असे खवचट प्रतिसाद यायचे.

अवांतरः लिखाणाच्या पद्धतीवरुन तुम्ही परभणीचे दिसता.

धमाल मुलगा's picture

22 Jul 2011 - 4:31 pm | धमाल मुलगा

>>अवांतरः लिखाणाच्या पद्धतीवरुन तुम्ही परभणीचे दिसता.
बीडचे. पण इकडं काय, परभणी-बीड काय वेगळंय होय? तुम्ही कुठले? :)

सूड's picture

22 Jul 2011 - 4:45 pm | सूड

>>तुम्ही कुठले?
स.पेठेतले, लिखाणाच्या पद्धतीवरुन खरं तर लक्षात यायला हवं होतं. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2011 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार

स.पेठेतले, लिखाणाच्या पद्धतीवरुन खरं तर लक्षात यायला हवं होतं.

च्यायला हे सुड्ड्या भेटलं तेव्हा चांगल पोरग वाटल होत राव. हे पण त्या स्पावड्याच्या नादानी नालायक झालय आता.

आनंदयात्री's picture

23 Jul 2011 - 12:23 am | आनंदयात्री

पेठेतले का ? तरिबी ऐयकायचं !!

मालोजीराव's picture

20 Jul 2011 - 12:23 pm | मालोजीराव

झक्कास बरं का गणपाराव, उडप्यांच्या कंबरड्यात लाथ घातलीत कि ओ सणसणीत !

स्मिता.'s picture

20 Jul 2011 - 2:45 pm | स्मिता.

मेदूवडे मस्तच दिसत आहेत. कढिपत्ता, कोथिंबीर न वाटता कापून टाकल्याने वड्यांना मस्त लूक आलाय. केळीच्या पानावरची सजावट तर क्लास!!

बाकी तुमचे वडे आधी फसले हे वाचून असुरी, नव्हे पाशवी आनंद झालेला आहे :D

विसोबा खेचर's picture

20 Jul 2011 - 6:36 pm | विसोबा खेचर

भन्नाट रे गणपा..!

प्रभो's picture

20 Jul 2011 - 8:30 pm | प्रभो

ह्म्म!!!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2011 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

खोबय्राच्या चटणीत बेलाचं पान....
बाजुनी 'जमले' मेदुवडे छान

प्यारे१'s picture

21 Jul 2011 - 12:38 pm | प्यारे१

गणपाचे हात बांधून ठेवले पाहिजेत. कर म्हणाव काय वडे करायचेत ते....
आणि किती घाण प्रेझेन्टेशन ते? लोकांना खावंसं वाटावं की नै?

गणपा, केक तै, स्वप्निलची बायको, मृणालिनी (वडीलची मुलगी), जागुतै, कदी मदी पियुशा (कच्चा लिंबू ;) ) अशा सगळ्या लोकांना
बप्पा शिक्षाच करणार आहे मुळी......... :)

सानिकास्वप्निल's picture

21 Jul 2011 - 7:32 pm | सानिकास्वप्निल

गणपा भाऊ एकदम खल्लास पाकृ आहे आणी फोटो तर झकास :)

मागल्या आठवड्यात नाश्त्याला हे वडे मिळाले मजबूत दाबले. आता पुन्हा इच्छा होतेय.

पल्लवी's picture

22 Jul 2011 - 3:44 pm | पल्लवी

स्सो हाय क्लास ! :)
झकास..

चिंतामणी's picture

23 Jul 2011 - 8:50 am | चिंतामणी

रेसिपी, फटु आणि प्रामाणिकपणा

बाकी ख-याची दूनीया नाही हे पुन्हा सिध्द झाले.
प्रामाणीकपणाला किंमत नाही.

तु अर्थात "त्या" प्रतिक्रीया (जातीवंत मिपाकर असल्याने) फाट्यावर मारणार हे नक्की.