वैशाली (पेन-स्केच)

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in जनातलं, मनातलं
16 May 2008 - 3:49 am

सगळ्यांची चित्रं पाहून मला सुद्धा हुरूप आलाय! म्हणू़न हे चित्रं.. :)

मला काडीएक चित्रकला येत नाही.. पण फॉर सम रिझन मागच्या वर्षीपासून मला चित्रं काढावीशी वाटू लागली, मी काढू लागले, व काही बरी जमली... (काही नाहीच जमली! मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! )

तर त्यातलं हे एक.. हे पाहून काढले आहे.. मूळ चित्र भयंकर आवडलं, म्हणून लगेच वहीच्या पानावर पेनानी काढून पाहीले.. मूळ चित्राच्या जवळही जात नाही, याची मला कल्पना आहे.. परंतू पेन्-स्केचेस मी कधी काढली नव्हती, आणि पहील्या प्रयत्नात बरे जमले असे वाटतेय.. त्यामुळे माझे लाडके स्केच आहे ते.. फ्रेम करून लावलंय स्वयंपाकघरात! :)
तुमचे अभिप्राय कळवा! :)

Vaishali pen-sketch

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 3:52 am | भाग्यश्री

दुवा देता आला नाही, लेख संपादन पण करता येत नाहीय.. म्हणून इथे देते..
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=975926#POST9...

मदनबाण's picture

16 May 2008 - 4:01 am | मदनबाण

मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता!
:))
उत्तम प्रयत्न आहे.....
तुम्ही या पेक्शाही सुंदर स्केच काढु शकाल असे मला वाटते.....

मदनबाण.....

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 7:51 am | विसोबा खेचर

छान आहे चित्रं! मला हे चित्रं एका लहान, शाळकरी मुलीने काढलं आहे असं वाटतं! :)

मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! ) :))

आम्हालाही तुमचा तो पोपटवजा गरूड पाहायचा आहे! :)

आपला,
(चित्रकलाप्रेमी) तात्या.

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 8:58 am | भाग्यश्री

लहान आणि शाळकरी?? मला नाही वाटत, शाळकरी मुलीला हे जमेल.. "चित्रकलेत लहान" असलेल्या व्यक्तीने काढलंय म्हटलं तर चालेल.. कारण मी आहेच लहान..
पोपट झालेला गरूड नाही दाखवता येणार, कारण तो भारतात आहे..

कोलबेर's picture

16 May 2008 - 7:56 am | कोलबेर

पेनाने काढणे फार अवघड आहे. चित्र थोडेसे तिरके झाले आहे ते सरळ केल्यास अजुनच छान दिसेल.

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 8:54 am | भाग्यश्री

झालं नाहीय, तिरकेच आलं आहे.. मी लेफ्टी आहे..त्यामुळे ते उजव्या बाजूला कलले आहे.. पूर्ण झाल्यावर लक्षात आलं..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2008 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वैशाली,
छान चित्र काढले आहे.

ऋचा's picture

16 May 2008 - 8:55 am | ऋचा

मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता!

=))

छान चित्र काढले आहे.

मनस्वी's picture

16 May 2008 - 11:28 am | मनस्वी

भाग्यश्री, चित्र आवडले.
भिंतीवरील ग्रीलचे डिझाईन आणि त्यावर आलेले झुडुप छान दिसतेय.

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 12:27 pm | धमाल मुलगा

हेच म्हणतो...भिंतीवरचं ग्रिल चितारणं किचकटच आहे...पण छान आलंय.
काय पेशन्स आहेत ! वा.

छान चित्र भाग्यश्री.
येऊदे अजुनही :)

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 12:30 pm | भाग्यश्री

थँक्स मनस्वी आणि धमाल मुला.. हो त्याकाळी होता पेशन्स माझ्यात.. २ तास कंप्युटर समोर बसून काढलं होतं.. आता जमेल की नाही माहीत नाही..

सहज's picture

16 May 2008 - 12:45 pm | सहज

भागश्री आपले चित्र छान आहे. मनात आपसुक एक फर्ग्युसन रोड ची चक्कर झाली.

विरंगुळा - वैशाली च्या बाजुला असलेल्या बंगला/दुकाना पुढे दोन तरंगणार्‍या चित्राकृती पाहुन विरंगुळा नक्कीच झाला. कृ. ह. घ्या.

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 12:48 pm | भाग्यश्री

:)) मी आत्ता चित्र पाहताना अगदी हेच नोटिस केले, की त्या माणसांच्या खाली जमिन नाहीय.. होपफुली कोणी नोटीस नाही केले! तेव्हढ्यात तुम्ही केलेच... :| आता चेंज नाही करता येणार, त्यामुळे जाऊदे.. पुढे लक्षात ठेवीन..

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 12:50 pm | स्वाती दिनेश

आज काय चित्रसंमेलन आहे की काय?
छान आहे चित्र भाग्यश्री..
स्वाती

आनंदयात्री's picture

16 May 2008 - 2:42 pm | आनंदयात्री

सुंदर चित्र भाग्यश्री .. आवडले :)

शितल's picture

16 May 2008 - 5:19 pm | शितल

भाग्यश्री
सुरेख चित्र रेखाटले आहेस आणि ते ही पेनाने.
अजुन येऊ देत. पहायला आवडतील.

वरदा's picture

16 May 2008 - 5:29 pm | वरदा

मला आवडलं गं भाग्यश्री....

मन's picture

16 May 2008 - 5:36 pm | मन

पण संगणकावर असं चित्र काढणं थोडं अवघड नाहिये का?
म्हंजे आपल्याला हवे तशे बरोब्बर कुंचले त्यावर इतके अचुक मारता येतात की काय?
मानलं बुवा.

आपलाच,
मनोबा

सागर's picture

16 May 2008 - 6:55 pm | सागर

भाग्यश्री,

आज खूप दिवसांनी मिसळपाव वर आलो तो तुमचे सुंदर स्केच दिसले..
वा वा काय सुंदर स्केच आहे. अनेक बारकाव्यांसकट 'वैशाली' जशीच्या तशी चितारलेली आहे...
आत्तापर्यंत कोणाच्याच कॉलेजच्या वा कोणत्याच आठवणी जाग्या नाही झाल्यात? आश्चर्य याचेच वाटले.

मला तुमचे हे चित्र पाहताच वैशाली डोळ्यासमोर उभी राहीली.... कॉलेजमधे असताना अनेकदा मित्र मैत्रीणींबरोबर वैशालीलाच आमचा कट्टा जमायचा... एकदम सुंदर आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद भाग्यश्री....
(कट्टाप्रेमी) सागर

राजे's picture

16 May 2008 - 6:56 pm | राजे (not verified)

छान !
खुपच चांगला प्रयत्न !

अजून ही काही चित्रे पाठवा..

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 9:47 pm | भाग्यश्री

धन्यवाद सगळ्यांना! :)
अरे मना, मी कागदावरच काढलंय रे, कंप्युटर वर मूळ चित्र होतं, जे बघून मी हे काढलं..
स्वातीताई, आनंदयात्री,शितल्,वरदा,राजे धन्यवाद!
सागर अगदी बरोबर.. वैशाली म्हटलं की कॉलेज आठवतंच.. अगदी मोठ्या माणसांना पण नॉस्टॅल्जिक करून सोडते..

देवदत्त's picture

16 May 2008 - 9:54 pm | देवदत्त

छान चित्र काढले आहे.

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 10:07 pm | भाग्यश्री

धन्यवाद देवदत्त..

अजुन एक पेन स्केच टाकते.. तो लहान मुलगा साफ बिघडला आहे.. :)

16-10-07_00201

कोलबेर's picture

17 May 2008 - 12:35 am | कोलबेर

तो लहान मुलगा साफ बिघडला आहे.

चित्रात तरी अगदी वडिलांच्या आज्ञेत दिसत आहे..पण आजकालच्या पीढीचं काही खरं नाही हेच खरं!! निदान वडिलांच्या हातातली काठी बघुन तरी सुधारेल अशी आशा करुया :)) ह. घ्या.

देवदत्त's picture

17 May 2008 - 1:14 am | देवदत्त

चित्रात तरी अगदी वडिलांच्या आज्ञेत दिसत आहे..पण आजकालच्या पीढीचं काही खरं नाही हेच खरं!!
पूर्णतः सहमत :D =))

गम्मत राहू द्या पण चित्र छान =D>

भाग्यश्री's picture

17 May 2008 - 1:28 am | भाग्यश्री

हेहे! मस्त होती हा कोटी! :))

मन's picture

17 May 2008 - 2:30 am | मन

काय छान मुलगा आहे!
वडीलांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहुन,
त्यांना काठी घेउन चालायचं प्रशिक्षण देतोय, असं वाटतय एकंदर.
(ह. घ्या. स्कॉलर शिपच्या परिक्षेत चित्रावरुन निबंध लिवायची सवय हाये, म्हून काय बी दिसलं की ष्टोरी चिटकिवतोय त्येला.)
बाकी चित्र छान.
त्या मुलाचा चेहरा थेट आमच्या घरी महालक्ष्मी बसवल्यावर(गोउरी-गणपतीमधील) त्यांची जी मुले असतात,
अगदी तस्साच आहे, अगदी सिन्सिअर पणाचा.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

विसोबा खेचर's picture

17 May 2008 - 8:33 am | विसोबा खेचर

हे चित्रं छानच आहे, मुलगा मला तर एकदम मस्त वाटला! :)

नंतर दिलेलं वारली चित्रंही सुरेख आहे....

औरभी आने दो...

तात्या.

भाग्यश्री's picture

17 May 2008 - 10:09 am | भाग्यश्री

धन्यवाद... :)

यशोधरा's picture

16 May 2008 - 10:11 pm | यशोधरा

छान आलय की!! :)
मी प्रतिक्रिया टाकत होते, तेवढयात तू हे चित्रही टाकलस!! :) दोन्ही चित्रं सुरेख गं :)

आजुबाजुची हिरवळ आणि गर्दी खुपच कमी दिसते आहे.
कॉलेजेस ना सुट्टी होती कि काय?

चित्र सुंदरच आहे.. टिका करण्याइतका मी मुळीच चित्रकार नाही (मी गणपतीला काळा गॉगल काढला होता कारण भिवया रंगवण्यासाठी नं १ चा ब्रश वापरायचा असतो हे कोणी सांगितलं नव्हतं.)

- (आजुबाजुची हिरवळ हिच वैशालीचं मेन डेकोरेशन आहे अस मानणार्‍यांपैकी ) एक.

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 10:13 pm | भाग्यश्री

तुमचं बरोबर आहे.. पण मूळ चित्रकार तिथे कधी चित्र काढायला गेला, त्यावर अवलंबून आहे.. पहाटे गेला असावा.. नाहीतर इतकी कमी गर्दी आणि गाड्या नसतात कधी! :)

शितल's picture

16 May 2008 - 10:28 pm | शितल

भाग्यश्री तुझे रेखाटन खुपच सुरेख आहे.

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 11:38 pm | भाग्यश्री

हे थोडंफार वारली प्रकारचे आहे, पण नेहेमीचे वारलीचे पॅटर्न्स नाहीयेत यात.. म्हणजे ती काड्या-काड्यांची माणसं, ती वाद्यं,गोल करून केलेलं नृत्य वगैरे..
ब्राऊन कापडावर, पांढर्या अक्रेलिक पेंटने काढले आहे.. मूळ चित्र एका छोट्या फोटो मधे देतात, ते पाहून आपण कापडावर काढायचे.. थोडेसे प्रपोर्शन साठी काही आउटलाईन्स दिलेल्या असतात, पण अर्थात चित्र तुम्हीच काढता / रंगवता..

फ्रेमच्या काचेत फ्लॅश पडल्याने तो मधे प्रकाश दिसतोय.. :(

IMG_0230

ईश्वरी's picture

17 May 2008 - 12:28 am | ईश्वरी

भाग्यश्री तुझा पेन स्केच चा प्रयत्न छान वाटला. हे वारली प्रकारचे चित्र ही खुपच सुरेख आहे. आवडले.

ईश्वरी

मुक्तसुनीत's picture

17 May 2008 - 12:38 am | मुक्तसुनीत

तुमची चित्रे तुमच्या कवितांसारखीच छान आहेत. दोन्ही आघाड्यांवर आगे बढो !

भाग्यश्री's picture

17 May 2008 - 1:30 am | भाग्यश्री

हेहे मुक्तसुनीत! केसु आणि चतुरंगांना प्रतिसाद देऊन इथे आलात का? म्हणून असा प्रतिसाद! मी कवितेच्या वाट्याला नाही हो जात! माझा प्रांत नाही तो.. :)

वरदा's picture

17 May 2008 - 4:00 am | वरदा

वारली पेंटींग सह्ही आहे एकदम...

मदनबाण's picture

17 May 2008 - 4:09 am | मदनबाण

एकदम मस्त पेंटींग आहे.....

मदनबाण.....

भडकमकर मास्तर's picture

17 May 2008 - 7:57 am | भडकमकर मास्तर

दोन्ही चित्रे छान..
वारली पेन्टिंग फार आवडले...

भाग्यश्री's picture

17 May 2008 - 10:10 am | भाग्यश्री

धन्यवाद सर...

झकासराव's picture

17 May 2008 - 10:11 am | झकासराव

आहेस चित्र.
जर ते कॉम्पवर बघुन काढण्यापेक्षा प्रत्यक्ष जावुन काढल असतस तर तिकडे चाय, चाट वै वै खादाडी करता आली असती की. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शिंगाड्या's picture

21 May 2008 - 8:26 pm | शिंगाड्या

छान आहेत सगळी चित्रे...बाकी आमच्या चित्रकलेतील व्यक्ति हातापायी निट असणे दुरापस्त ;)

प्रभाकर पेठकर's picture

21 May 2008 - 10:39 pm | प्रभाकर पेठकर

सर्वच चित्रे छान आहेत. अभिनंदन.