मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलपाखरू माझ्या मनीचे....

हर्षद प्रभुदेसाई · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मन माझे जणू एक फुलपाखरूच होते.., असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीतं होते । इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले, की त्या फुलावरी जाउनी मग ते.. विराजमान झाले । घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले, आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले । इतक्यात कुणीतरी येउनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले, विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले । खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारेते मोडूनी गेले, भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुलेते कधीच नव्हते । हे सारे कळल्या वर मगते.. सैरा-वैरा उडू लागले, फुटल्या वाटी जाउनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले । वणवण फिरले शोधूनी थकले.. हताश होवोनी माघारी फिरले, फिरता मागे सोबत अपुल्या ते.. आठवणींना घेउनी आले । आठवणी त्या सुखद क्षणांच्या.. जिवापाड ते जपू लागले, देउनी बगल मग वास्तवास ते.. गेल्या क्षणांतच जगू लागले । ह्या साऱ्यातुनी हेच उमगले.. फुलावरी लाउनी जीव ते चुकले, जाता-जाता अखेर फ़ूल ते.. पाखराचा... जीवच घेउनी गेले... । हर्षद अ प्रभुदेसाई....

वाचने 1667 वाचनखूण प्रतिक्रिया 5

कच्ची कैरी 28/03/2011 - 13:10
साध्या सोप्या भाषेत आणि तरीही इतक्या सुंदरतेने कविता मांडली व्वा मस्तच !