मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तोतयांची, फक्त...

अजय जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कापल्या गेल्यांवरी तर मदार होती तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती समजले नाही मने करपली कशाने ? सूर्य होता माजला की दुपार होती.... नाचली होतीस तू थयथया कशाला ? हाक प्रेमाची जराशी... चिकार होती उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती माणसांची त्या वयेही उतार होती 'जीवही देईन प्रेमात आज माझा' मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ? साधनेला वेदनेची किनार होती

वाचने 1369 वाचनखूण प्रतिक्रिया 6

मुलूखावेगळी 13/02/2011 - 22:15
कविता सहज कधी नव्हे ते वाचली आवडली पण कोणाला उद्देशुन आहे प्रेयसीला का? भाउसाहेब पाटण्कर टाईप वाटतेय

अजय जोशी 15/02/2011 - 23:38
पाटण्कर काढा...! हा हा हा विनोद छान आहे. मात्र तुलना चुकली आहे.