झाड आठवणींचे
तुझ्या आठवणींचे झाड आज,
अजुन एका वर्षांनी मोठे झाले!
- अभिनंदन तुला.
आपल्याला भेटून आज
पुर्ण एक दशक झाले!
दहा वर्षात ह्यां ॠतु
सगळेच गेले गं येऊन
अन पायाखालची मातीही गेले भिजवून
जाणवले का तुला मात्र मनी?
वियोगाचे मुळ कसे
अधिकच घट्ट गेले होऊन!!
असे कोठे ठरविले होते आपण?
- मग असे का झाले?
- सांगशील का मला?
आपण लावलेले रोप्ट्याचे नकळत झाड कधी झाले!
रोज आभाळाकडे बघत वाढतांना
ह्या झाडाच्या फांद्या
पसरल्या आहेत आता अधिकच रुंद
हल्ली काळजी घेतो मी
खाऊ नये कुणी कधी चुकून
मोहक दिसणारी
ह्या झाडाची विषारी फळे
हे झाड जरी असले हिरवे
- कापता येईल का ह्यास?
- तुझ्या येण्यानं मात्र.
अन्यथा नशीबी सावलीत ह्याच्या जगणे झाले!!
लेखनविषय:
याद्या
1174
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
हं... कविच्या अन त्याच्या
पाभे, प्रश्न उत्तम. प्रयत्न
निनाव, अरे मला नायकच अभिप्रेत
पा भे : १ नंबर ! भन्नाट.
आठवणींचे झाड आवडले ... कडु