Skip to main content

भातुकलीचा खेळ ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वर्षांची आपली निस्सीम मैत्री "संपवून" ठरवले करूयात दोनाचे चार हात ... वरवरून सगळे छान होते सगळा आनंद होता ... पण काहीतरी सलत होते आत आता काय उद्या पासून मी नवरा नवरा खेळायचे अन तू बायको बायको खेळायचे ... अन ह्या so called संसाराच्या गाडग्याला तू मागून ढकलायचे अन मी पुढून ओढायचे दिले आपल्या नात्याला आपण अधिकृत नाव वाढला ह्या समाजात आपला भाव वाटले सुखी संसाराचे हेच खरे सूत्र माझ्या हाती अंगठी अन तुझ्या गळी मंगळसूत्र .... खूप प्रयत्न केला पण जमला नाही कशाचा कशाला मेळ .... चार चौघांसमोर नुसतेच आपण मारून नेताहोत वेळ खर, फ़क़्त आपल्यालाच माहिती आहे सखे ... हा दोन मित्रांनी मांडलेला .... भातुकलीचा खेळ ... हा भातुकलीचा खेळ ...
लेखनविषय:

वाचने 1705
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त जमलीये...

मस्त जमलीये...

सत्य आणि स्तुत्य..