खिडकीच्या बंद तावदाना आडून
अविरत कोसळणारा मुका पावूस बघतेय…किती वेळ.
त्याने काचेला फासलेल धुकं
रानाचा हिरवा रंग अजूनच गडद करतंय
आणि विजेसारखे धारदार त्याचे शिंतोडे
ठोठावतायत दार माझ्या जाणिवांच…किती वेळ
कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय
कधी लागली कोण जाणे?
धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम
अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे?
भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट
खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2621
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास!! धुक्याआडची त्याची
कविता आवडली
In reply to खल्लास!! धुक्याआडची त्याची by प्राजु
अप्रतीम...
खुपच करुण कविता .. पावसात ही
__/\__
सोनल..
मस्त!
कान बन्द करुन पावसाला मुका
आवडली
मस्त
सगळ्यान्चे खूप खूप आभार आणि
वायकुळताई व्याकूळ करुन टाकलत
कान बंद करून पावसालाच मुका
आवडली