स्टफ्ड बन्स
ही पाकृ मी अंतरजालावर पाहिली आणी लगेच करुन बघितली :)
अगदी सोप्पी आणी महत्वाचे म्हण्जे बिनअंड्याची पाकृ आहे.
साहित्य बन्ससाठी:
११/२ कप मैदा
१/४ कप पाणी
१/४ कप दुध
३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट
१ टेस्पून साखर
३/४ टीस्पून मीठ
३ टेस्पून ऑल्हिव ऑईल
बन मधे भरण्यासाठी तुमच्या आवडीची कुठली ही सुकी भाजी, उदा; उकड्लेल्या बटाटयाची, बटाटा-मटार सुकी भाजी .इ.
पाकृ:
दुध कोमट गरम करावे व त्यात साखर आणी ड्राईड यीस्ट नीट मिक्स करुन बाजुला ठेवावे.
दुसर्या भांड्यात मैदा घ्यावा व मधे खळगा करुन त्यात मीठ, पाणी, तेल व यीस्ट्+दुधाचे मिश्रण घालावे.
सगळं नीट एकत्र करुन सैलसर पीठ मळून घ्यावे.सुरुवातीला थोडे चिकट पीठ वाटेल पण नीट मळले की छान मऊसुत पीठ तयार होईल.
तेल लावलेल्या भांड्यात पीठाचा गोळा ठेवून , वरून क्लिंग फॉईल लावून उबदार ठिकाणी १ तासभर ठेवावे .
एका तासानंतर पीठ फुगून दुप्पट झालेले असेल.
फुगलेले पीठ चांगले मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून परत १० मिनिटे उबदार ठिकाणी ठेवणे.
पुन्हा गोळे फुगतील.
फुगलेल्या गोळ्यांना चांगले मळून त्याचे वाटी /पारी तयार करुन त्यात तुमच्या आवडीचे सारण भरून नीट बंद करणे.
वरून तयार बन्संना मिल्क वॉश / एग वॉश देणे (दुध / अंड कुकिंग ब्रश ने लावणे).
प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंटीग्रेड वर १५-२० मिनिटे भाजणे.
गरमा-गरम स्टफ्ड बन्स तयार...वरून थोडे बटर लावावे...मस्तपैकी चहासोबत खाण्याचा आनंद लुटा :)
वाचने
4923
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मस्त गं..... एकदम tasty
In reply to मस्त गं..... एकदम tasty by Mrunalini
कुतूहल
सानिकाबाईंनी मस्त कृती व फोटू
झक्कास बरं का
मस्त! करेन प्रयोग हा. फोटो
झक्कास!! वस्तुन्ची मांडणी पण
पावं करायची सुरुवात यापासुनच
भन्नाट दिसत आहे
छान
छान !!
In reply to छान !! by खादाड अमिता
खाऊन बघणार - मोफतलाल