वाट तुझी पाहात आज असा काय बसलो मी
बोलविले त्याने मज अन जाणेच विसरलो मी
तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी
शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी
तुलाच विसरण्यास आज पिण्यास बसलो मी
प्यायलो असा आज अन दर्याच विसरलो मी
तुझ्या आठवणीं संगे आज बोलत बसलो मी
तु येताच समोर मग बोलायचेच विसरलो मी
आज होतो न सोबत असा एकटाच बसलो मी
सवय जडली अशी मग सोबतच विसरलो मी
प्रतिक्रिया
8 Mar 2011 - 7:15 am | विश्वेश
मस्त
8 Mar 2011 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निनाव लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
8 Mar 2011 - 6:37 pm | गणेशा
छान
9 Mar 2011 - 7:19 am | प्रकाश१११
निनाद - छान सूर लागले आहेत.
तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी
शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी
एकदम मस्त. मनापासून आवडले.