Skip to main content

' मराठी भाषा दिना ' निमित्त-

लेखक विदेश यांनी रविवार, 27/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीच वाचू मराठीत बोलू - मराठी लिहूनी आनंदात डोलू ! मराठी मराठी जी माझीच माय - कशी विसरू सांगा दुधावरची साय ! परीसामुळे होई लोखंड सोने - मराठी असे जीवनी साज-लेणे ! उतू नका आणि मातू नका हो - मराठी वसा तुम्ही टाकू नका हो ! मी मातृभाषाभिमानी रहावे - जगाने शहाणे मराठीत व्हावे ! मिरवणार झेंडा मराठी सदा मी फडकणार उंचावरी तोच नेहमी !!
विशेष

वाचने 1280
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

विदेशां - मराठी मराठी जी माझीच माय - कशी विसरू सांगा दुधावरची साय ! परीसामुळे होई लोखंड सोने - मराठी असे जीवनी साज-लेणे ! आवडले.छान!!