Skip to main content

एक निवेदन [पोलिओ ड्रोप्स लसीकरण - २७ फेब्रुवारी २०११]

लेखक Pearl
शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
श्रोतेहो, एक निवेदन: रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०११ रोजी सरकारतर्फे देशभरात सर्वत्र पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना या कार्यक्रमाअंतर्गत मोफत लस देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आसपासच्या लोकांना याबाबत माहिती द्यावी / आठवण करावी. निवेदन संपलं :-) [आकाशवाणी स्टाइल ;-)]

वाचने 2209
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चला धमु, टारझन, प्रभूसर, अवलिया, सुहास, गणपा, प्रकाश १११, गणेशा २७ फेब्रुवारी २०११ ला लवकर उठा अन लगेचच तयार व्हा, पोलीओ रविवार आहे ना तो दिवस.

धमु, टारझन, प्रभूसर, अवलिया, सुहास, गणपा, प्रकाश १११, गणेशा २७ फेब्रुवारी २०११ ला लवकर उठा अन लगेचच तयार व्हा, पोलीओ रविवार आहे ना तो दिवस. >>> =))=))=))=)) =))=))=)) =))=)) =)) सच्या, अनंताला पत्ता देऊ का रे तुझा ?

काहीतरी गैरसमज करून घेवू नका. अहो त्या सगळ्यांना पोलीओच्या डोसचे डबे घेवून जायचे आहेत वेगवेगळ्या बुथवर! व्हॉलींटीअर आहेत ना ते म्हणून. अजूनही कोणाला यायचे आहे का? डेक्कन, मनपा, निगडी, आकुर्डी, खडकी, घोरपडीगाव आदी ठिकाणांवरच्या बसस्थानकावर कोणी आलेलं नाही अजून.

बांगलोर सिटी रेलवे स्टेशन साठी कोनी नसेल तर सांगा, मी २ दिवस आहे स्टेशन जवळच . सर्वांना वाटेल मी २-२ पेग (ड्रॉप्स) हितु