Skip to main content

नाते ना 'ते' राहीले

लेखक भ्रमर यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते. या कवितेची नायिका एक प्रेमविवाह झालेली स्री असुन तिने आपल्या आईवडीलांच्या इच्छेविरुध्द हे लग्न्न केलेले आहे. नाते तुझे नि माझे असे जन्मोजन्मीचे प्रिया तुझ्यासवेच मला या जन्मी रमायचे घरदार सोडुनी आले मायेस पारखी झाले परि तुझ्यासंगती सख्या रममाण संसारी झाले बोचरे बोल दुनियेचे झेलुनी पुढे चालायचे माता, पिता, बंधुभगिनी आठवुनी नाही रडायचे झाली बरीच जगती आबाळ या जीवाची स्फुंदुनी सांगू कशी मी मातेस मी दुरीची सुखदु:खाची जरी छाया ओलांडीत मी चालले या जन्मीच्या तव गाठीला आज एक तप पुर्ण झाले मज का वाटे कुणास ठावूक का मनात माझ्या आले तुच सांग ना प्रिया खरे का? नाते ना 'ते' राहिले.....
Taxonomy upgrade extras

वाचने 3525
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया