प्रेरणा (शिर्षक बदल).
***नवीन शिर्षक कवितेच्या संदर्भास अधिक जवळ आहे असे वाटले, म्हणून हा बदल.***
तु आलीस? - चला बरं वाटलं
कुठे गेली होतीस मला असंच सोडून?
कल्पना तुला काही?
दमलो किती मी होतो तुला इथं तिथं शोधून!
प्राणच गेले होते जणु माझे निघून
थांग पत्ता नव्हता ठाउक कुणा -
पुरता थकलो होतो विचारून!!
मात्र, देव कॄपेनं माझ्या
परतलीस पुन्हा - हायसं वाटलं
तु आलीस!! - चला बरं वाटलं
माझे हातच सुटले होते हाता मधुन
आणिक श्वास सुटले होते श्वासा मधुन
नसती आलीस पुन्हा तु जर
आलीच नसती कधी पुन्हा
तु परतण्यासाठी अगं वेडे
सापडलो तरी असतो का इथे तुला?
कल्पनाच नव्हती तु अशी येशील परत
करशील मजवर प्रेम तसंच
काही-का-होईना..
असो!! - तुला माझी झाली आठवण
हेच खूप झालं
तु आलीस!! - चला बरं वाटलं
जाउ नकोस पुन्हा असे कधी सोडून
तुझी शप्पथ, जातो मी पुर्णतः मोडून
तुझ्या नसण्यानं होतात गं हाल माझे
कुणी विचारत नाहि मला
संपल्यासारखे सगळे कसे जाते वाटून
माझ्या प्रेरणे
सांग मला जर
माझं म्हणणं असेल कुठं चुकलं
मात्र,
परतलीस पुन्हा - हायसं वाटलं!!
तु आलीस!! - चला बरं वाटलं
संदर्भः आवर्जुन सांगण्यासारखे आहे असे काही. (पाषाणभेद, ह्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिये नंतर हे संदर्भ इथे आपल्या सर्वांसोबद शेयर करावेसे वाटून गेले).
ही कविता मला काल सुचली काल ऑफिस मधून काल घरी प्रवास करतांना... शेजारील सीट वर एक मुलगा त्याच्या मित्रा ला नुकतेच तो गांजा/अफू च्या सवयी तून - त्याच्या प्रेरणे मुळे कसा सुटला हे सांगत होता.. आणिक त्याची प्रेरणा होती -मित्रांनी त्या साठी केलेले भरसक प्रयत्न आणिक एक संधि - जी त्यास मिळली होती - इथे एका फुट्बाल च्या टीम मधे खेळ्ण्याची. तो पुर्वी एक चांगला खेळाडू होता असे तो सांगत होता. पण ह्या वाइट सवयी मुळे त्या ला काढण्यात आले होते. काही काळ निराशेचा गेला असे तो सांगत होता. दरम्यान, त्याच्या मित्रांनी टीम कोच कडे मागणी धरली आणि तो नशा सोडून सिरियसली स्पोर्ट्स वर लक्ष केंद्रित करेल अश्या अटी वर त्याला घेण्यात येईल असे सांगण्यात आले. आणिक मग त्याची काही मित्र त्याला ते सांगण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेन्व्हा मित्रांनी त्याला पुन्हा खेळाकडे खेचण्याची इतुकी प्रामाणिक धडपड पाहून त्याने ठरविले कि तो सुद्धा प्रयत्न करेल.. आणिक, काल त्याची मेडिकल टेस्ट देउन तो परत येत होता..रिजल्ट पोजिटिव्ह होते हे त्याच्या स्मित वरून कळंतच होते. त्याच्या भावना शब्दांत उतरविणे हा माझा फक्त छोटा सा प्रयत्न.
आपली ही कविता पाहून आम्हालाही
निनाव - जाउ नकोस पुन्हा असे
संदर्भ
छान..
मिसळलेल्या काव्यप्रेमीजनाना
निनाव: असल्याच छोट्या छोट्या
सह्ही. खूपच सुंदर उदाहरणे,
प्रेरणा आवडली .. शब्द आणखिन
स्पष्टीकरणा मुळे भावना कळल्या
व्वा निनाव फारच आवडली ..मनाला