कसे त्यागू देवा
"मी" पण माझे
वाटे जरी ओझे
टाकवेना
आत्म अभिमान
आणि स्वाभिमान
सांगेल का कोण
भेदाभेद
एकतत्त्वनाम
झाले बदनाम
धर्माधर्म स्तोम
भोवताली
"मी" पणाचा शोध
घेतो आहे "मी"च
आता बाबा तूच
धाव देवा
राहिले रे आता
कितीसे रे दिन
चरणी मी लीन
दीनानाथा
प्रार्थणारा मीच
ऐकणारा मीच
जन्मोन्मी हाच
नाच देवा
एकतत्त्व नाम
धरितो मी दृढ
बालक सुदृढ
अहंकारी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1168
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगले
सुंदर अभंग मनापासुन