परवा प्रभ्याशी गप्पा हाणताना खिम्याचा विषय निघाला. तसा तो खुप आधी पासुन माझ्या मागे लागला होता की खिम्याची पाकृ दे एकदा. पण योग जुळुन आला नव्हता. असो तर ही पाकृ खास आपल्या प्रभ्याच्या आग्रहा खातर.
साहित्यः
१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा मसाला (मालवणी/वाढवळ)
१ लहान चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा शाहीजीरे/जीरे.
१ मोठा चमचा धणे पुड.
१ मोठा चमचा जीरे पुड. (भाजलेले.)
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखटं.
२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
दालचीनी १ इंच.
२ वेलच्या.
१०-१५ काळीमिरे.
जवित्री (असल्यास)
तमाल पत्रं (असल्यास)
३-४ मध्यम कांदे (जितेके बारीक कापता येतील तेवढे बारीक कापुन.)
२ मध्यम टॉमेटो. (-------"------)
१ वाटी मटार दाणे.
२-३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. (ऐपती नुसार प्रमाण कमी जास्त करता येईल.)
कोथिंबिर.
एका लिंबाचा रस.
तेल, मीठ चवीनुसार.
१/२ किलो खिमा.
कृती:
एका कढईत १ डाव तेल तापवुन त्यात खडा मसाला आणि हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्याव.
नंतर त्यात कांदा टाकुन तो गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
नंतर त्यात बाकिचे मसाले (गरम मसाला वगळुन) टाकावे. लाल तिखट पाण्यात घोळवुन टाकावं.
मसाला नीट परतल्या नंतर त्यात टॉमेटो टाकुन तो पुर्ण गळे पर्यंत परतत रहावं.
वरील मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की आच मोठी करुन त्यात खिमा टाकावा. आणि परतुन घावं.
(खिमा टाकताना आधी तो थोड पाणी टाकुन खिमा मोडुन घ्यावा. अन्यथा खिमा टाकल्यावर लगेच गुठळ्या होतात.)
नंतर आच मध्यम ते लहान करुन वर झाकण ठेवुन १५-२० मिनीटे शिजु द्यावं.
मटार टाकुन परत एकदा ५ मिनिटे झाकण ठेवुन शिजवुन घावं.
(जर मटार डिफ्रिज मधले असतील वा कॅन मधले शिजवलेले नसतील तर टॉमेटो टाकायच्या आधीच मटार टाकावे. )
लिंबाचा रस टाकुन वरुन गरम मसाला भुर भुरावा.
ताज्या पावा सोबत वा चपाती/भाकरी/पराठे जे उपलब्ध असेल त्याच्या सोबत ताव मारा. :)
वाचने
19159
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्जे बात!!!!!! या विकांतीच
व्हेज व्हर्जन...
जबरदस्त ...... जाम आवडले.
ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड
शेवटच्या फोटोमुळे
In reply to ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड by मृत्युन्जय
अग्गायायायाया.....
धम्याशी अवांतरसोडून संपूर्ण
In reply to अग्गायायायाया..... by धमाल मुलगा
>> खिम्यामध्ये मटार????
In reply to अग्गायायायाया..... by धमाल मुलगा
गणपा
ठ्ठो.
तोंडात द्राक्ष आणि पुढ्यात
हा हा हा!!!!
In reply to तोंडात द्राक्ष आणि पुढ्यात by स्पंदना
मस्त!!
गप्प राहायचे ठरवले आहे
गणपा यांच्यावर कारवाई करा..
वाटाण्या पर्यंत ठीक होतं, बेदाणे काय!!!
In reply to गणपा यांच्यावर कारवाई करा.. by योगप्रभू
अमिता, मागे एकदा एका शेफ ने
In reply to वाटाण्या पर्यंत ठीक होतं, बेदाणे काय!!! by खादाड अमिता
ते मी गंमतीने म्हटलो हो..
In reply to वाटाण्या पर्यंत ठीक होतं, बेदाणे काय!!! by खादाड अमिता
नेहेमीप्रमाणेच मस्त
फोटू छान आला आहे. पावभाजी
वरच्या पाकॄ चे व्हेज वर्जन
In reply to फोटू छान आला आहे. पावभाजी by रेवती
बटाटे सुध्दा..!!
In reply to वरच्या पाकॄ चे व्हेज वर्जन by सविता
अरेच्चा मग ... गवार आणि
In reply to बटाटे सुध्दा..!! by महेश काळे
व्हेज वर्जनचा दुसरा प्रकार
In reply to वरच्या पाकॄ चे व्हेज वर्जन by सविता
वा!
अरे वा
झकास कॉलेज चे दिवस आठवले .
मस्त
अरे देवा... वाचव रे बाबा या
आहा..
भन्नाट.
आपण शाकाहारी आहे बॉ बादवे
मान्य.
In reply to आपण शाकाहारी आहे बॉ बादवे by परिकथेतील राजकुमार
जबरा रे गणपाभौ. - सूर्य.
.....
दुर्लक्ष
च्यायला ... ह्या गणपाला
फक्त आनंदाश्रू..! अन्य काही
साला, माझ्या १० दिवसांच्या