मशाल क्रांतीची...
उडाला भडका
वाजवा डंका
पेटवा लंका
पेटली मशाल क्रांतीची
सर्वत्र विखारी नाग
धुमसली आंतरिक आग
भडकला सार्वजनिक राग
पेटली मशाल क्रांतीची
स्फुरले तारुण्य
सळसळले रक्त
हादरले मदांध तख्त
पेटली मशाल क्रांतीची
काव्य केलेने शस्त्राने
रक्त सांडली लेखणीने
भूमीस लाल-अभिषेक
पेटली मशाल क्रांतीची
धरणी दुभंगली
आकाश विस्फारले
भास्कराने डोळे मिटले
पेटली मशाल क्रांतीची
सृष्टी-पुत्रांनीचं पुकारला
प्रती-सृष्टीचा उष:काल
भास्कराने पुनश्च: डोळे उघडले
आकाश सारे मुक्त झाले
हसले डोंगर
आनंदिली सरिता
पेटली मशाल क्रांतीची
आता,
तुचं तुझा चित्रकार
तुचं तुझा शिल्पकार
तुचं देणार या प्रतिसृष्टीस आकार...
.
वावा एकद्मम मराठी रॉक संगीत ऐकल्याचा भास झाला
बटबटीत..झाले आहे
मस्त कविता .. आवडली
धन्यवाद
=)) =)) राग नका मानु पण हे