भ्रष्टाचार आणि सामान्य व्यक्ती. काय धोरण असावे?
नेहमीप्रमाणेच बुचकळ्यात पडलोय. (थोडक्यात अॅज युज्वल कन्फुझ्ड)
भ्रष्टाचारावर चाललेली/ल्या चर्चांना ऊत आलाय. नेहमीप्रमाणे कुणाला विरोध करण्याचा हक्क आहे, नाही, कोण काळा पैसा जनरेट करतो, कोण त्यात कसा सहभागी आहे, अमुक तमुक इ.इ.इ.
मुद्दा असा आहे :
माझ्या मते मी भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही.
थोडे स्पष्टीकरण : मी माझ्या नोकरीमध्ये अशा ठिकाणी आता आहे की लोक मला किंवा मी लोकांना त्यांचे काम करण्यासाठी, काम झटपट करण्यासाठी, कामाची रक्कम वाढवण्यासाठी, झालेले/ दाखवलेले काम जास्त खोलात न शिरता करण्यासाठी पैसे, भेटवस्तू देऊ शकतात अथवा मी मागू शकतो. अर्थात मी स्वतः कुणाला मागायच्या भानगडीत पडत नाही, लोकांनी आडून अथवा थेट विचारले तरी त्याचं योग्य प्रकारे उत्तर देऊन अशा गोष्टी टाळतो. क्वचित एखाद्या व्यक्तिबरोबर जवळचे/ मैत्रीचे संबंध झाले असतील त्यांच्याबरोबर जेवण वगैरे होते ;) मात्र त्याला आधी/ नंतर स्वखर्चाने माझ्यातर्फे त्याचप्रकारे जेवण वगैरे होते. ( घेतल्यापेक्षा दिलेली रक्कम जास्त)
लाच द्यायला माझी ना नाही (कॅल्क्युलेटेड आणि काही अटींवर) :
काही वर्षापूर्वी मी याच जागी टेबलाच्या विरुद्ध /दुसर्या बाजूला काम करत होतो. तिथे माझ्या झालेल्या कामाचे बिल लवकरात लवकर पास व्हावे म्हणून मी समोर काम करणार्या व्यक्तिला/ व्यक्तिंना सर्व प्रकारे नाही तरी बव्हंशी खूष ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझी रक्कम लवकरात लवकर कशी हाती येईल याचा विचार करत होतो. ती /त्या व्यक्ती याला आक्षेप घेत नव्हत्या. माझे काम लवकर होत होते.
अर्थात आजही मी कुणी मला काही देण्याचा प्रयत्न करत असला अथवा नसला तरी एखाद्याचे काम मुददाम अडकवणे, लटकवणे असे प्रकार करत नाही.
इतर बाबतीतही माझे वैयक्तिक काम देखील लवकर पूर्ण व्हावे म्हणून थोडाफार खर्च करण्याची माझी कॅल्क्युलेटेड तयारी (वेळ, पैसा, शक्ती जास्त कुठे वाचू शकेल) असते.
मी करतोय ते बरोबर करतोय असे मला वाटते. आपले काय मत आहे?
डिस्क्लेमरः लाच द्यायला होकार आहे असे मी फक्त म्हणतोय.
(लाच देणेसुद्धा गुन्हा आहे ना! ;) )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फार उत्तम चर्चाविषय घेतला आहे.
मी काळा पैसा म्हणजे केवळ
क्रेडिटकार्डने पेमेंट
क्रेडिट कार्ड
पण
कॉम्र्पोमाईज
बरं..
ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब,
एक उदाहरण
पैसाताई.. माझंही अगदी तंतोतंत
दिल कि बात
कदाचित..
आपल्यावर अजिबात नाही...
गगनविहारी साहेब
ब-याचदा श्रीमंत माणूस लाच
गवि सध्या काय टंचनिका टंकनिका
नाय रे..
ह्या वयात काय करायची आहे
गगनविहारी साहेब
या क्षेत्रात टेबलच्या दोन्ही
मुळीच पटला नाही
अँ ?
जेंव्हा मला घरातला संगणक
लाच मागायची पद्धत "वरुन" सुरु
हो जसे
हे तर्कशास्त्र अजिबात पटले
मुळीच नाही
+१
यथा राजा तथा प्रजा
बाकीचे/ वरचे लोक खातात म्हणून
बरोब्बर. पटण्यासारखे मुद्दे
बरोब्बर x १००