मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उल्का

सोनल कर्णिक वायकुळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अंधाराच्या निसरड्या कातळावरून निसटून अवकाशाच्या खोल दरीत असहाय कोसळताना निर्वाणीची मदत मागणारे त्याचे दोन हात तुला दिसले नसणारच… त्याच काळ्या कभिन्न पोकळीत होरपळत अदृश्य झालेल्या त्याचं पुढे काय झालं असेल ही काळजी अस्फुटशी सुद्धा तुला शिवली नसेल याचीही खात्री आहेच पाहिलं मी तुला त्या रात्री स्वप्नांची झापड ओढलेल्या अनिमिष नेत्रांनी निखळणा-या ता-याकडे स्वतःसाठी अजून एक मागण मागताना

वाचन 1709 प्रतिक्रिया 0