Skip to main content

स्टफ्ड बन्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 19/05/2011 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाकृ मी अंतरजालावर पाहिली आणी लगेच करुन बघितली :) अगदी सोप्पी आणी महत्वाचे म्हण्जे बिनअंड्याची पाकृ आहे. . साहित्य बन्ससाठी: ११/२ कप मैदा १/४ कप पाणी १/४ कप दुध ३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट १ टेस्पून साखर ३/४ टीस्पून मीठ ३ टेस्पून ऑल्हिव ऑईल . बन मधे भरण्यासाठी तुमच्या आवडीची कुठली ही सुकी भाजी, उदा; उकड्लेल्या बटाटयाची, बटाटा-मटार सुकी भाजी .इ. पाकृ: दुध कोमट गरम करावे व त्यात साखर आणी ड्राईड यीस्ट नीट मिक्स करुन बाजुला ठेवावे. दुसर्‍या भांड्यात मैदा घ्यावा व मधे खळगा करुन त्यात मीठ, पाणी, तेल व यीस्ट्+दुधाचे मिश्रण घालावे. . सगळं नीट एकत्र करुन सैलसर पीठ मळून घ्यावे.सुरुवातीला थोडे चिकट पीठ वाटेल पण नीट मळले की छान मऊसुत पीठ तयार होईल. तेल लावलेल्या भांड्यात पीठाचा गोळा ठेवून , वरून क्लिंग फॉईल लावून उबदार ठिकाणी १ तासभर ठेवावे . . एका तासानंतर पीठ फुगून दुप्पट झालेले असेल. . फुगलेले पीठ चांगले मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून परत १० मिनिटे उबदार ठिकाणी ठेवणे. . पुन्हा गोळे फुगतील. . फुगलेल्या गोळ्यांना चांगले मळून त्याचे वाटी /पारी तयार करुन त्यात तुमच्या आवडीचे सारण भरून नीट बंद करणे. . वरून तयार बन्संना मिल्क वॉश / एग वॉश देणे (दुध / अंड कुकिंग ब्रश ने लावणे). . प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंटीग्रेड वर १५-२० मिनिटे भाजणे. . गरमा-गरम स्टफ्ड बन्स तयार...वरून थोडे बटर लावावे...मस्तपैकी चहासोबत खाण्याचा आनंद लुटा :) .

वाचने 4931
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्त गं..... एकदम tasty लागणार हे... आता एकदा करुन बघते.. फक्त काय आहे ना, नवरा veg खात नाही... तो pure nonvegiterian आहे.. ;) त्यामुळे चिकन टाकुन try करते. :)

In reply to by Mrunalini

फक्त काय आहे ना, नवरा veg खात नाही... तो pure nonvegiterian आहे.. ;) त्यामुळे चिकन टाकुन try करते. :)
का म्हणे? कधीमधी चुकून नरड्याखाली भाज्या उतरल्या, तर नेमके काय बुडते, धर्म की जात? ('जास्तच आहे!' हे पुढचे शब्द आवरते घेतलेले आहेत.) (बायदवे 'नॉनव्हेजिटेरियन' या शब्दाचे स्पेलिंग - म्हणजे हा चुकूनमाकून इंग्रजी शब्द असलाच, तर - non-vegetarian असे नको का?)

झक्कास बरं का सानिकाताय... बाकी अंड्याचं ब्रशिंग काय मला चालणार नाय.. दुधाचं ठीक आहे.. - पिंगू

पावं करायची सुरुवात यापासुनच करतो आता, झालं नीट तर टाकतो इथं नाहीतर पावभाजी बरोबरच खावं लागेल मला. पण लई भारी आयडिया. धन्यवाद.

सानिका नेहमीप्रमाणे मस्त, सुरेख, अप्रतिम आणी बाकी जे असते ते सगळेच :)

खरच मस्त दिसते आहे पाक्रु. लगेच करणारच. बेस्टच आहे.

करुन बघणार!