खिमा पाव

गणपा's picture
गणपा in पाककृती
20 Apr 2011 - 6:47 pm

परवा प्रभ्याशी गप्पा हाणताना खिम्याचा विषय निघाला. तसा तो खुप आधी पासुन माझ्या मागे लागला होता की खिम्याची पाकृ दे एकदा. पण योग जुळुन आला नव्हता. असो तर ही पाकृ खास आपल्या प्रभ्याच्या आग्रहा खातर.

साहित्यः

१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा मसाला (मालवणी/वाढवळ)
१ लहान चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा शाहीजीरे/जीरे.
१ मोठा चमचा धणे पुड.
१ मोठा चमचा जीरे पुड. (भाजलेले.)
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखटं.
२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
दालचीनी १ इंच.
२ वेलच्या.
१०-१५ काळीमिरे.
जवित्री (असल्यास)
तमाल पत्रं (असल्यास)

३-४ मध्यम कांदे (जितेके बारीक कापता येतील तेवढे बारीक कापुन.)
२ मध्यम टॉमेटो. (-------"------)
१ वाटी मटार दाणे.
२-३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. (ऐपती नुसार प्रमाण कमी जास्त करता येईल.)
कोथिंबिर.
एका लिंबाचा रस.
तेल, मीठ चवीनुसार.

१/२ किलो खिमा.

कृती:

एका कढईत १ डाव तेल तापवुन त्यात खडा मसाला आणि हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्याव.
नंतर त्यात कांदा टाकुन तो गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.

नंतर त्यात बाकिचे मसाले (गरम मसाला वगळुन) टाकावे. लाल तिखट पाण्यात घोळवुन टाकावं.

मसाला नीट परतल्या नंतर त्यात टॉमेटो टाकुन तो पुर्ण गळे पर्यंत परतत रहावं.

वरील मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की आच मोठी करुन त्यात खिमा टाकावा. आणि परतुन घावं.
(खिमा टाकताना आधी तो थोड पाणी टाकुन खिमा मोडुन घ्यावा. अन्यथा खिमा टाकल्यावर लगेच गुठळ्या होतात.)
नंतर आच मध्यम ते लहान करुन वर झाकण ठेवुन १५-२० मिनीटे शिजु द्यावं.

मटार टाकुन परत एकदा ५ मिनिटे झाकण ठेवुन शिजवुन घावं.
(जर मटार डिफ्रिज मधले असतील वा कॅन मधले शिजवलेले नसतील तर टॉमेटो टाकायच्या आधीच मटार टाकावे. )
लिंबाचा रस टाकुन वरुन गरम मसाला भुर भुरावा.

ताज्या पावा सोबत वा चपाती/भाकरी/पराठे जे उपलब्ध असेल त्याच्या सोबत ताव मारा. :)

प्रतिक्रिया

प्रभो's picture

20 Apr 2011 - 6:51 pm | प्रभो

ज्जे बात!!!!!! या विकांतीच करतो आता.....

आता तू पाकॄ टाकली नाहीस तरी चालेल.. ;)

मनिष's picture

1 May 2011 - 3:39 pm | मनिष

गणपाचे कातील फोटो बघून आज व्हेज व्हर्जन ट्राय केले, खिम्याऐवजी वाफवलेला फ्लॉवर वापरला, पण मनासारखे जमले नाही. :(

पुढच्या वेळेस सोया ग्रॅन्यूल्स टाकून बघतो. खडा मसाला जरा जास्तच दातात येत नाही का? तो मिक्सर मधून बारीक करून घेतला तर?

इरसाल's picture

20 Apr 2011 - 6:54 pm | इरसाल

जबरदस्त ...... जाम आवडले.

मृत्युन्जय's picture

20 Apr 2011 - 6:54 pm | मृत्युन्जय

ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड . शुद्ध शाकाहारी असल्याचा पहिला फायदा. पाकृ बघुन जळजळ झाली नाही. धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

अवांतर: तरी सालं शेवटच्या फोटोमुळे पोटात थोडी कालवाकालव झालीच.

कुंदन's picture

20 Apr 2011 - 6:55 pm | कुंदन

>>शेवटच्या फोटोमुळे
फोटोमुळे नाही रे , अ‍ॅसिडिटी मुळे असेल.

धमाल मुलगा's picture

20 Apr 2011 - 6:57 pm | धमाल मुलगा

मेलो! मेलो!! मेलो!!!
आजवर केलेल्या प्रत्येक पाककृती गुन्ह्यासाठी गणप्याला माफ केले आहे. परंतू हे गणपासंधा, तुझे शंभर अपराध ह्या एका खिम्यामुळे पुर्ण झाले..आता तुला शिक्षा काय द्यावी ह्याचा विचार करतो आहे. :)

'जय महाराष्ट्र' मध्ये बसुन खिमा-पावच्या प्लेटाच्या प्लेटा हाणताना झेंडू फुटावा तसा घाम फुटलेला अन तो पुसत पुसत, पोळलेल्या तोंडानं परत निघायचो ते दिवस आठिवले रे बाबा! :)

अवांतरः खिम्यामध्ये मटार???? यक्क्क्क.... ही भेसळ मान्य नाही..मान्य नाही..मान्य नाही!

नगरीनिरंजन's picture

20 Apr 2011 - 7:32 pm | नगरीनिरंजन

धम्याशी अवांतरसोडून संपूर्ण सहमत. आत्ताच जेवून उठलो आणि हे पाहून पुन्हा भूक लागली.
गणपा की जय! गणपा हाय हाय!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Apr 2011 - 10:23 am | विश्वनाथ मेहेंदळे

>> खिम्यामध्ये मटार???? यक्क्क्क.... ही भेसळ मान्य नाही..मान्य नाही..मान्य नाही!
कै च्या कै. खिम्या मध्ये मटार सर्रास घातले जातात. भेसळ या शब्दाचा निषेध :-)

सहज's picture

20 Apr 2011 - 7:40 pm | सहज

जोर का झटका हाय जोरोसे लगा!!!

चिंतामणी's picture

20 Apr 2011 - 8:56 pm | चिंतामणी

मार डाला यार.

खल्लास.

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 9:16 pm | स्पंदना

तोंडात द्राक्ष आणि पुढ्यात खिमा!! गिळवेनात पण अन टाकवेनात पण !

गणपा तुमचा पत्ता मिळेल का? नुसत पाच मिनिट दारात बसुन जाइन म्हणते. खायच राहुदे , निदान वास तरी...

धमाल मुलगा's picture

20 Apr 2011 - 9:28 pm | धमाल मुलगा

काय खल्ल्लास प्रतिसाद आहे! :D

>>नुसत पाच मिनिट दारात बसुन जाइन म्हणते. खायच राहुदे , निदान वास तरी...
_/\_

कौशी's picture

20 Apr 2011 - 9:19 pm | कौशी

नेहमीप्रमाणे जबरदस्त!! खुप आवडली ...करून बघणारच...

गोगोल's picture

20 Apr 2011 - 9:35 pm | गोगोल

गप्प राहायचे ठरवले आहे

योगप्रभू's picture

20 Apr 2011 - 9:42 pm | योगप्रभू

मिपाकरांच्या डोळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तसेच माझ्या मनात हावरटपणा आणि खिमा चोरीची इच्छा निर्माण केल्याबद्दल गणपा यांच्यावर कारवाई करावी, अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो :)

खिमा पाव सारखी लाजवाब डिश नाही. पण जिथे बघावे तिथे खिम्यावर तेलाचा हा भला मोठा तवंग असतो. पुण्यात कॅम्पात जबरी खिमा खाल्ला आहे. पण लक्षात राहणारा, एकदम मुलायम आणि तोंडात विरघळणारा खिमा ताज ब्ल्यू डायमंडला एकदा खाल्ला होता. देव त्या शेफचे कल्याण करो.

जयवंत दळवींनी त्यांच्या खादाडीचे वर्णन करणारा लेख लिहिलाय. त्यात त्यांनी खिम्यातले अतिरिक्त तेल काढून टाकण्याची सोपी युक्ती सांगितली होती. खिम्याच्या प्लेटखाली लिंबाची चकती ठेऊन ती एका बाजूने कलती करायची म्हणजे सगळे तेल एका बाजूला गोळा होते. ते तेल एखाद्या वाटीत टाकायचे. ती प्लेटखालची चकती खिम्यावर पिळायची आणि मग मस्त ताव मारायचा.

खिम्यात वाटाणे नकोत, या मताशी सहमत. अर्थात ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. खिमा तोंड हुळहुळण्याइतपत जहाल असला पाहिजे. मग त्यात वाटाणे टाका नाहीतर बेदाणे.

आहो योगप्रभू,

< मग त्यात वाटाणे टाका नाहीतर बेदाणे.> वाटाण्या पर्यंत ठीक होतं, बेदाणे काय!!!

तेवढा सोडता तुमचा प्रतिसाद एकदम पटला! आणि हो, त्यांनी घातलेले वाटाणे नसून मटार आहेत.

गणपा शेठ, मस्त पाक्रु. खिमा म्हणजे weak point आहे! एक कळलं नाही, लाल तिखट पाण्यात घोळून का घालायचे?

अमिता, मागे एकदा एका शेफ ने सांगीतल होतं की लाल तिखटाचा रंग अधिक खुलवायचा असल्यास थोड्या पाण्यात वा तेलात घोळवुन टाक म्हणुन. :)

योगप्रभू's picture

29 Apr 2011 - 3:28 pm | योगप्रभू

अमिता,
अहो खिम्याचा मूळ तिखटपणा जपून मग काय हवी ती सजावट करा, अशा अर्थाने मी बेदाणे घाला असे गंमतीने म्हटलो.

तसेही लोक खाण्याबाबत अनेक प्रयोग करत असतात.
आमच्या पुण्यनगरीत एका जुन्या फेमस मिसळवाल्याने रश्शामध्ये उकडलेले वांगे घातले होते. विचारल्यावर म्हटला 'जरा नवी स्टाईल.' मी म्हटले, 'अरे आता यात दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा पण घाल आणि सांबार रस्सा म्हणून नवी स्टाईल काढ.' :)

सानिकास्वप्निल's picture

21 Apr 2011 - 1:12 am | सानिकास्वप्निल

काय बोलू आता, तुमच्या पा़कृ नेहेमीच मस्त असतात
:)

फोटू छान आला आहे.
पावभाजी करून खाण्यात येइल.;)
तोच उतारा आहे.
एका कुटुंबाने हौसेने खीमापाव करून जेवायला बोलावले.
आम्ही शाकाहारी असल्याचे त्यांना माहीत नव्हते.
नंतर सगळ्यांनाच वाईट वाटले.
मग आम्ही मुगाची खिचडी आणि कढी खाल्ली.

वरच्या पाकॄ चे व्हेज वर्जन म्हणजे.... बाकी सगळे डिट्टो... फक्त मटन खिमा ऐवजी किसलेला(मी झटपट करण्यासाठी फूड प्रोसेसर मधून काढते) फ्लॉवर टाका. विश्वास ठेवा... लई म्हणजे लई खतर्नाक लागते.... आहाहा...चव आठवली आणि तोंडाला पाणि सुटले.

महेश काळे's picture

21 Apr 2011 - 10:12 am | महेश काळे

बटाटे सुध्दा चांगले लागतील.

कींवा एक मीश्रण खली दिलेल्या प्रमणात..

बटाटे : फ्लॉवर : सुरण (२ : १ : १)

कसे वाटले??

सविता's picture

21 Apr 2011 - 11:08 am | सविता

अरेच्चा मग ... गवार आणि भेंडी ने काय घोडे मारले आहे? ते पण टाका की तुम्ही कराल तेव्हा! सांगा आणि मग मला कसे लागतेय ते!

अवांतर : नॉन व्हेज खाणारे या मी दिलेल्या मूळ व्हेज वर्जन ला तोंड लावणार नाहीत्..एकदम मान्य! पण तसाही फ्लॉवर हा लॉलिपॉप अन काय काय रेसिपी मध्ये चिकन ला व्हेज पर्याय म्हणुन वापरतातच की... खिम्याच्या जवळ जाणारी टेस्ट आणि पावभाजी पेक्षा वेव्ळ आणि कष्ट कमी म्हणुन मी त्यांना पर्याय दिला!

सानिकास्वप्निल's picture

21 Apr 2011 - 5:00 pm | सानिकास्वप्निल

व्हेज वर्जनचा दुसरा प्रकार म्हणजे सोया ग्रान्युल्स घालून ही खुप छान खिमा होतो, करून बघा नक्की आवडेल :)

ऋषिकेश's picture

21 Apr 2011 - 8:48 am | ऋषिकेश

हुच्च!!! :)

sneharani's picture

21 Apr 2011 - 10:03 am | sneharani

जबरदस्त पाकृ!!फोटोसुध्दा मस्त!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Apr 2011 - 10:14 am | निनाद मुक्काम प...

झकास
कॉलेज चे दिवस आठवले .
मुंबईत मराठा मंदिरच्या समोरील इराणी हॉटेल व त्यांचा खिमा पाव व खिम्यावरील तेलाचा तवंग
पाककृती मस्तच आहे .
अवांतर
इराण्याकडे वाटणे घातलेला खिमा चापला आहे .
वाटाणे त्यात मस्त लागतात .

नंदन's picture

21 Apr 2011 - 10:29 am | नंदन

झकास पाकृ! शेवटचा फोटू तर लाजवाब!

मराठमोळा's picture

21 Apr 2011 - 10:31 am | मराठमोळा

अरे देवा...
वाचव रे बाबा या गणपाच्या दुष्टपणापासून.. किती दिवस झाले हा माणूस नुसता त्रास देऊन राहिलाय..
काय करावं बरं आता हा फोटु पाहुन? फारच कठीण प्रश्न आहे.

बाकी पाकृ आणि फोटुबद्दलबोलण्यासाठी शब्दच शिल्लक नाहीत. :)

गणपाने खाद्य व्यवसायात उतरावे आणि जगभर शाखा काढाव्या,आमच्या सार्ख्या खवय्यांचे लाड पुरवावेतसे मला सरखे वाट्टे,आपला फुल्ल सपोर्ट.(पार्टनरशिपची ओपन ऑफर.. :) )

गवि's picture

21 Apr 2011 - 10:53 am | गवि

मस्त..

जागु's picture

21 Apr 2011 - 1:02 pm | जागु

भन्नाट.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

आपण शाकाहारी आहे बॉ ;)

बादवे गणपाच्या धाग्यांना सर्वांनी प्रतिक्रिया देणे बंद केल्यास त्याचे लेखन आपोआप थांबेल काय ?

चिंतामणी's picture

22 Apr 2011 - 12:43 pm | चिंतामणी

आपण शाकाहारी आहे बॉ

मान्य. आपल्यासाठी दोन व्हे़ज व्हर्जन दिल्या आहेत. त्या करून बघा. (आणि खायला बोलवा) ;)

बादवे गणपाच्या धाग्यांना सर्वांनी प्रतिक्रिया देणे बंद केल्यास त्याचे लेखन आपोआप थांबेल काय ?

जो पर्यन्त मिपावर चवीने खाणारे आहेत तो पर्यन्त हे अवघड आहे.

सूर्य's picture

21 Apr 2011 - 1:30 pm | सूर्य

जबरा रे गणपाभौ.

- सूर्य.

वेताळ's picture

21 Apr 2011 - 1:35 pm | वेताळ

.......

प्रियाली's picture

21 Apr 2011 - 4:59 pm | प्रियाली

गणपांच्या सर्व पाककृतींकडे मी दुर्लक्ष करत असते. ;) यावेळीही केलेले आहे याची नोंद घेणे.

संदीप चित्रे's picture

22 Apr 2011 - 6:22 am | संदीप चित्रे

प्रत्येक वेळी किती वेगवेगळ्या शिव्या द्यायच्या !

विसोबा खेचर's picture

22 Apr 2011 - 9:23 am | विसोबा खेचर

फक्त आनंदाश्रू..! अन्य काही नाही..!

तात्या.

कवितानागेश's picture

29 Apr 2011 - 12:15 pm | कवितानागेश

साला, माझ्या १० दिवसांच्या उपासावर लिंबाचा रस टाकुन वरुन गरम मसाला भुर भुरवला गेला!
आता मी सोयाबीन वडी वापरुन करणार आहे.
मात्र अंडी न घालता! ;)

अवांतरः हा गणपा लय दुष्ट माणूस आहे. :(