विडंबन-धुंदीशाळा---बघ हा रंगित चाळा.
विडंबन काव्य-(मुळ काव्य-जग हे बंदीशाळा)-"धुंदी-शाळा"
कुठल्याही व्यसनाला कोणि'रसं' म्हणावे,कोणि सु(?)रस म्हणावे,कोणि चुरस(?) म्हणावे,तर कोणि निरस म्हणावे...आमचे काव्य या सगळ्यात सरस आहे, असे आमचे अजिबात मत नाही...पण प्रत्येकाला "हे"---म्हणजे काव्य आवडेल असे मात्र वाटते.याविषयी कोणाचे दुमत होणार नाहि,असेही वाटते...कंसात टाकलेले आकडे हे तळटिपांचे आहेत,काव्यात काय किंवा व्यसनात काय?...दोन्हीकडे तळ गाठल्या शिवाय टिपांचा अर्थ कळत नाहि...म्हणुन ईथेही वाचकांनी काव्यापुरता तळ गठावा...हि विनंती...
बघ हा रंगित चाळा,बघ हा रंगित चाळा
कुणि न येथे पिला थांबला,जो तो पथं सुटलेला॥ध्रु॥
ज्याची त्याला प्यार खोपडि(१),खोपटीतले सख्खे(२) सवंगडि।
आत कडी की बाहेर बेडी,ठाउक ज्याची त्याला॥
जो तो अपुल्या बाकी अखडे(३),नजर न धावे टेबला पलीकडे।
झुंबरातले खिळे हतोडे,झुंबरी करीती लीला(४)॥
कुणा न माहित 'मजा' किती ते,झोकुन आलो हे नच स्मरते(५)।
'अटके' लागी मन घाबरते,जो आला तो 'जमला'(६)॥
१)हि तीची आदिवासी तसेच भटक्या विमुक्त जतितली दुरची चुलत बहिण आहे,परंतु 'वर' सर्वांगिण विचार व्हावा म्हणुन 'स्तर' जरा खाली आणला.
२)हे रात्रीचे सख्खे,दुसय्रा दिवशी सकाळि वेगळे,तर प्रसंगी वेगवेगळे(ही)होतात.
३)म्हणुनच हिच्या घट्ट मिठितल्या काळाला आखाड म्हणतात,आखडच म्हणावे,खाड खाड म्हणु नये.नाहितर आ आ असा अवाज येईल.
४)ह्या लीला काहि वेळेस भव्य दिव्य असल्याचे दिसुन येईल.आध्यात्मात ज्याला "क्रिया" होणे म्हणतात ना,...तोच प्रकार.
५)आणि नंतर कुठे चाललो तेहि,म्हणजे परत आध्यात्मा प्रमाणेच,आधि-आत-त्म-बाहेर.म्हणजे आत बाहेर हेच खरे.
६)हा "मामला" यातल्या थोर/थोर पंडीतांनांहि उलगडत नाहि,म्हणुनच ते पंडित कायम 'थंडित' असुनहि स्वतःला यातले 'भाई' समजतात...
पराग दिवेकर....
पराग फारच अनुभव दिसतो आहे
पाषाणभेद यांना...पराग कडुन
अरेच्चा, हे वाचलंच नव्हतं.
२)हे रात्रीचे सख्खे,दुसय्रा
हॅप्पि न्यु ्वर्ष
विडंबन आणि सर्व प्रतिसादातिल
बांधला तो सुटला या जगाच्या
ख्या ख्या ख्या
शहाणे असाल तर असलं धाडस करु
करु द्यात हो..झिंगल्यावर
http://maharashtratimes
अगागागागा _/\_
अगागा... हे निरिक्षण म्हणावे