✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?

ध
धमाल मुलगा यांनी
Wed, 07/13/2011 - 19:30  ·  लेख
लेख
नमस्कार मित्रहो, नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :( ही बातमी खरी आहे काय? असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना! आपला, -(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40183 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

राहुल गान्धी च्या अकलेचे तारे

शाहिर
गुरुवार, 07/14/2011 - 14:29 नवीन
http://starmajha.starnews.in/india/34-more/7337-2011-07-14-06-56-23
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म्म्म्म्म

विलासराव
गुरुवार, 07/14/2011 - 17:09 नवीन
आजच आलो गावावरुन परत . बोलण्यासारखे काही नाही ,बाकी गप्प रहाणेच बरे.
  • Log in or register to post comments

...

समंजस
गुरुवार, 07/14/2011 - 19:22 नवीन
<<<(भयभीत आणि काळजीत पडलेला) >>> .....काळजीत पडू नये....मुंबईकरांना या गोष्टींची नवलाई राहीलेली नाहीय आणि भिती सुद्धा नाही. अश्या घटना घडल्या नाहीत तर आम्हा मुंबईकरांना चुकल्या सारखं वाटतं. या उलट जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सगळं जग आमचं कौतुक करतं (आमचं कार्याप्रती असलेल्या निष्ठेचं, आमच्या professionalism चं, दुसर्‍याच दिवशी कामावर धावत पळत जाण्याचं आणि मुंबईचा देशातील आर्थिक राजधानी म्हणून असलेला दबदबा कायम ठेवण्याचं, आमच्या सहनशक्तीचं वै. वै....) आता अशी कौतुकं करून घ्यायची तर अश्या घटना घडायलाच हव्यात. नाही का?
  • Log in or register to post comments

दादर, भवानीशंकर रोड

राजेश घासकडवी
गुरुवार, 07/14/2011 - 21:29 नवीन
लहानपणच्या खूप आठवणी आहेत. मोठेपणच्याही आहेत. माझ्या भावी पत्नीला मी त्यांच्या घरी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तेव्हा तिथल्याच २०१च्या बसस्टॉपवर उभा होतो. (तेव्हा अर्थातच ती भावी आहे हे माहीत नव्हतं...) आमचे सासुसासरे भवानीशंकर रोडवरच राहातात. त्यांचा ठाण्याहून ताबडतोब फोन आला तेव्हा बरं वाटलं. सर्व सुखरूप आहेत. मिपावर अगदी अगत्याने इतर मिपाबांधवांची चौकशी झालेली पाहूनही बरं वाटलं. सातासमुद्रापलिकडे राहणारे संकटकाळी एकमेकांना आपण सगळे व्यवस्थित आहोत याची हक्काने विचारपूस करतात. स्वतःचा हात वरून काळजी करू नका, मी ठीक आहे सांगतात... तरीही आंतरजालामुळे माणूस माणसापासून दूर गेलाय असं काहींना वाटतं.
  • Log in or register to post comments

मिपावर.....एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही.

खादाड_बोका
Fri, 07/15/2011 - 20:16 नवीन
मिपावर......एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही, की फार वाईट झाले. एरव्ही स्वतःला पुरोगामी दाखवणार्या मुसलमानाची रा. स्व. संघाबद्दल, या हिंदुसमाजाबद्दल थोडेसे ही काहि लिहीले तर फार तिखट प्रतिक्रिया येते. पण जेव्हा केव्हा बॉम्ब स्फोट होतात तर सगळे कुठे गायब होतात देव जाणे.
  • Log in or register to post comments

त्याचा काय संबंध ?

अर्धवटराव
Fri, 07/15/2011 - 21:30 नवीन
इथे मुसलमान वगैरे प्रश्न कुठे येतो? (मुस्लीम) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका

+१

इंटरनेटस्नेही
Mon, 07/18/2011 - 04:00 नवीन
मिपावर......एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही, की फार वाईट झाले. एरव्ही स्वतःला पुरोगामी दाखवणार्या मुसलमानाची रा. स्व. संघाबद्दल, या हिंदुसमाजाबद्दल थोडेसे ही काहि लिहीले तर फार तिखट प्रतिक्रिया येते. पण जेव्हा केव्हा बॉम्ब स्फोट होतात तर सगळे कुठे गायब होतात देव जाणे.
दुर्देवी प्रतिक्रिया एव्हढंच म्हणेन. निषेध नोंदवतो. दहशतवादाला धर्म नसतो असे आमचे स्पष्ट मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका

मिपावर.....एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही.

अजातशत्रु
Sat, 07/16/2011 - 18:03 नवीन
पुन्हा तेच??? . . . . . . . . . इथे मुसलमान वगैरे प्रश्न कुठे येतो? +१ . . . . . मृतांमध्ये मुसलमानही आहेत....आता पर्यंन्तची मृतांची संख्या १९ झाली आहे. . . . . . . . . . . किडा-मुंगी प्रमाणे मरणं, मरण स्वस्त होत आहे.... हे शब्द वाचले होते आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे, आता बाहेर असलो की घर कधी गाठतोय असं होतं... :( हताशवाणं,विषण्ण आहे सगळं........ :(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा