आयज जागतिक मराठी दिन .. त्यानिमतान कांय कोकणी कवितांचो अणकार

Primary tabs

प्रीत-मोहर's picture
प्रीत-मोहर in विशेष
27 Feb 2011 - 2:17 pm
भाषा

पैसा ताई च्या लेखात लिहिल्याप्रमाणे कोकणी- मराठी ह्या बहिणी आहेत हे तर कळलेच असेल . तर आता आपण काही कोकणी रचना पाहुया
कोकणी कविता- विश्वात , मराठी वाचकांच श्रद्धास्थान , अभिजात लेखक व कवी श्री. बा भ. बोरकर उर्फ आमचे बाकीबाब ह्यांना एक आदरणीय स्थान आहे . तेव्हा सुरवात बाकीबाबांच्या काही मधुर रचनांनी .


पायजणां

त्या दिसा वडाकडेन गडद तिन्साना
मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां

मौन पडले सगळ्या राना, शिरशिरुन थाम्ली पाना
कवळी जाग आय्ली तणा झेम्ता झेम्ताना
मंद मंद वाजत आय्लीं......

पय्सुल्यान वाजली घांट , दाट्लो न्हय्चो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा
मंद मंद वाजत आय्लीं.......

फुलल्यो वयर चंद्रज्योती रंध्रांनी लागल्यो वाती'
नवलाची जांवक सांगली शकुन लक्षणां
मंद मंद वाजत आय्लीं......

गळ्या सुखां दोळ्यां दुखां लकलकली जावन थिका
नकळ्ताना एक जाली आमी दोघांजाणा
मंद मंद वाजत आय्लीं.....

कान्सुलांनी भोवती भोवर , आंगार दाट फुलता चवर
पड्टी केन्ना सपना, तीच घडटी जागरणा
मंद मंद वाजत आय्लीं......

ही कविता बाकीबाबांच्या १९६० साली प्रकाशित झालेल्या पायजणां ह्या कोकणी कवितासंग्रहातील आहे. आणि ह्या संग्रहातील ही सर्वात सुंदर कविता आहे . मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां ह्या गाण्याची ओळ न ओळ मनात अगदी रुणझुणत येते असच वाटत. एवढ्या हळुवार ओळी केवळ बाकीबाबच लिहु शकतात!!!

अनुवादः
त्या दिवशी वडाच्या बाजूने काळोख्या तिनी सांजेला,
मंद मंद वाजत आली तुझी पैंजणे...

सगळे रान मूक झाले.पाने शहारून थांबली..
तृणपात्याना झोपेतून कोवळीशी जाग आली..

दूर कुठेशी मंजूळ घंटा वाजली.. नदीच्या काठाचा कंठ दाटून आला..
त्या क्षणी सावल्यांनाही घमघमाट आला...

अंतराळात चंद्रज्योती फुलल्या, रंध्रांतून ज्योती तेवल्या..
सगळे नवलाचे शुभशकुन होऊ लागले...

तोंडी सुखाचे बोल आले..डोळ्यात अश्रु लखलखले..
तिलाच नकळत आम्ही दोघे जण कशी एकरुप झालो...

कानशिलांत जणू भोवरा फिरे.. अंगी आले दाट शहारे...
कधी स्वप्न पडे.. तेच जागेपणी घडे...

थिका= मोती

पायजणां याच संग्रहातील अजून २ गीते

साद तुगेले

साद तुगेलॅ आयकुंक आय्ले करचे किदें कळना...
सगळ्या दिकांनी सोदलो तुका तु सोदुन लेगीत मेळ्ळॉ ना.....
माका दर्या दिसलो ना,माका ल्हार मेळ्ळे ना
माका येवचे आस्लें तुजेच्कडे माका वाट समजली ना

सोबीत पोर्सुआंची हीं कोण फुलां फुलयता
हो खेळ आपा-लिपाचो हांगा कोण कोणाक शिकयता
सगळे पळय्ले उग्त्या दोळ्यांनी सांगुक लेगीत शक्ले ना
दोळ्याकडेन येवन रावली दुकां गालार येकुय देवेलें ना.....
माका दर्या दिसलो ना,माका ल्हार मेळ्ळे ना
माका येवचे आस्लें तुजेच्कडे माका वाट समजली ना..

आमोरेच्या पारार दोन सवणी परतताली
तीं सदांच अशीं येतली, अशे सगळीं समजतालीं
ल्हान मनातलें व्हडले सपन एकामेकांक कळले ना
दोळ्याकडेन येवन रावली दुकां गालार येकुय देवलें ना.....
माका दर्या दिसलो ना,माका ल्हार मेळ्ळे ना
माका येवचे आस्लें तुजेच्कडे माका वाट समजली ना..

अनुवाद

साद तुझे ऐकु आले, काय करावे कळेना
सगळ्या दिशांत शोधल तुला तु शोधुन सुद्धा सापडेना
मला समुद्र दिसला नाही, मला लहर सापडली नाही
मला यायच होत तुझ्याचकडे मला वाट समजली नाही

सुंदर परस्बागांतली ही कोण फुले फुलवतो
हा खेळ लपा-छपीचा इथे कोण कोणास शिकवतो
सगळे पाहिले उघड्या डोळ्यांनी, सांगुही शकले नाही....
डोळ्याच्या कडात अश्रु आले पण गालावर एकही उतरला(ओघळला) नाही
मला समुद्र दिसला नाही, मला लहर सापडली नाही
मला यायच होत तुझ्याचकडे मला वाट समजली नाही

तिन्हीसांजेच्या वेळी दोन पक्षी परतत होते
ते रोजच असे येतील , असे सगळे समजत होते
लहान मनातले मोठे स्वप्न एकामेकांना कळले नाही
डोळ्यांच्या कडात अश्रु आले पण गालावर एकही उतरला(ओघळला) नाही
मला समुद्र दिसला नाही, मला लहर सापडली नाही
मला यायच होत तुझ्याचकडे मला वाट समजली नाही

माणकुल्याक पयली धर

फाल्या बरय परां वाच, फावल्या वेळान चितना कर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

तानेले डोळे ताजे, तुजी नदर सोदता
आशेले पाय ताजे तुजेकडेन मोडटा
मोगाळ काळीज मागता मोग , सगळी कामा कुशीक दवर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

धाकटुलेच हात ताजे साळकाभाशेन फुलता
दात ताजे मोगरे कळे अर्दे उसोवन थामता
हासो ताजो गिळचे आदीच पयल्या वेळेक जिकुन धर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

आकुर कशी कवळी बोटां तुज्या केसांन घुसपुं दी
दसणी कळे वोंठ ताजे तुज्या पावलाक सासपु दी
कोत तुजें जीविताचें अमृतामुपात धर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

अनुवादः
उद्या लिही परवा वाच फावल्या वेळेत चिंतन कर
तान्हुल्याला आधी उचल, तान्हुल्याला आधी उचल

तहानलेले डोळे त्याचे, तुझी नजर शोधतात..
आसावलेले पाय त्याचे तुझ्याकडेच वळतात..
प्रेमळ काळीज त्याचं मागतंय ग माया
सगळी कामं ठेव बाजूला, उचल आधी तान्हुल्याला...

इवलेसे हात त्याचे साळकासारखे फुलतात...
दात त्याचे जणु मोगर्‍याचे कळॅ अर्धे उमलुन राहतात.....
हास्य त्याच मावळण्याआधीच, पहिल्या वेळेला जिंकुन घे
तान्हुल्याला आधी उचल तान्हुल्याला आधी उचल

आकुरासारखी कोवळी बोटं तुझ्या केसात रुपू देत,
जास्वंद कळीचे ताजे ओठ तुझी पावलं चाचपू देत
मूल्य तुझ्या जीविताचे अमृतपान्ह्याने कर .
तान्हुल्याला आधी उचल....

(साळक== कमळाचा १ प्रकार)
(आकुर= कोवळ्या अंकुरांची एक भाजी)

आता स्व. मनोहरराय सरदेसाईंच्या खालील कविता पहा

कोलो आणी दाखां-झेलो
एकलो कोलो भूकेल्लो
दाखां- मळ्यांत गेलो
पिक्या- दाखां- झेलो देखून
खुशालभरीत जालो
मिटक्यो मारीत,
उडक्यो मारीत रावलो,
खर्शेलो,
तरीय वयलो दाखां झेलो
तसोच वयर उल्लो
कोलो ल्हवुच भायर सल्लो
(दुसरो कसलो नासलो उपाय)
आणी मनांत फुतफुतलो
"आंबट दाखो कोणाक जाय?"

काय म्हणता? कळली तुम्हाला कविता? ....हो....कोल्ह्याला द्राक्षे आंबट वाली गोष्ट यात सांगितलीय.
आहेत की नाही मराठी-कोकणी सख्या बहिणी?

कठीण शब्दांचा अर्थ:
झेलो = गुच्छ ( पण काही वेळेला हार या अर्थी ही वापरतात )
खुशालभरीत जालो= आनंदित झाला
खर्शेलो= धाप लागली
ल्हवुच= हळूच
भायर सल्लो = बाहेर पडला
फुतफुतलो= पुटपुटला
कोलो = कोल्हा
दाखां - द्राक्षे

बर आता कवी मनोहरराय सरदेसाई यांची अजून १ कविता

मेस्त आनी बरोवपी

कालुच म्हाका येतना घरा
दिसलो वाटेंत मेस्तुलो
सांवरे- रुखार बसलेलो
आपले तोचीन खुटू, खुटू
खांद्याक बुराक काडटालो .
हांवे म्हळें, " मेस्तामामा,
बेश्टो कित्याक कश्ट घेता
तुजे तोंचीन दिसता तुका
सावरे रुखाक कापतलो?
तोंच तुजी धाकटुली
सांवर आसा व्हड कितली
कितलो वावर करतलो?
वोगीच पुता खरशेतलो

मेस्तमामान तकली हालोवन
म्हाका म्हळें,सारके पळे
हांव गा रुखाक कापीन कसो?
शक्त म्हजी कितली ल्हान,
हांव गा असो रुखा खांद्यार
म्हजे तोंचीक काडटा धार".

आयलो आजच दनपारा
तोच मेस्त म्हज्या घरा
सदांभशेन हांव असोच
कितेंय तरी बरयतालों
जनेलार बसलो आनी
मेस्तुल्यान म्हळें म्हाका:
बेश्टो कित्याक कश्ट घेता
बरोव-बरोवन दिसता तुका
सगलीं पाना भरतलो?
सगल्या लोकांक गिन्यान सांगुन
व्हडले शाणे करतलो?
लिखणी तुजी कितली
वावर आसा चड व्हडलो
वोगीच पुता खरशेतलो!!!"

हांस-हांसत हांवे म्हळें:
मेस्तमामा सारके पळे
पिशेपणा- गिन्यान अशें
एकटो हांव वाटन कसो
शक्त म्हजी कितली ल्हान
लिखणी म्हजी धाकटुली
हांव असोच पाना- पानार
म्हज्या मनाक काडटा धार."

मेस्त = सुतार (इथे तो सुतारपक्षी म्हणुन वापरलाय)

अनुवाद

कालच घरी येतांना मला
दिसला वाटेत सुतार(पक्षी)
सावरीच्या झाडावर बसलेला
आपल्या चोचीने खुटू खुटू
फांदीला भोक पाडीत होता
मी म्हंटलं" सुतारमामा,
उगीच का कष्ट करतोस
तुला वाटतंय का तुझ्या चोचीने
सावरीच्या झाडाला कापशील?
किती काम करशील?
उगीच दमून जाशील

सुतारमामाने डोकी हलवून
मला म्हंटलं ," नीट बघ,
मी रे झाडाला कसा कापीन?
शक्ती माझी केईती लहान
मी असाच झाडाच्या फांदीला
माझ्या चोचीला धार काढतो

आला आजच दुपारी
तोच सुतारपक्षी माझ्या घरी
रोजच्यासारखाच मी असाच
काहीतरी लिहित होतो
खिडकीवर बसला आणि
सुताराने म्हंटले मला
उगीच का कष्ट घेतोस
तुला वाटतय का लिहून लिहून
तू सगळी पानं भरशील?
सगळ्या लोकांना ज्ञान देऊन
मोठे शहाणे करशील?
लेखणी तुझी केवढी!!
काम आहे फार मोठ्ठ
उगीच दमून जाशील !!!

हसत- हसत मी म्हटलं
वेडेपणा- ज्ञान हे असा
मी एकटा कसा वाटू शकेन?
शक्ती माझी किती लहान
लेखणी माझी छोटुकली
मी असाच पाना-पानावर
माझ्या मनाला काढतोय धार

पांढऱ्यावर काळं करण्याचा माझा एक प्रयत्न .कसा वाटला जरूर सांगा .

आपलीच
प्रीत-मोहर

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Feb 2011 - 3:21 pm | पैसा

बाकीबाबची भाषा म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. 'त्या दिसा वडेकडेन..' मधे ती पैंजणांसारखी रुणझुणत येते, तर 'माणकुल्याक पयली धर..' मधे अगदी लडिवाळ होते. 'साद तुगेले आयकुक आयले..' मधे प्रेमाची आर्तता लेवून येते.

'साद तुगेले..' आशाताईंच्या मधाळ आवाजात ऐकलं आहे. लाजवाब. तोपर्यंत 'कोकणी गीतां' हा फक्त विनोदाचा विषय होता!

मनोहरराय सरदेसाय हे प्रामुख्याने इतिहासावर लिहिणारे म्हणून माहित होते. पण त्यांच्याही कविता खूप आवडल्या. "कोल्हा आणि द्राक्ष" मस्तच! तसंच सुतार पक्षी आणि कवीचा संवादही अप्रतिम! अशीच पाना- पानावर मनाला धार काढीत रहा!

यशोधरा's picture

1 Mar 2011 - 8:56 am | यशोधरा

छान :)

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 10:30 am | नगरीनिरंजन

छान प्रतिसाद!

अवलिया's picture

27 Feb 2011 - 3:18 pm | अवलिया

मस्त लेखन !! छान वाटले

स्पंदना's picture

27 Feb 2011 - 3:40 pm | स्पंदना

अस प्रेमान 'बाकिबाब' म्हणन फकत तुम्हालाच जमेल नाही? नाही तर आम्ही, श्रीयुत, आदरणीय, प्रेरणास्थान, ह्यांव आणी त्यांव.

आवडल हे वेगळ सागायला नको ना? की सांगु?

लय भारी वाटल.

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:42 pm | धमाल मुलगा

हेच मला सर्वात आवडणारं.... सरळ एकेरीवर येणं आणि असं बाब वगैरे म्हणणं.

प्रिमो,
मला हवय रेकार्डिंग! तुला आधीच सांगितलंय हां. :)

आणि सांगायचं राहिलंच... झकास केलायस अनुवाद ! एकदम जमलीये भट्टी.

पियुशा's picture

27 Feb 2011 - 3:49 pm | पियुशा

मस्त ग :)

स्वाती२'s picture

27 Feb 2011 - 5:11 pm | स्वाती२

मस्त!

सहज's picture

27 Feb 2011 - 8:13 pm | सहज

मराठी मधे अनुवाद केल्यामुळे कवितांचा आस्वाद घेता आला.

धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2011 - 8:24 pm | प्रीत-मोहर

यातल्या पहिल्या ३ गाण्यांचे ऑडियो माझ्याजवळ हाय्त कुणास हवे असतील तर सांगा ....देण्यात येतील :)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2011 - 9:14 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

ऑडिओ द्या.

स्पा's picture

28 Feb 2011 - 10:15 am | स्पा

आयला प्रिमो , तू एवढं सगळं टायपायचे कष्ट घेतलेस, वा वा ;)

पण फार सुंदर लेख, कविता एवढ्या कळत नाहीत.
पण बोरकरांच्या पहिल्याच कवितेतला गोडवा काळजाला भिडला
अनुवाद पण झकास, पण मराठी पेक्षा वर्जीनाल कविताच जास्त गोड वाटली

कवी मनोहरराय सरदेसाई यांची कविता पण सुरेख.
कोकणातला हा अस्सल मेवा आमच्यासमोर मांडल्याबद्दल मनापासून आभार !!

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2011 - 10:19 am | प्रीत-मोहर

बोरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यावरच्या मराठी कवितांचा अनुवाद ..कोकणीत थोडासा मिळमिळीत वाटतो तसच हे ....
आणी वर्जीनल्च गोड असत नेहमी :)

sneharani's picture

28 Feb 2011 - 10:30 am | sneharani

मस्त ग! मस्त लिवलस!
:)

मुलूखावेगळी's picture

28 Feb 2011 - 11:00 am | मुलूखावेगळी

मस्त आहेत सगळ्या कविता पण साद तुगेले ही जास्त आवडली
आनि कोल्हा वालि कविता पण कळाली कोकणी असुन.

प्राजक्ता पवार's picture

28 Feb 2011 - 12:35 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

असुर's picture

28 Feb 2011 - 8:29 pm | असुर

चैला, लै भारी!!!
मेव्याने कोकणीचं वेड लावलंच आहे, त्यात हिची भर अजून!!! :-)
या भाषेला एक दिलखेचक नाद आहे. तो आवडूनच जातो, पर्यायच नाही!

--असुर

चित्रा's picture

1 Mar 2011 - 8:42 am | चित्रा

बा. भ. बोरकरांच्या कवितांची ओळख आवडली.
(त्यांचे ललित गद्य लिखाण बरेच वाचलेले आहे).
असेच काही काही अजून येऊ दे.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 10:28 am | नगरीनिरंजन

लेख आणि कविता दोन्हीही सुंदर!

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2011 - 7:44 pm | प्रीत-मोहर

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार

@धमु
कही वेळात मिळतील तुल गाणी

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 May 2015 - 12:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

feast गं प्रीमोतै..
मीच येडा इतकं दिवस वाचल नाही. अजुनही चुकुन ते ऑडीयो असतील तर दे की.
मेल आयडी व्यनी करतो.

पैसा's picture

27 May 2015 - 12:46 pm | पैसा

ती पुलंच्या आवाजातील व्हिडिओ क्लिप इथे पोस्ट कर ना!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 May 2015 - 2:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2015 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता आणि मस्त अनुवाद !

ऑडिओ हवा आहे.

प्रीत-मोहर's picture

27 May 2015 - 4:42 pm | प्रीत-मोहर

एक्का काका इमेल व्यनि करा की . तुम्हाला आणि मिकाला एकदम सेंडते.