वाट तुझी पाहात

निनाव जे न देखे रवी...
वाट तुझी पाहात आज असा काय बसलो मी बोलविले त्याने मज अन जाणेच विसरलो मी तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी तुलाच विसरण्यास आज पिण्यास बसलो मी प्यायलो असा आज अन दर्याच विसरलो मी तुझ्या आठवणीं संगे आज बोलत बसलो मी तु येताच समोर मग बोलायचेच विसरलो मी आज होतो न सोबत असा एकटाच बसलो मी सवय जडली अशी मग सोबतच विसरलो मी
वर्गीकरण
लेखनविषय:

4 टिप्पण्या 1,224 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

निनाव लिहित राहा. -दिलीप बिरुटे

प्रकाश१११ नवीन

निनाद - छान सूर लागले आहेत. तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी एकदम मस्त. मनापासून आवडले.