आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे,
आपण जणू एक कलाकारच असतो ।
आपापल्या परीने प्रत्येक जण,
आपापली भूमिका ति बजावत असतो ।
प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या,
रंगमंच्यावर मांडत असतो ।
असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे,
आपण येथे साकारत असतो ।
कुणास जमतो-कुणास न जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो ।
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो ।
कितीही लांबला जरी खेळहा तरी तो,
शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो ।
खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे,
ह्या परी कोणता मग मार्गच नसतो ।
ह्या खेळाचा सुत्रधार तो,
एकमेव हा देवच असतो ।
आपण फक्त जणू ताबेदार ते,
हुकमावर त्याच्या नाचत असतो ।
तोच ठरवितो आपूली भूमिका,
अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो ।
शेवटी देउनी वृद्धपणा तो,
आपूली रजाही मानूनी घेतो ।
हर्षद अ. प्रभुदेसाई......
वाचने
3203
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहो सगळी कला एकाच दिवशी सादर
धन्यवाद....
खर तर माझ मि मराठी ह्या साइट
In reply to धन्यवाद.... by हर्षद प्रभुदेसाई
डोंबिवलीत सुनामी आली की काय??
छान कविता. अवांतरः कविता
कलादालनाचे चित्रकलादालन असे
In reply to छान कविता. अवांतरः कविता by स्वानन्द