Skip to main content

कित्ती लागली मला भूक

लेखक काव्-काव् यांनी मंगळवार, 21/06/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती लागली मला भूक खायला दे खूप-खूप-खूप वरण-भात, लिम्बू तुप खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप कित्ती लागली मला भूक खायला दे खूप-खूप-खूप मसाले-भात, टोमेटो-सूप खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप पोटात बसलाय भस्मासुर भुकेला माझ्या आलाय पूर बाबा म्हणतो दानासूर आई म्हणते बकासूर जेवढे खाइन तेवढे थोड़े कांदा भजी, बटाटे वडे बिनचूक म्हणतो सगळे पाढे चोकलेट मागतो बाबाकड़े सगलेच मला आवडते गोड़, तिखट, आंबट, कडू सगलेच मला कमी पड़ते शेव, चकली, चिवडा लाडू कित्ती खाशील लेका तू? आई माला रागावते म्हणते.. सगळेच संपले घरातले आता शेजारून मागवते पण, आई तुला खर्र.. सांगतो मी तर फ़क्त दोनदाच खातो एकदा भूक लागली की एकदा भूक भागली की
लेखनविषय:

वाचने 1440
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया