Skip to main content

अंगडाई घेतेस तु जेंव्हा

लेखक निनाव यांनी रविवार, 13/03/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून मी बघताच वीज भिरभिरते अंगभर जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात लाजाळुच बसते जशी अंग दुमडून चढत्या श्वासांना तु दाबतेस कसून बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन हात शोधतात पदर हातातला मग अधिकच मोहक येतेस तु दिसून उडावे केस मोकळे तुझे मग विसरुन उठाव्या नजरा तुझ्या हळुच ठरवून असह्य होते माझेच मला तुझे दिसणे मग पडावे मजवर तुझे मधु यौवन कोसळुन जणु यावी कशी चाल गाण्याची चालुन आरस्यातली छवी यावी बाहेर निघुन गझल उतरावी माझी नश्यात भिजुन आलीस पौर्णिमे ची रात्र मज दिसून अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून मी बघताच वीज भिरभिरते अंगभर जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात लाजाळुच बसते जशी अंग दुमडून
लेखनविषय:

वाचने 897
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

solid च जमलीय.. खुप आवडली....