ओक साहेब, नाडी केंद्रवाले गप्प का?
ओक साहेब नाडी केंद्रवाले गप्प का?
माझ्यासारखा नाडी ग्रंथ प्रेमीने प्राचीन महर्षींबद्दल लिहिताना-बोलताना, वाचले-ऐकले. पण एखादा नाडी केंद्रवाला नाडी ग्रंथांबाबत काय म्हणतो त्यांचे काय विचार आहेत. विशेषतः बुद्धिवादी विचारकांचे म्हणणे त्यांच्या कानावर जात असेल तेंव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होते ते आपण सांगावे असा एक अभिप्राय नुकताच कळला. हैयोहैयैयोंनी गूढप्रश्न करून तमिळ भाषासौंदर्याचा आढावा घेऊन लेखन केले. त्याच बरोबर वाचकांना नाडीकेंद्र चालक श्री. जी. ईश्वरन यांचे विचारदर्शन व्हावे यासाठी त्यांची मुलाखत घेऊन शब्दांकित केलले त्यांचे विचार.
आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.
(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्या व मुंबईतील नाडी केंद्राचे संचालक.
वाचक मित्रहो,
नुकतेच मला इंटरनेटवर एका नाडी ग्रंथप्रेमी फोरमवर काही मते प्रदर्शित केली गेल्याचे कळले. त्या संदर्भात माझ्या जवळची माहिती मी आपणांशी शेअर करू इच्छितो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. सन १९९९ पासून माझा संपर्क मुंबईतील नाडी ग्रंथांशी आला. प्रथम भाषांतरकार व त्यानंतर संचालक या नात्याने मी अंबरनाथला एक व पुण्यात सध्या दोन केंद्रे गेल्या ९-१० वर्षांपेक्षा अधिक काळ चालवतो. त्यामधून अगस्त्य, वसिष्ठ, महाशिव, कौशिक आदि अनेक महर्षींच्या नाडी पट्ट्या आम्ही हाताळतो व वाचायला घेतो. याशिवाय गेली १०-११ वर्षे अत्री जीव नाडीमधून अनेकांना आमच्या केंद्रातून मार्गदर्शन केले जाते.
या व्यवसायात येण्याआधी मी एक फॅशन डिझायनर म्हणून परदेशातही नाव कमावले. मी तमिळ असलो तरी जन्म मराठी मुलखातील असल्याने मला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा मित्रत्वाच्या नात्याने माझ्या घराशेजारील नाडी केंद्र थाटल्यांनी घ्यायला सुरवात केली. नंतर मी माझी नाडी ग्रंथ पट्टी पाहिली. त्यात तुला हेच काम आता या पुढे करावयाचे आहे. असे आल्यावर थोड्याशा नाराजीने मी या कामाला लागलो. नंतर मला या कामात रस आला व मी या व्यवसायात पडलो.
माझे दोनही भाऊ सध्या मला या कामात मदत करतात. मोठा पशुपती थेरगावचे तर कृपानंद डोंबिवलीला केंद्र चालवतो. अशा तऱ्हेने माझी इथल्या अनेक केंद्रातील नाडीवाचकांशी व तमिळनाडू मधील त्यांच्या पालक नाडीकेंद्रांच्या संचालकांशी व्यावसाय़िक संबंध आहेत.
नाडीभविष्यामुळे माझी विंग कमांडर ओकांशी ओळख झाली. त्यांच्या विविध भाषेतील लेखांमुळे, चर्चांमधून भाषणांमधून प्राचीन अनेक महर्षींच्या दिव्यज्ञान चक्षूंच्याज्ञानव भांडाराचे देशातील अनेक भागातील लोकांना मार्गदर्शन झाले. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की श्री. बसव प्रेमानंद नावाचे एक आंतरराष्ट्रिय कीर्तीचे नास्तिकवादी संस्थाचालक इंडियन स्केप्टिक या नावाच्या मासिकातून आपले विचार प्रकट करत असतात. अनेक भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील निरीश्वरवादी चळवळीची ज्योत सन ८२-८३मधे पेटवण्याला त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव संपूर्ण भारतात फार मोठा मानतात. त्यांची मते ही दगडावरील रेघ मानणारे अनेक मराठी नेते मंडळी आहेत. अशा या नरोत्तमांची नाडी ग्रंथांवरची मते अंतिम सत्य मानली गेली तर नवल नाही. अशा या बी. प्रेमानंदांचा व महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले. काही काळापुर्वी बी. प्रेमानंदांचे निधन झाल्याचे कळते.) पत्रव्यवहारातून जी चर्चा झाली ती नोव्हेंबर १९९६च्या अंकातून एकत्रिक प्रसिद्ध झाली. फलज्योतिषशास्त्राचे अभ्यासक श्री रिसवबूड अंनिस संस्थेतर्फे ज्योतिषाच्या विरोधाचा गड तेंव्हा सांभाळत असत. बी प्रेमानंदांनी संकलित केलेल्या ‘एस्ट्रॉलॉजी सायन्स ऑर ईगो ट्रिप’ नावाच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष विषयावर संयुक्तपणे लेखन केले होते. उभयतांची इतकी वैचारिक घनिष्ठता असूनही या लेखात बी.प्रेमानंद त्यांच्याशी कसे हिणकस वागतात हे रंजक आहे. असो.
नोव्हेंबरच्या अंकातील सादरीकरण प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ते साधारणतः तसेच ठेऊन त्यांच्या विचारांवर मी माझे स्पष्टीकरण / प्रतिक्रिया देत आहे. रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. आशयाप्रमाणे काही प्रश्नांना एकत्रिक करण्याची स्वतंत्रता घेतली आहे. एकंदरीत असे वाटते की बी प्रेमानंदांनी दिलेल्या उत्तरानी रिसबुड समाधानी नसावेत वा सहमत नसावेत. या लेखाची दखल इतक्या वर्षांनी घेण्याचे कारण एक तर मला कळले इतक्या उशीरा. पण हा विषय न शिळा होणारा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देणे माझ्यासारख्याला उशीरा का होईना क्रमप्राप्त आहे. असो.
१. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? बी. प्रेमानंदांचे उत्तर क्रमशः ... पुढे चालू....
- व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? भाग २...
- कार्बन कसोटी करून त्या पट्टीचे आयुष्य किती हे देखील शोधून सांगेन.
- "नाडी पट्टया ऑर्डर प्रमाणे आत खोलीत बसून तयार केल्या जातात" - अत्यंतिक कल्पनाविलास - भाग ४
- आता नवजीवनाची बरसात होणार ... भाग ५वा ....
Book traversal links for ओक साहेब, नाडी केंद्रवाले गप्प का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ज्या लोकांची अगस्ति / कौशिक
बुद्धिवाद्यांच्या दांडगाईला घाबरुन उपयोगाचे नाही
अगदी खरं.
शशिकांत जी ... तसा भविष्य
पुढे वाचण्यास इच्छुक........
‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा
आत्मशून्य साहेब
रामायण विश्वामित्राने
"सर्व लोकांचे भवीष्य आधीच
मी ही त्यांना विचारले होते की
असेच म्हणतो
वाचतो आहे
तिरकस तिरंदाजांना विनंती
ह्या क्षणी 747 वाचने झाली
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
माधव रिसबूड
सर्व तार्किक / लॉजिकल शंका झाल्या.
तुम्ही