✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Mon, 03/14/2011 - 12:45  ·  लेख
लेख
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अ‍ॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या! असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं. तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील. o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे. o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे. o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये. o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी. o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
24075 वाचन

💬 प्रतिसाद (148)

प्रतिक्रिया

कौतुक

नितिन थत्ते
Mon, 03/14/2011 - 12:53 नवीन
यात पुण्याचे कौतुक केले असल्याने धागा योग्य जागी मारण्यात आला आहे. पूर्वीचं पुणं राहिलं नाही हेच खरं.
  • Log in or register to post comments

धागा पुण्याचे कौतुक करणारा

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/14/2011 - 13:14 नवीन
धागा पुण्याचे कौतुक करणारा असल्याने आनंदाचे उधाण आलेले आहे. एका पुणेद्वेष्ट्याकडुन असे लिखाण आलेले बघुन डोळे पाणावले. आमचे हितचिंतक थत्तेचाचा ह्यांना झालेली जळजळ बघुन तर आनंद द्विगुणीत झाल आहे. ह्या आनंदाप्रित्यर्थ (पुण्याचे कौतुक झाल्याचा नव्हे, पुणे कौतुकास्पद आहेच. थत्ते चाचांना जळजळ झाल्याचा आनंद) आज आम्ही दोन पेग जास्ती मारु आणि 'काँग्रेसच्या बैलाला घो' असे ओरडु. सकाळी शाखेत सुद्धा जाउन येऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

श्री. परिकथेतील राजकुमार

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 13:19 नवीन
श्री. परिकथेतील राजकुमार यांच्या आनंदात मी पण सहभागी आहे. सदर हृदयद्रावक तरीही आनंदांत प्रसंग मी संपूर्ण मराठी आंतरजालाला सांगावा याची कल्पना देणार्‍या, तळ्याकाठी भेटणार्‍या प्रो. घासकडवी यांचे मी आभार मानते. असे छोटे छोटे आनंद वाटले पाहिजेत. - अदिती सामंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खरोखरच विक्षिप्त आहात

नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 13:39 नवीन
खरोखरच विक्षिप्त आहात हो... त्या प.रा. भाऊला आनंद झाला म्हणून तो दोन पेग जास्त मारणार आणि त्यात तुम्हिपण सहभागी होणार....शिव...शिव...शिव... होतोय खर पुण्याचा र्‍हास (((की विकास??????)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठेंकू

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 16:45 नवीन
अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं काय होणार आणि पर्‍याचं तरी काय होणार? पण विचार करा, उद्या सकाळी मी संघाच्या शाखेवर गेले तर काय हाहा:कार माजेल? पेगात बाटली...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/14/2011 - 16:50 नवीन
अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं काय होणार आणि पर्‍याचं तरी काय होणार?
च्यायला दोन दोन बाटल्यात काही होत नाही ;) पेगात कधी व्हायचे ?
पण विचार करा, उद्या सकाळी मी संघाच्या शाखेवर गेले तर काय हाहा:कार माजेल?
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

च्यायला दोन दोन बाटल्यात काही

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 16:56 नवीन
च्यायला दोन दोन बाटल्यात काही होत नाही... पेगात कधी व्हायचे ?
तुझ्या इमेजचा पारच कचरा रे, दोन पेगात तुझं काही होतं असं म्हणणं!
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतील
अरे अरे अरे असं अभद्र बोलू नकोस. थत्ते चिच्चा आणि विजुभाऊ कोणाविरूद्ध लिहीणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लिहायला फ़क्त शाखाच असते असं

नितिन थत्ते
Mon, 03/14/2011 - 17:33 नवीन
लिहायला फ़क्त शाखाच असते असं काय नाय... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हां...

श्रावण मोडक
Mon, 03/14/2011 - 17:43 नवीन
हां... आख्खा संघ असतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरं मग आणखी काय काय असतं?

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 17:45 नवीन
बरं मग आणखी काय काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा

मालोजीराव
Wed, 03/16/2011 - 15:38 नवीन
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतील
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वो ताई....नीट वाचा की, मी

नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 18:34 नवीन
वो ताई....नीट वाचा की, मी जास्तीचे दोन पेग बोल्लो. वो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

नितिन थत्ते
Mon, 03/14/2011 - 13:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे म्हणजे नवलच ...

sagarparadkar
Mon, 03/14/2011 - 12:54 नवीन
आमच्या पुण्यात अशा चांगल्या गोष्टी पण घडू शकतात ? मला तर वाटत होतं की आपण पुणेकर म्हणजे सुंदर, निर्मळ अत्यंत सज्जन अशा भारतातले दुर्जनच आहोत की काय ...
  • Log in or register to post comments

>>विसरभोळे म्हणून आपल्यावर

Nile
Mon, 03/14/2011 - 12:56 नवीन
>>विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही कीती तो विसरभोळेपणा करावा एखाद्याने!साधी गाडीची कील्ली सांभाळता येत नाही, आणि वर अभिमानाने त्यावर लेख लिहतात, काय हे! बाकी आपल्याकडे स्कुटर आहे हेच सांगायचं होतं तर खरड केली असतीत त्यासाठी लेख कशाला लिहायचा ब्वॉ? ;-)
  • Log in or register to post comments

आवडला अनुभव....

कुंदन
Mon, 03/14/2011 - 12:57 नवीन
आवडला अनुभव.... अवांतर : कधी कधी वाटते पुण्यातले काही भामटे ठाण्यात पोहोचले की काय ?
  • Log in or register to post comments

o. तर कृपया ते चांगले अनुभवच

निखिल देशपांडे
Mon, 03/14/2011 - 12:57 नवीन
o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे. o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे. o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये. o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी. o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला अमोल

अमोल केळकर
Mon, 03/14/2011 - 13:36 नवीन
:) प्रतिसाद आवडला अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

>>>असा अनुभव फक्त पुण्यातच

मी ऋचा
Mon, 03/14/2011 - 13:00 नवीन
>>>असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो -१ पूर्णपणे असहमत. आमच्या नागपूरला पण असे आणि यापेक्षा अनेक चांगले अनुभव येतात.
  • Log in or register to post comments

पुर्णपणे सहमत! आमच्या

Nile
Mon, 03/14/2011 - 13:03 नवीन
पुर्णपणे सहमत! आमच्या अमेरिकेत तर एकदा मला त्या माणसाने जाउन स्वत: गाडी आणुन दिली, आता बोला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

कुणाची गाडी आणुन दिली म्हणता?

शिल्पा ब
Wed, 03/16/2011 - 23:46 नवीन
कुणाची गाडी आणुन दिली म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अगदी असेच नाही पण...

विकास
Wed, 03/16/2011 - 23:55 नवीन
एकदा परत लगेच बाहेर पडायचे म्हणून, आमच्या तत्कालीन घरासमोरील रस्त्यावर मी गाडी पार्क केली. आत गेलो आणि काम रद्द झाल्याने, एकदम संध्याकाळी बाहेर पडलो. पण किल्ली काही मिळत नव्हती. शेवटी ड्युप्लिकेट घेऊन गाडी उघडायला गेलो तर काय! पहीली किल्ली गाडीला नुसती लावलेलीच नाही तर हातातले सामान घेऊन गडबडीत उतरताना गाडी बंद देखील केलेली नव्हती. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

म्हणजे....

कुंदन
गुरुवार, 03/17/2011 - 01:52 नवीन
असाच अनुभव तुम्हाला पुण्यात यापुर्वी आलेला आहे तर ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

छे छे!

विकास
गुरुवार, 03/17/2011 - 03:31 नवीन
असाच अनुभव तुम्हाला पुण्यात यापुर्वी आलेला आहे तर छे छे! जागेवर गाडीच होती, नारळ नाही! ;) नाईलच्या प्रतिसादाला तो उपप्रतिसाद होता... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

या धाग्यावर एकापेक्षा जास्त

रेवती
गुरुवार, 03/17/2011 - 02:53 नवीन
या धाग्यावर एकापेक्षा जास्त प्रतिसाद देताय विकाससाहेब! माझ्या एकाही धाग्याला तुमचा अर्धाही प्रतिसाद नसतो.........बघुन घेइन! अनेकवेळा प्रयत्न करूनही माझ्या धाग्याला २५ पेक्षा जास्त प्रतिसाद येत नाहीत. सध्या माझ्या लेखनाचा दर्जा आहे त्यापेक्षा चांगला करणे मला जमणार नाही म्हणून एकेका सदस्यास गळ घालणे चालू आहे असे समजलात तरी हरकत नाही.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आधी म्हणावेसे वाटले की माझे

विकास
गुरुवार, 03/17/2011 - 03:30 नवीन
आधी म्हणावेसे वाटले की माझे प्रत्येक प्रतिसाद देण्यामागे माफक शुल्क असते. पण काय आहे, प्रस्तुत धागाकर्ती (आता) पुण्यातली असल्याने असले काही तत्व म्हणून नाही पण, पैसे घालवून करेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही... . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

या धाग्यावर एकापेक्षा जास्त

विजुभाऊ
गुरुवार, 03/17/2011 - 10:16 नवीन
या धाग्यावर एकापेक्षा जास्त प्रतिसाद देताय विकाससाहेब! माझ्या एकाही धाग्याला तुमचा अर्धाही प्रतिसाद नसतो.........बघुन घेइन! रेवती बै ते त्यांचा कंपूची मान्यता मिळवण्याच्या करातील एक गुप्त कलम आहे. शुद्ध मराठीत याला पाठ खाजवणे असे देखील काही लोक म्हणतात. नाहीतरी इथे बर्‍याच सदस्यानी कंपुबाजानी कंपुबाजांसाठी काढलेला एक कंपूमय धागा अशा अर्थाची काही वाक्ये लिहीली आहेत. मिपावरच्या रविकिरणमंडळात सामील व्हायला काय करावे लागते ते माहीत करून घ्यायला हवं जरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेवतीताई, तू पण एक झक्कास

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/17/2011 - 10:31 नवीन
रेवतीताई, तू पण एक झक्कास धागा लिही आणि यावेळेस तू पुण्याच्या विरूद्ध बोल. आपण सर्व पाशवी शक्ती मिळून त्याला त्रिशतकी बनवू या, म्हणजे पुन्हा विजुभाऊंची रविकिरणमंडळाबद्दल तक्रार नकोच ऐकायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हम्म आम्हाला पण पुण्यात खुप

नि३
Mon, 03/14/2011 - 13:03 नवीन
हम्म आम्हाला पण पुण्यात खुप काही चांगले अनुभव आले आहे. बाकी लेखीकेने जो अनुभव व्यक्त केला ते पुण्यातच घडु शकते असे काही नाही ते कुठेही होऊ शकते... आणी तुमची स्कूटर गेली नाही याचा अर्थ असा होत नाही की ज्याला चोरायची होती त्याने जाणुन चोरली नाही.
  • Log in or register to post comments

यावरुन तुमची गाडी किती भंगार

अवलिया
Mon, 03/14/2011 - 13:04 नवीन
यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 13:05 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हा हा...हा... न चोरण्याचे हे

नि३
Mon, 03/14/2011 - 13:12 नवीन
हा हा...हा... न चोरण्याचे हे देखील एक कारण असु शकते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हा हा हा

निवेदिता-ताई
Mon, 03/14/2011 - 13:21 नवीन
असे असेल तर गाडी तिथेच सोडुन यायचे..हो फुकटसुद्धा कोण घेणार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

यावरुन तुमची गाडी किती भंगार

सुहास..
Mon, 03/14/2011 - 14:20 नवीन
यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही. >>> हेच म्हणावयास आलो होतो . बाकी , आम्ही मल्टीप्लेक्सात जावुन ईंग्रजी चित्रपट वगैरै पहातो हे दाखविण्याचा क्षीण प्रयत्न ;) मंगला, अलका, अपोलो आणि लिं. ना. चि. म . चा फॅन सुहास मुळ धाग्याविषयी : पार्किंग च्या सुरळीत पणासाठी कधी-कधी वाहने (किल्ली असो वा नसो) उचलुन हलविली जातात. म्हणुन आधी आपण लावताना नीट पार्किंगमध्येच आहे, याची खातरजमा करावी. पुण्यातल्या पार्किंग व्यवस्थेचा फॅन. सुहास कल्याणीनगरच्या अ‍ॅडलॅब्स मध्ये भर दिवसा पार्किंग लॉट मध्ये मर्डर झाल्यावर सध्या सर्वच मॉल/मल्टिप्लेक्सा मध्ये सुरक्षा व्यवस्था कडक झाली आहे, काही अपवाद वगळता. ई-स्केयर च्या सुरक्षा आणि हाऊसकिपींगचे कॉन्ट्रक्टर श्री. अविनाश राज साळवेंचा मित्र सुहास तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील. >>> ग्रंथ (तो देखील क्रमश खंडात) लिहावा लागेल , त्यामुळे क्षमस्व सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मंगला, अलका, अपोलो आणि लिं.

वपाडाव
Mon, 03/14/2011 - 16:41 नवीन
मंगला, अलका, अपोलो आणि लिं. ना. चि. म . चा फॅन
मंगलाचे रेट वाढले असल्याने आम्ही आज-काल तिकडे जात नाही. बाकी तिनही थेतरांना सप्ताहात यक भेट देणे गरजेचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मंगलाचे रेट वाढले असल्याने

सुहास..
Mon, 03/14/2011 - 16:55 नवीन
मंगलाचे रेट वाढले असल्याने आम्ही आज-काल तिकडे जात नाही. >>> मॉर्निंग ला गेला नव्हतात वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

काय आहे मंगलाचा रेट आता?

मृत्युन्जय
Fri, 03/18/2011 - 16:43 नवीन
काय आहे मंगलाचा रेट आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मंगलाला पुर्वीसारखा एकच न

नगरीनिरंजन
Fri, 03/18/2011 - 18:46 नवीन
मंगलाला पुर्वीसारखा एकच न लागता एकाचवेळी दोन-तीन लागतात असे ऐकले. खरं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हो , मंगला आता तिप्पट झाली

टारझन
Fri, 03/18/2011 - 19:43 नवीन
हो , मंगला आता तिप्पट झाली आहे .म्हणजे कँपस तेवढाच आहे. आतमधे तिप्पट झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हो , मंगला आता तिप्पट झाली

टारझन
Fri, 03/18/2011 - 19:44 नवीन
हो , मंगला आता तिप्पट झाली आहे .म्हणजे कँपस तेवढाच आहे. आतमधे तिप्पट झाली आहे. अलका मात्र तशीच दुर्लक्षित राहिल्याने काळाच्या ओघात काळवंडल्यासारखी वाटते. हल्ली कोणाच्या तोंडुन " आज अलका ला चाललो " असं ऐकायला मिळत नाही. - जी स्केयर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

काय आहे मंगलाचा रेट आता? हद्द

अप्पा जोगळेकर
Sat, 03/19/2011 - 16:41 नवीन
काय आहे मंगलाचा रेट आता? हद्द झाली. असल्या वाक्यांबाबत संपादक काही गंभीर विचार का करत नाहीत. मगाशीच ते स्लीपिंग पार्टनर का काय वाचलं अन आता हे. - कुणाचं काय तर कुणाचं काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गुणी, हुशार विद्यार्थ्यांच्या

भीमाईचा पिपळ्या.
Mon, 03/14/2011 - 13:08 नवीन
गुणी, हुशार विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मला वाटत तुमची काहीतरी चूक

नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 13:08 नवीन
मला वाटत तुमची काहीतरी चूक होत असावी. पेट्रोल चेक केल होत का??? @कारण मला पण एका मित्राने या रविवारी फिरवून आणल म्हणाला ई-स्क्वेअर जवळच्या मित्राची बाईक आहे. बोल्ला ३ च्या आत परत द्यायची आहे. रंग कोणता आहे बर तुमच्या गाडीचा...???@
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ ... परत येताना

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 13:10 नवीन
हॅ हॅ हॅ ... परत येताना विद्यापीठ चौकातून स्कूटर ढकलावी लागणार नाही एवढंच पेट्रोल पिक्चरला जाताना होतं. आणि अ‍ॅक्टीव्हाला पुण्यात बाईक कधीपासून म्हणायला लागले? (खडकी-दापोडीकडची) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

अ‍ॅक्टीव्हा म्हणजे बायकांची

नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 13:12 नवीन
अ‍ॅक्टीव्हा म्हणजे बायकांची बाईक हो....... Why should boys have all the fun of bikes...!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 13:16 नवीन
पुण्यातल्या रस्त्यांवरून जाताना डोळे उघडे ठेवलेत तर रस्त्यातल्या अर्ध्या टू-व्हीलर्स अ‍ॅक्टीव्हा दिसतात. अनेक कुटुंबवत्सल लोकं अ‍ॅक्टीव्हा चालवतात कारण ही फ्यामिली स्कूटर आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

वरील चित्र पुण्यातील आहे याला

नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 13:33 नवीन
वरील चित्र पुण्यातील आहे याला काय पुरावा...???? पण मी मात्र तुमचे एक विधान खोटे आहे असे म्हणतो. (भांडणे करायला हे काही मुंबईतील चाळ.......) तुमच्या वागण्यावरून अस वाटतय की पुण्यात पण वरील प्रमाणे माणसे असावीत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!

इंटरनेटस्नेही
Mon, 03/14/2011 - 13:58 नवीन
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

मी पण एक बाईक ठेवावी

स्पा
Mon, 03/14/2011 - 14:01 नवीन
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो! देशी कि विदेशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

शक्यतो देशी, काळसर रंगाची,

इंटरनेटस्नेही
Mon, 03/14/2011 - 14:04 नवीन
शक्यतो देशी, काळसर रंगाची, कोणाकडे असल्यास कळवणे. मेंटेनन्स फ्री असायला हवी व रात्रीच्या वेळेस चालवण्यासाठी हेडलाईटस मोठे पाहिजेत! तसेच सीट वर कव्हर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा