Skip to main content

कठीण आहे कधी कधी

लेखक निनाव यांनी सोमवार, 18/04/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना आठवत नाहीत शब्द तु समोर असतांना नेहमीच पडतात अपुरे मग तुला लिहितांना लाजुन जे झुकतात नजरांचे प्रणय होतांना शब्दात करू कसे परिमित अश्या तुझ्या डोळ्यांना हरवतो मी तुझ्या ह्रदयाचे स्पंदन तीव्र ऐकतांना सांग आता लावू कसे शब्द ह्या चालीस बसतांना बांधु कसे शंब्दात अल्हड केश तुझे ते उडतांना जीवच जाईल माझा तसा प्रयत्न देखील करतांना कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना
लेखनविषय:

वाचने 1183
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

निनाव - कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना छानच लिहिले आहे.एकदम मस्त !!

छान लिहीले आहे!!