Skip to main content

चिंब

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 07/06/2011 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
रानमाळी पावसाळी चिंब ओली पाकळी झाडपानी निथळणार्‍या चाहुलींच्या थेंबओळी मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी सावलीच्या पाउली उमले कळी कळि वेगळी ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी वाहतांना नांदती काठावरी स्वप्नावळी जीवनी ही सृजनतेची एक मोठी साखळी ...........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2632
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हे तर फारच सुंदर आहे!! विशेषतः
मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी
व्वाह!! क्या बात!

शक्यतो कवितेच्या वात्याला जात नाही... पण ही कविता खुपच छान वाटली... धन्यवाद टू इजुभौ...

फारच छान. यातील प्रत्येक ओळीसाठी माझ्याकडे एक छायाचित्र आहे. वापरू का तुमच्या ओळी?

आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी Simple, Free Image and File Hosting at MediaFire